निळू फुले
13 जुलै हा निळू फुले यांचा स्मृतीदिन आहे. 'बाई वाड्यावर या' आणि निळू फुले हे जणू एक समीकरणच झालं. पण, निळू फुले नेमके कसे होते, यावर नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे यांनी लिहिलेला हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
'बाई वाड्यावर या' हे गाणं ज्या ज्या वेळेस मी पाहतो त्या त्या वेळेस मी खट्टू होतो. 'बाई वाड्यावर या' असं म्हणणारे निळू फुले आजकाल जास्त 'फेमस' झालेत आणि तीच त्यांची ओळख बनली आहे.
डोक्यावर तिरपी पांढरी गांधी टोपी, भेदक नजर, धोतराचा सोगा हातात धरलेला आणि तोंडाचा चंबू करून बेरकीपणानं हुंकारत निळूभाऊ बोलत.
ती त्यांची 'स्टाईल' होती. अनेक मिमिक्रीवालेसुद्धा निळूभाऊंची एवढीच नक्कल करत आणि करतात. प्रसंगी पदरची वाक्ये बोलतात आणि निळूभाऊंच्या नावावर खपवतात.
'बाई वाड्यावर या' हे वाक्य कदाचित त्यातलेच! पण हे वाक्य म्हणजे निळूभाऊंची खरी ओळख नव्हे.
खरंतर हे वाक्य निळूभाऊंनी कुठल्या चित्रपटात उच्चारलं होतं याविषयी कोणालाही माहिती नाही. (अगदी त्यांच्या मुलीला, गार्गीलाही ते असं कुठल्या चित्रपटात बोललेत का याविषयी शंका आहे.)
त्यामुळे आजच्या लोकांना 'बाई वाड्यावर या' ही निळूभाऊंची एवढीच आणि अशी ओळख राहणे हे माझ्या खट्टू होण्याचे कारण आहे.
सातारा-पुणे रस्त्यावर खंबाटकी घाटाच्या अलीकडे गेली 9 वर्षे निळूभाऊंचा फोटो रस्त्याच्या कडेला आहे आणि खाली लिहिलं आहे 'मोठा माणूस!'
निळूभाऊंची हीच ओळख मला आहे. 'मोठा अभिनेता' यापेक्षाही 'मोठा माणूस' ही निळूभाऊंची ओळख देखणी आणि खरी आहे.
चित्रपटातून दिसणारे निळू फुले मी वर्षानुवर्षे पाहतच होतो. त्यांची अनेक कामे मी पाहिलेली होती. त्यांच्याविना कुठलाही मराठी चित्रपट पूर्णच होऊ शकत नव्हता.
निळू फुले म्हणजे मराठी चित्रपटातील अमिताभ बच्चन! अनभिषिक्त सम्राट!
निळूभाऊंचं राजकारण
या सम्राटानं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागावर राज्य केलं. महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीतील काँग्रेस नेता त्यांनी हुबेहूब साकारला. अमर्याद सत्ता आणि त्यातून येणारा माज निळूभाऊंनी अनेक भूमिकांतून दाखवला.
माझ्या मते लोहियावादी असणाऱ्या निळूभाऊंनी काँग्रेसवर असा राग काढला. साखर कारखानदार नेत्यांना चव्हाट्यावर आणून बदनाम करण्यात यांचा मोठा वाटा आहे.
हे सारं राजकारण निळूभाऊंना पूर्णतः ठाऊक होतं. किंबहुना हेच निळूभाऊंचं राजकारण होतं. त्याची समज या कामांमधून दिसायची. अशा प्रकारच्या भूमिका करत असताना आवाज, नजर आणि देहबोली या तीन गोष्टींवर निळूभाऊंची हुकूमत विलक्षण होती.
मराठी भाषेचे आणि त्यातल्या विविध बोलींचे त्यांना विचक्षण ज्ञान होते. ही त्यांची भाषा लोकनाट्यातून तयार झालेली होती. ती अस्सल रांगडी मराठी होती.
