बॉलीवूड 2009
WD
WD
WD
WD
WD
WD
सुपरहिट चित्रपट
या श्रेणीत यावर्षाचा एकही चित्रपट घेता येणार नाही. गझनीचा समावेश करता येईल. पण तो गेल्या वर्षीच्या शेवटच्या आवड्यात रिलीज झाला होता. या वर्षी  मात्र असा सणसणीत हिट चित्रपट बॉलीवूडमध्ये तयार झाला नाही. सुपरस्टार शाहरूख खान आणि ह्रतिक रोशन यांचा एकही चित्रपट या वर्षी रिलीज झाला  नाही. आमिर खानचा थ्री इडियट्स येत्या २५ डिसेंबरला रिलीज होईल. त्याची कामगिरी जाणून घेण्यासाठी पुढच्या वर्षाची वाट पहावी लागेल.
हिट चित्रपट
हॉलीवूडच्या २०१२ या चित्रपटाला रसिकांनी जोरदार गर्दी केली. इंग्रजीसह हिंदी व इतर भाषांतही तो रिलीज झाला. चित्रपट जोरदार चालला. रणबीर कपूर-  कतरीना कैफ यांच्या अजब प्रेम की गजब कहानी यांनीही चांगले यश कमावले. रणबीरची किंमत बॉलीवूडमध्ये वाढली. सलमान खान अभिनित वॉंटेडही हिट  ठरली. सलमानचा एक्शन हिरो लोकांना आवडला. आता त्याचा सीक्वेल बनविण्यात येत आहे.
सेमी हिट चित्रपट
सैफ अली खानने निर्माता म्हणून या वर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्या 'लव्ह आज कल' या चित्रपटाला शहरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. संगीतही  हिट ठरले. 9/11 च्या घटनेवर आधारीत न्यूयॉर्कही हिट ठरला. कतरीना कैफ, मधूर संगीत आणि कबिर खानचे दिग्दर्शन या जमेच्या बाजू ठरल्या. यशराज  फिल्म्सचा हा वर्षातील एकमेव यशस्वी चित्रपट. स्लमडॉग मिलिनियरला ऑस्कर मिळाले तरी भारतात त्याला फार मोठे यश मिळाले नाही. केवळ प्रसिद्धीच्या  जोरावर हा चित्रपट सेमी हिट या श्रेणीत टाकता येईल. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या 'पा' ला सेमी हिट म्हणता येईल. सतरा कोटी रूपयांत तयार झालेला हा  चित्रपट अजूनही कमाई करतो आहे.
साधारण हिट
दे दना दन आणि ऑल दी बेस्ट बर्‍यापैकी चालले. ऑल दी बेस्टची सुरवात चांगली झाली नव्हती. पण पुढे माऊथ पब्लिसिटीचा फायदा मिळाला. दे दना  दनच्या काही मंडळींना चक्क तोटा झाला. इमरान हाशमीचा 'राज- द मिस्ट्री कंटिन्यूज' ला बर्‍यापैकी यश मिळाले.
फ्लॉप चित्रपट
अयशस्वी ठरलेल्या चित्रपटांची यादी मोठी आहे. त्यात बडे चित्रपटही अनेक आहेत. अक्षय कुमार व करीना कपूर अभिनित 'कम्बख्त इश्क' हा त्यापैकीच एक.  चित्रपट पार आपटला. ब्ल्यू हा भारतातील महागड्या चित्रपटांपैकी एक होता. पण दणकून पडला. दहशतवादावर बनविलेल्या कुर्बान च्या पार चिंधड्या उडाल्या.  'रॉकेटसिंह-द सेल्समन ऑफ द इयर' चे रॉकेटच उडाले नाही. आशुतोष गोवारीकरच्या राशीला यंदा 'व्हॉट्स यूवर राशी'च्या निमित्ताने अपयश लागले. अलादिनचे  यश बाटलीतच राहिले. मधूर भांडारकरच्या जेलच्या निमित्ताने अपयश पहावे लागले. सलमान व करीना कपूर यांचा 'मै और मिसेस खन्ना' वर तर चक्क चार  दिवसांत टिव्हीवर डिटीएच सर्व्हिसद्वारे दाखविण्याची वेळ आली. या चित्रपटातून कोट्यवधीचे नुकसान झाले.
कौतुकाचे धनी
18 जानेवारी : योगीलाल उपाध्याय (गीतकार)
15 मार्च : वर्मा मलिक (84 वर्ष/गीतकार)
9 एप्रिल : शक्ति सामंत (83 वर्ष/ निर्माता-निर्देशक)
12 एप्रिल  : चन्दू आत्मा (गायक)
27 एप्रिल  : फिरोज खान (68 वर्ष/ निर्माता-निर्देशक-अभिनेता)
17 मे : प्रकाश मेहरा (निर्माता-निर्देशक-लेखक-गीतकार)
8 जून : हबीब तनवीर (85 वर्ष/ लेखक-अभिनेता)
10 जून : सुभाष सागर (72 वर्ष/ निर्माता)
14 जून : जोगिंदर (निर्माता-निर्देशक-अभिनेता)
12 जुलै : नीलू फूले (80 वर्ष/ अभिनेता)
28 जुलै : लीला नायडू (अभिनेत्री)
7 ऑगस्ट : गुलशन बावरा (72 वर्ष/ गीतकार-अभिनेता)
29 ऑक्टोबर : के.के. तलवार (70 वर्ष/ निर्माता)
10 नोव्हेंबर : सिम्पल कापडि़या (50 वर्ष / अभिनेत्री- कास्ट्यूम डिजाइनर)
13 नोव्हेंबर: उमा आनंद (लेखक-अभिनेत्री)
18 नोव्हेंबर : अबरार अल्वी (पटकथा लेखक)
IFM
IFM
सहा मार्च- अमृता अरोराने शकिलच्या गळ्यात वरमाला घातली.
१२ जून- अंतरा माळीने जी क्यू मॅगझिनचे संपादक चे कुरीयन यांच्याशी लग्न केले.
२२ नोव्हेंबर- शिल्पा शेट्टी व राज कुंद्राने अखेरीस लग्न केले.
कतरीना कैफ आणि यश हे समीकरण बनले आहे. एकामागोमाग एक यशस्वी चित्रपट ती देते आहे. शो पीस म्हणून हिणवली जाणार्‍या कतरीनाने अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. न्यूयॉर्कमध्ये तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. अजब प्रेम...मध्ये तिची रणबीर कपूरची जोडी चांगली जमली. सलमानपासून ती दुरावल्याचे दिसले. त्याचवेळी रणबीरच्या जवळ आली हेही या वर्षात जाणवले.
प्रियंका चोप्रा (व्हॉट्स यूवर राशी, कमीने, बिल्लू)
प्रियंका चोप्रा गेल्या वर्षाइतकी या वर्षी यशस्वी ठरली नाही. पण तिच्या स्टार व्हॅल्यूवर यामुळे काही फरक पडला नाही. व्हॉट्स युवर राशीमध्ये तिने साकारलेल्या बारा भूमिकांचे कौतुक झाले. भलेही चित्रपट पडला, तरी वैयक्तिकरित्या तिला फायदाच झाला. कमीनेतील 'स्विटी' मात्र सगळ्यांना आवडली. बिल्लूमध्ये तिने शाहरूखखातर एक गाणे केले.
करीना कपूर (कुर्बान, मै और मिसेस खन्ना, कम्बख्त इश्क, बिल्लू)
एकामागोमाग एक फ्लॉप चित्रपट देऊनही करीना चर्चेत असते. तिचे सगळेच चित्रपट या वर्षी फ्लॉप ठरले. मै और मिसेस खन्ना तर अतिशय वाईट पद्धतीने आपटला. कुर्बानमध्ये तिने उघडी पाठ दाखवली, तरीही रसिकांनी तिच्याकडेच पाठ फिरवली. कम्बख्त इश्कमध्ये बिनधास्त चुंबन दृश्य दिले, तरीही काही उपयोग झाला नाही.
राणी मुखर्जी ( दिल बोले हडिप्पा)
तरूण आहे हे भासविण्यसाठी राणीने शाहिद कपूरसोबत हा चित्रपट केला. त्यासाठी क्रिकेट खेलली. भांगडा केला. सरदार झाली. तरीही चित्रपट फ्लॉपच झाला. नव्या नायिकांसमोर राणीची पिछेहाट सुरू झाली आहे.