याचे प्रत्यंतर 'कथा अकलेच्या कांद्याची' आणि 'सखाराम बाईंडर' या नाटकातूनही येत असे. बेदरकार, बेमुर्वतखोर आणि बेजबाबदार हे तीन अवगुण ते सखाराममध्ये पुरेपूर ओतत. त्यातूनच माणसाच्या रासवटपणाचं भेदक दर्शन ते घडवत. पण हे नाटक-सिनेमातले निळूभाऊ साऱ्यांच्याच परिचयाचे होते. तसेच ते माझ्याही माहितीतले होते.
मात्र मला निळूभाऊ उमगू लागले ते साधारण 1994/95 सालानंतर.
डॉक्टर लागूंशी दोस्ती
नाशिकला एके ठिकाणी व्याख्यानामध्ये त्यांनी माझं नाव जाहीरपणे घेतलं आणि प्रयोगशील नाटक करण्याबद्दल कौतुक केले. याबाबतची बातमी स्थानिक वृत्तपत्रातून आली होती. मी कमालीचा सुखावलो.
1997 सालची गोष्ट. निळूभाऊंच्या समानशील डॉ. श्रीराम लागूंनीही माझं कौतुक केलं. नाटकासाठी देणगी दिली आणि नव्या नाटकाची पृच्छाही केली.
प्रसिद्ध लेखक श्याम मनोहर लिखित 'प्रेमाची गोष्ट?' या नाटकाची संहिता मी डॉक्टरांच्या हातात दिली. डॉक्टरांना नाटक आवडले आणि त्यांनीच निळूभाऊंचे नावही सुचवले.
इतकेच नव्हे तर त्यांनी त्यांच्या घरातून निळूभाऊंना थेट फोन लावला. निळूभाऊंनी डॉक्टरांना होकार दिला. दुसऱ्या दिवशी मी निळूभाऊंच्या घरी गेलो. त्यावेळेस निळूभाऊ पुण्यात आयडियल कॉलनीच्या ग्राउंड जवळ राहात.
सकाळी दहा-अकराची वेळ. मी सकाळपासूनच तयारी करत होतो. मनात प्रचंड धडधड. निळूभाऊंना भेटायची कमालीची आस. अभिनयामुळे मी जसा प्रभावित होतो तशाच त्यांच्या माणूसपणाच्या अनेक गोष्टींनी मी आकर्षित होतो.
राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकातून लिहिलेली आणि केलेली वगनाट्य, सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन अशी बहुविध कामं मला त्यांच्याजवळ जायला उत्सुक करत होती.
'सिंहासन' चित्रपटातील पत्रकार दिगू मला खूप जवळचा वाटत होता. काँग्रेसच्या उथळ राजकारणावर हा माणूस घाला घालतो आहे अशी प्रामाणिक भावना माझी होती. हे सर्व माझ्या मनात उचंबळून येत होतं.
मी दारावरची बेल वाजवली. दार उघडले गेले आणि साक्षात निळूभाऊ समोर उभे होते. पुंडलिकाला परब्रह्म भेटल्याचे जे परमसुख मिळालं असेल तेच मला मिळालं. लुंगी गुंडाळलेली होती आणि वर खादीचा झब्बा. हातात सिगारेट. खर्जातील आवाजात 'या' एवढेच म्हणाले.
माझी नजर त्यांचं व्यक्तिमत्त्व टिपून घेत होती. अत्यंत साधा भाव त्यांच्या नजरेत होता. उभे राहण्यात लीनपणा होता. नाटकात असतात तितक्याच नैसर्गिक हालचाली त्यांच्या होत होत्या.
मी त्यांना नाटकाची संहिता दिली. त्यावर ते 'करूया. डॉक्टरांची इच्छा पूर्ण करूया' एवढंच उद्गारले.
मग निळूभाऊ इतर अनेक गोष्टींविषयी विचारू लागले, बोलू लागले. त्याच भेटीमध्ये त्यांनी मला डॉ. आ. ह. साळुंखे यांचं 'चार्वाक' हे पुस्तक भेट दिलं. चहा पिता पिता निळूभाऊ अनेक विषयांवर बोलले. त्यांना विद्रोही तुकारामावर चित्रपट करायचा होता.
निळूभाऊंची भेट घेऊन मी निघालो. मी पूर्णपणे बदललो होतो. निळूभाऊंचा समाजवादी प्रखर विचार काँग्रेसच्या सरंजामदारी वृत्तीवर जसा प्रहार करत होता तसाच नव्यानं सुरू झालेल्या लालकृष्ण अडवाणी प्रणीत हिंदुत्ववादी राजकारणावरही आघात करीत होता.
अनेक वेळा त्यांना धर्मांध राजकारणामुळे कमालीचं अस्वस्थ झालेले मी पाहिलं आहे. नथुराम गोडसे त्यादृष्टीनं खलनायक होता. त्याचं उदात्तीकरण करणारं नाटक हा त्यांच्या चिंतेचा विषय होता.
मनुष्याबद्दल कळवळा
ब्राह्मणी राजकारणाचा आणि मनुवादी वृत्तींचा त्यांना पराकोटीचा राग होता. इतकंच नव्हे तर महात्मा जोतीराव फुले यांना तत्कालीन समाजानं अडाणीपणानं झिडकारले तसंच माळी समाजानंही नाकारले होते याचंही दुःख ते बोलून दाखवत.
मनुष्याबद्दल कळवळा असणारा हा निळूभाऊंचा स्वभाव त्यांना माणूस म्हणून मोठा करणारा होता.
निळू फुले आणि डॉक्टर लागू ही जोडगोळी महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. त्या दोघांना पाहिले की मला 'शेजारी' चित्रपटाची आठवण होई. त्यातील हिंदू-मुसलमान मित्र जसे घट्ट छंदिष्ट होते तसेच हे दोघेही होते.
डॉक्टर लागू आणि निळूभाऊंची पार्श्वभूमी वेगळी आणि अभिनयाची शैलीही निराळी. डॉक्टर शास्त्रीय पद्धतीनं अभिनयाचा विचार करणारे तर निळूभाऊ नैसर्गिक पद्धतीनं भूमिकेला भिडणारे! डॉक्टरांचा प्रेक्षक वर्ग शहरी होता तर निळूभाऊंचा ग्रामीण!
दौऱ्याला निघालेली गाडी एखाद्या धाब्यावर थांबली की याचं प्रत्यंतर येई. त्या काळात मोबाईलचा सुळसुळाट नव्हता. तरीही अर्ध्या तासामध्ये सुमारे दोनशे माणसं निळूभाऊंच्या आजूबाजूला धाब्यावर जमत. तेवढ्या वेळात कुठून कॅमेरा आणत कोण जाणे. पण फोटो निघत.
अनेकदा निळूभाऊ विशिष्ट घरामध्ये जेवायला गाडी थांबवत. मग तिथे राजकीय गप्पांचा फड बसे. मिश्किल आणि थेट घणाघाती बोलण्याच्या जोडीला मद्यपान आणि मांसाहार.
निळूभाऊंच्या बोलण्यात त्यावेळेस गौतम बुद्धाविषयी आणि बुद्ध धर्माविषयी अनेक गोष्टी येत. हिंदू धर्मातील जाती व्यवस्था त्यांना अस्वस्थ करे. इतकी की आपणही बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे असे ते म्हणत. हा दृष्टिकोन मला नवा होता.
त्यांच्याशी चर्चा म्हणजे शिबिरच...