प्रीती झिंटा ( विदेश, मै और मिसेस खन्ना)
प्रीतीसाठी हे वर्ष वाईट गेले. नेस वाडिया या तिच्या प्रियकराशी तिचे फाटले. विदेश पडला. मै और मिसेस खन्नामध्ये जेमतेम एक गाणे केले. पण ते केले, असा प्रश्न तिला नंतर पडला असावा.
बिपाशा बसू (आ देखे जरा, ऑल दी बेस्ट)
'आ देखे जरा', फ्लॉप ठरला. नील नितिन मुकेशसोबत जोडी जमविण्याचा तिचा प्रयत्न फसला. ऑल दी बेस्ट यशस्वी ठरला, पण ते सांघिक यश होते. बिपाशा अजून लग्नही करत नाही आणि बॉलीवूडही सोडत नाही. विद्या बालन (पा)
विद्याचे करीयर कासवाच्या गतीने चालतेय. ग्लॅमरस भूमिकात ती शोभत नाही, त्यामुळे तशा भूमिकांसाठी तिचा विचारच होत नाही. 'पा'मध्ये अमिताभ बच्चनच्या आईच्या भूमिकेत तिने जीव ओतला होता. आता आगामी इश्कियाकडून तिला मोठ्या अपेक्षा आहे.
दीपिका पदुकोण ( लव्ह आज कल, चांदनी चौक टू चायना)
लव्ह आज कलमध्ये दीपिकाच्या अभिनयाचे कौतुक झाले. चित्रपटही हिट झाला. पण दुसरीकडे तिचे विद्यमान लव्ह रणबीर कपूरशी तिचे 'ब्रेक अप' झाले. पण आता जुळल्याचेही कळतेय. चांदनी चौक टू चायना हा टुकार चित्रपट पडला.
असिन ( लंडन ड्रिम्स, दशावतार-डब)
लंडन ड्रिम्समधून यश मिळेल, असे असिनला वाटत होते. पण तसे घडले नाही. सलमान आणि अजय देवगण यांच्यासाठी हा चित्रपट तिने केला. पण हा चित्रपट स्वीकारून चूक केल्याचे तिला नंतर कळले.
लारा दत्ता ( ब्ल्यू, डू नॉट डिस्टर्ब, बिल्लू)
'बिल्लू'मध्ये गाव की गोरी बनलेल्या लाराने 'ब्ल्यू'मध्ये एकदम सेक्सी फिगर दाखवली. पण काही उपयोग झाला नाही. 'डू नॉट डिस्टर्ब' मधील कॉमेडी रोल लोकांना फार आवडला नाही. यावर्षी अपयशच तिला पहावे लागले.
कंगना ( राज- द मिस्ट्री कंटिन्यूज, वादा रहा)
- अक्षय कुमार यंदा फ्लॉप ठरला नाही, पण त्याचे चित्रपट फ्लॉप ठरले. हे चित्रपट झळकले त्यावेळी सुरवातीचे चार दिवस अक्षय कुमारच्या नावावर गर्दी  नक्कीच झाली. पण चित्रपटांतच दम नसल्याने ती चटकन ओसरली. त्यामुळे यंदा अक्कीच्या नावावर फ्लॉप चित्रपटांची रास लागली आहे. यातून अक्षय काही  शिकेल आणि आपली 'किंमत' कमी करून योग्य तेच चित्रपट निवडेल ही अपेक्षा बाळगूया.
सलमान खान ( वॉंटेड, मै और मिसेस खन्ना, लंडन ड्रिम्स) -
वॉंटेड यशस्वी झाल्याने सलमानचे बॉलीवूडमधले वजन कायम राहिले. लंडन ड्रिम्स फ्लॉप झाला. मै और मिसेस खन्ना फार वाईट पद्धतीने पडला. 'दस का दम'  च्या माध्यमातून सलमान सतत दिसत राहिला.
अभिषेक बच्चन ( पा, दिल्ली ६, लक बाय चान्स)
अभिषेकच्या यशाची सरासरी १-१ अशी राहिली. पा यशस्वी झाला पण त्यात त्याच्यापेक्षा त्याच्या 'पा' चा वाटा आहे, हे कुणीही मान्य करेल. स्वबळावर चित्रपट  चालविण्याइतका अभिषेक अजून 'ग्रेट' झालेला नाही. 'दिल्ली ६' हे  त्याचे उदाहरण.