निळूभाऊंनी मला अनेक पुस्तकं भेट दिली. अनेक विषयांवर त्यांनी मला ठणकावलं आणि वाचायला उद्युक्त केलं. नाटकाच्या प्रयोगानंतर होणाऱ्या चर्चा हे खरं तर माझ्यासाठी शिबीर झालं. अचंबित होऊन ऐकणार्‍या आम्हा सगळ्यांचा तो अभ्यास वर्ग असे.
मी आजही आणखी एका आठवणीनं थक्क होतो. त्या काळात पुण्यामध्ये नाटकाची बस झोपून जायला उपयुक्त अशी नव्हती. कलाकारमंडळी बसमधील बाकड्यांवरच आडवी व्हायची. डॉक्टर लागू त्यांची गादीची वळकटी आणायचे. तर निळूभाऊ मधल्या पट्ट्यात नाटकातल्या गादीवर झोपायचे.
रात्री-अपरात्री गाडी थांबली की लोक काळजीपूर्वक बाकड्यांवर पाय ठेवत आणि कसरत करत गाढ झोपलेल्या निळूभाऊ आणि डॉक्टरांना ओलांडून जात. हे दृश्य मला गलबलून टाके.
आपल्या साऱ्या व्यवस्थांचा राग येई. पण या दोघांचा थोरपणा हा की त्यांनी याविषयी एका शब्दानंही वाच्यता केली नाही. ठिकठिकाणी प्रचंड उकाडा असून कधी एसीची मागणी केली नाही की कुलरची!
आम्ही कलकत्त्याला 'नांदीकार'च्या नाट्यमहोत्सवात गेलो तेव्हाही निळूभाऊ आणि डॉक्टर आमच्याच बरोबर आगगाडीतून आले. दौऱ्यात मला निळूभाऊंनी तीन पानी पत्ते खेळायला शिकवलं.
निळूभाऊ कुठल्याही विषयावर पारदर्शीपणे बोलायचे. आयुष्यात अनाहूतपणे घडलेल्या चुकाही ते निर्धास्तपणे सांगायचे. अशा वेळेस मी त्यांना 'ते आत्मकथा का लिहीत नाहीत' असं विचारलं तर 'खरं लिहायचं धैर्य माझ्यात नाही आणि थापा मारण्यात रस नाही' असं त्यांनी मला निर्मळपणे सांगितलं.
एकच प्रसंग, पण...
'प्रेमाची गोष्ट?' या नाटकात खरंतर एकच प्रसंग निळूभाऊंना होता. 'हिंदमाता रद्दी डेपो' हे रद्दीचं दुकान चालवणारा मराठा तात्या ही भूमिका ते अफलातून करत.
त्यांच्या एंट्रीलाच टाळ्यांचा कडकडाट होई. या प्रसंगात त्यांचे डॉक्टर लागूंबरोबरचे जुने मैत्र अनुसंबंध ते विलक्षण ओलाव्यानं दाखवत.
त्या नाटकातील हा प्रसंग कौतुकाचा ठरलेला होता. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता बी. व्ही. कारंथ यांनी निळूभाऊंच्या या कामाचं गुणगान केलं आहे.
निळूभाऊ मेकअपरूममध्ये सतत मान खाली घालून पुस्तक वाचत असलेले मला आठवतात.
नाटकावर श्रद्धा इतकी की, माझ्यासारख्या नवख्या दिग्दर्शकाला त्यांनी त्यावेळीस कधीच कुठलाही त्रास तर दिला नाहीच, पण नाटकावर काहीशी टीका होत असूनही माझ्या पश्चात एका शब्दानंही ते आडवे बोलले नाहीत.
'बांधिलकी' या शब्दाचा व्यापक अर्थ मला इथे उमगला. वाक्यांमधले आणि वागण्यामधले राजकारण काय असते, याचे शहाणे धडे मला निळूभाऊंनी दिले.
वंचित, शोषित आणि पीडित समाजाची दुःख सांगत असताना निळूभाऊंचा गळा दाटून येई. भारतीय मुस्लीम समाजाची स्थिती आणि गती दाखवणारा 'सच्चर समिती'चा रिपोर्ट त्यांनी मला वाचायला दिला होता.
नाटक, चित्रपट आणि जगणं हे निळूभाऊंसाठी एक आंदोलन होतं. या साऱ्या गोष्टी आणि घटना मला आजच्या काळात अजब वाटतात. माणसाला महान व्हायला अशी मानवतावादी मूल्यं लागतात.
'मोठा माणूस' या निळूभाऊंना मिळालेल्या उपाधीचा अर्थ मग उमजतो !
दिवंगत अभिनेते निळू फुले यांनी मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. त्यांनी नायक आणि खलनायक या दोन्ही भूमिका केल्या आणि त्यात उत्कृष्ट कामगिरी बजावली.त्यांनी आपल्या अभिनयाची अमिट छाप सोडली आहे.त्यांचे 'बाई वाड्यावर या '..हे सुपरहिट डायलॉग मुळे ते आजही लोकांचा मनात जिवंत आहे.
त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ कृष्णाजी फुले होते.त्यांना निळू फुले किंवा निळूभाऊ फुले या नावाने ओळ्खतात.त्यांचा जन्म 25 जुलै 1931 रोजी पुण्यात झाला.
त्यांना अभिनयाची आवड लहान पणा पासूनच होती.त्यांचे कुटुंब खूपच सामान्य होते.त्यांच्या वडिलांनी भाजी विकून मुलाचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत पूर्ण केले.
निळू भाऊंची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती त्यांनी सुरुवातीच्या काळात एका उद्यानात माळी म्हणून काम देखील केले.
सामाजिक बांधिलकी मुळे त्यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात काम करण्यास सुरुवात केली.त्यांचा संपर्क वसंत बापट ,पु.ल.देशपांडे यांच्याशी झाला.त्यांच्या कलागुणांना तिथेच वाव मिळाला.त्यांना वाचनाची आवड होती.
रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला .त्यांनी लेखन केले आणि 'उद्यान'हे नाटक लिहिले.पु.ल.देशपांडे यांच्या पुढारी नाटकातून त्यांनी ''रोंगे''ची भूमिका साकारून आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधले.अभिनेते म्हणून ते 'कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्यातून पुढे आले.
त्यांनी नायक आणि खलनायक अशा अनेक भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांचा मनावर सोडली.त्यांनी आपल्या 40 वर्षाच्या चित्रपटांच्या कारकिर्दीत 140 हुन अधिक मराठी चित्रपट आणि 12 हिंदी चित्रपटात अभिनय केले आहे.त्यांचे विजय तेंडुलकर लिखित 'सखाराम बाईंडर 'या नाटकातील साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली.
त्यांनी रजनी मुथा यांच्याशी लग्न गाठ जोडली.निळूभाऊंचे निधन पुणे येथे 13 जुलै 2009 रोजी झाले.
ते आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.
नीळकंठ कृष्णाजी फुले उर्फ निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुण्यात झाला. लोखंडी सामान व भाजीपाला विक्रीचे त्यांच्या वडीलांचे दुकान होते. निळूभाऊं चे शिक्षण जेमतेम मॅट्रिक. मात्र पहिल्यापासून अभिनयाची आवड आणि ओढ होती. १९५७ मध्ये त्यांनी येरागबाळ्याचे काम नोहे या लोकनाटात प्रथम काम केले. यानंतर पु. ल. देशपांडे यांच्या पुढारी पाहीजे या नाटकातून त्यांच्या रोंगे या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष गेले. कथा अकलेच्या कांद्याची या वगनाटामधे त्यांच्यातला लोकनाट कलाकार सर्वार्थाने पुढे आला. रंगभूमीवर सूर्यास्त, सखाराम बाईंडर, जंगली कबुतर, बेबी, घरंदाज आणि रण दोघांचे ही त्यांची प्रमुख नाटके तर पुढारी पाहीजे, कोणाचा कोणाला मेळ नाही, कथा अकलेच्या कांद्याची, राजकारण गेल चुलीत, लवंगी मिरची - कोल्हापूरची आदी त्यांची लोकनाट्ये.
लोकरंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी वरून चित्रपटात गेलेल्या अभिनेत्यांमध्ये आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे ते प्रथम श्रेणीचे अभिनेते होते. लोकशैली आणि नागर शैली यांचे उत्कृष्ट रसायन निळूभाऊंच्या अभिनय शैलीत होते. सहज चिंतनशीलता हा त्यांचा अभिनयविशेष होता. रंगभूमीनंतर एक गाव बारा भानगडी या चित्रपटातून त्यांनी चित्रसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर सामना, पिंजरा, सोबती, सहकार सम्राट, शापीत, हर्‍या नार्‍या, जैत रे जैत, पैजेचा विडा, पैज, कळत नकळत, प्रतिकार, पुत्रवती यांसह अनेक चित्रपटांतून निळूभाऊंनी आपला ठसा उमटवला.
कुली, सारांश, जरासी जिंदगी, रामनगरी, नागीन - २, मोहरे, मशाल, सूत्रधार, वो सात दिन, नरम गरम, जखमी शेर आदी त्यांचे हिंदी चित्रपटही विशेष गाजले. महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार त्यांना तीन वेळा मिळाला होते. याशिवाय संगीत नाटक अकादमी, अनंतराव भालेराव पुरस्कार इ. पुरस्कारही त्यांना मिळाले होते.
तमाम रसिक प्रेक्षकांच्या समोर ते खलनायक म्हणून परिचित असले तरीही एक मनस्वी समाजसेवक अशी भूमिका त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यात मनापासून साकारली. ते सेवादलाचे सक्रीय कार्यकर्ते होते.
सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास पुणे येथे वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, म. चि. म. चे अजय सरपोतदार, बाबा आढाव, जब्बार पटेल. अमोल पालेकर, जयराम कुलकर्णी, ज्योती सुभाष, रवींद्र मंकणी आदी नामवंतांसह शेकडो रसिक प्रेक्षक उपस्थित होते.
WD
WD
'खलनायक' हा शब्द निळूभाऊंसाठी मोठीच मर्यादा घालून बसला. वास्तविक सिंहासनमध्ये पत्रकाराची व्यक्तिरेखा साकारणार्‍या निळूभाऊंनी विविधांगी  व्यक्तिरेखा बर्‍याच केल्या, पण त्यांच्यावर प्रभाव या खलनायकी व्यक्तीरेखांचाच जास्त पडला. त्याचा परिणाम त्यांच्यातल्या अष्टपैलू अभिनेत्याभोवती  मर्यादांचे रिंगण आखण्यात झाला. तरीही त्यांच्या खलनायकी भूमिकांचा प्रभाव इतका का पडला हा प्रश्न उरतोच.
वास्तविक त्यांच्याही आधी मराठी चित्रसृष्टीत खलनायक होते. पण तरीही प्रेक्षकांच्या मनात रुतून बसेल नि खोलवर भीतीचं सावट नेईल अशा  खलनायकाची नक्कीच कमतरता होती. एक गाव बारा भानगडीतून अनंत मानेंनी हा नवा खलनायक प्रेक्षकांसमोर आणला. त्यामुळे तोपर्यंत मराठी  सिनेमातली खलनायकाची मोठी पोकळी निळूभाऊंनी भरून काढली, खरं तर ते या पोकळीत पूर्णपणे व्याप्त झाले. त्यामुळे दुसरा कुठलाही खलनायक  त्यांच्यासमोर उभा राहू शकला नाही. कुलदीप पवारने थोडेफार प्रयत्न केले पण कुवतीचा फरक फार मोठा पडला. मग थेट ८० च्या दशकात दीपक शिर्के,  राहूल सोलापूरकर आणि इतर असे नवे खलनायक उदयाला आले. पण निळूभाऊंचा प्रभाव त्यांना पकडता आला नाही. एकतर या काळात मराठी  सिनेमाकडे प्रेक्षकांनाही पाठ फिरवली होती. त्यामुळे मराठी चित्रसृष्टीतला खलनायक म्हणून नाव येते ते निळूभाऊंचेच.