सैफ अली खान ( लव्ह आज कल, कुर्बान)
लव्ह आज कल हिट झाल्यानंतर हवेत गेलेला सैफ 'कुर्बान'ने आपटी खाल्ल्यानंतर जमिनीवर आला. तरीही हे वर्ष त्याला ठीक गेले असे म्हणता येईल. निर्माता  म्हणून त्याचा पहिलाच चित्रपट हिट ठरला.
अमिताभ बच्चन ( पा, अल्लादिन, दिल्ली ६)
बिग बी यंदा 'बिग बॉस'च्या माध्यमातून पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळले. अल्लादिनमध्ये ते राक्षस झाले, पण चित्रपटाला वाचवू शकले नाहीत. पा मध्ये  अप्रतिम कामगिरी करत 'अभिनयाचा शहेनशहा' आपल्याला का म्हणतात ते दाखवून दिले.
जॉन अब्राहम (न्यूयॉर्क)
न्यूयॉर्कद्वारे जॉन अब्राहमने आपण चांगला अभिनेता असल्याचे दाखवून दिले. त्याचा त्याला तसे चित्रपट मिळण्यात फायदा झाला आहे. पुढच्या काळात हे  चित्रपट रिलीज झाल्यानंतर जॉनचे मुल्यमापन करता येईल.
अजय देवगण (ऑल दी बेस्ट, लंडन ड्रिम्स)
अजय मोजक्याच लोकांसोबत काम करतो. त्यांच्यासोबत काम करणेच त्याला आवडते. यंदा ऑल दी बेस्ट हा बर्‍यापैकी मनोरंजन करणारा हिट चित्रपट त्याने  दिला. लंडन ड्रिम्समधील अभिनयाचे कौतुक झाले, पण चित्रपट पडला.रणबीर कपूर (वेक अप सिड, अजब प्रेम की गजब कहानी, रॉकेट सिंह)
रणबीर कपूरचे बॉलीवूडमधील वजन या वर्षी चांगलेच वाढले. त्याच्या प्रदर्शित झालेल्या सर्वच चित्रपटातील अभिनयाची प्रशंसा झाली. तिनही चित्रपटातली त्याची  भूमिका वेगळी होती. अजब प्रेम की गजब कहानी हिट ठरला.
शाहिद कपूर (कमीने, दिल बोले हडिप्पा)
कमीने यशस्वी झाला असे म्हणता येणार नाही, पण त्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. शाहिदमुळे कमीनेला ओपनिंग चांगले मिळाले. दिल बोले हडिप्पा हा  राणी मुखर्जीबरोबरचा चित्रपट फ्लॉप ठरला.
शाहरूख खान (बिल्लू)
या वर्षी शाहरूखचा नायक म्हणून एकही चित्रपट रिलीज झाला नाही. खांद्याच्या सर्जरीमुळे आणि पाठीच्या दुखण्यामुळे बॉलीवूडचा हा बादशहा चित्रपटांपासून लांब  राहिला. पण चर्चेपासून नाही. सलमान, तर कधी आमिर यांच्या निमित्ताने शाहरूख चर्चेत राहिला. नाईट रायडर्स या त्याच्या संघाचे अपयशही नजरेत आले.  अमेरिकेत एअरपोर्ट चेकिंगमध्ये त्याच्याबाबत झालेल्या गैरवर्तनानेही शाहरूखची चर्चा झाली.
इमरान हाशमी (राज, तुम मिले)
इमरान हाशमी म्हणजे विशेष फिल्म्सचा नायक अशी प्रतिमा तयार झाली आहे. ती त्याला त्रासदायक ठरेल. या वर्षी त्याला राज यशस्वी झाला, पण तुम मिले  आपटला.
इमरान खान ( लक)
रणबीरच्या तुलनेत इमरान खान मागे पडला. त्याचा लक हा चित्रपट फालतू होता. त्यात अभिनयही चांगला नव्हता. आता मामू आमिरकडून त्याने काही तरी  शिकायला हवे.
नील नितिन मुकेश ( आ देखे जरा, न्यूयॉर्क, जेल)