सरपंच, पाटील या सत्ताधारी व्यक्तींभोवती असलेल्या नकारात्मक छटा निळूभाऊंनी अधिक उलगडून खुल्या करून दाखविल्या. निळूभाऊंनी सादर केलेल्या  या व्यक्तिरेखा भलेही काल्पनिक असल्या तरी त्या काळातल्या सत्ताधार्‍यांचेच प्रतिनिधित्व करणार्‍या होत्या यात काही शंका नाही. सहकारी  चळवळीच्या माध्यमातून सर्व सत्ताकेंद्रे आपल्या हातात ठेवणार्‍या मूठभरांचे खरे चित्र निळूभाऊंनी समोर आणले. खरे तर सामान्यांच्या मनी या गोष्टी  होत्याच, पण निळूभाऊंनी त्या पडद्यावर आणून या मंडळीचा दंभस्फोट केला. म्हणूनच त्यांच्या व्यक्तिरेखांना बाया-बापड्यांनी शिव्या घातल्या. आपल्या  आजूबाजूला बघणार्‍या राजकारणी व्यक्तींमधीलच एक समोर पडद्यावर दिसते आहे आणि ती इतरांचे फक्त वाईटच करू शकते, एवढे या बाया-बापड्यांच्या  मनात पक्के बसलेले असायचे. त्यातूनच त्यांचा राग अनावर यायचा नि तोंडातून शिव्या बाहेर पडायच्या.
इतकी स्पष्ट दाद फारच क्वचित मिळते. निळूभाऊ व्यक्तिरेखेच्या माध्यमातून थेट सत्यापर्यंत म्हणजे तत्कालीन सत्ताधीशांच्या मूळ व्यक्तिमत्वापर्यंत  पोहोचत होते. सत्ताधीशांचे अविभाज्य गुणही त्यांनी तितक्याच नागवेपणाने लोकांसमोर आणले. त्यांचा स्त्रीलंपटपणाही त्यांच्या संवादातून टपकत  असायचा, म्हणूनच तर 'बाकी....पोरीला साडीचोळी..ह्ये$$$ आमी करु! आवो खानदानी पध्दतय ती आमची!' या संवादातून काय अभिप्रेत आहे, हे  कळायला वेळ लागायचा नाही आणि संताप अनावर व्हायचा. 'बाई, अहो आपला स्वतःचा येव्हडा वाडा असताना तुम्ही त्या पडक्यात राहणार ? तुम्हाला  तिथे बघुन, आम्हाला हिकडं रातीला झोप यायची नाही, हे म्हणणारी व्यक्ती किती पोहोचलेली असेल आणि त्याचे हेतू काय आहेत, हे कळून प्रेक्षकाच्या  मनात चीड आणि त्या स्त्री व्यक्तिरेखेविषयी सहानुभूती चटकन निर्माण व्हायची. ही 'चीड' म्हणजे निळूभाऊंना दाद असली तरी राजकारणी मंडळीच्या  स्त्रीलंपटपणाविरोधतला निषेधही होता. राजकारण्यांचा मस्तवालपणा दाखविणारे त्यांचे हे संवाद म्हणूनच आजही लक्षात रहातात. ''आमच्या घराण्यात  गलास फोडल्याचे बारा आणे कधी कुणी भरले नाहीत. पोरानं दारु प्यावी, मास्तराला मारावं, हवालदाराच्या कानफटात ठेऊन द्यावी आन बापानं नायतर  आज्यानं सगळं नुसतं करंगळीवर निभाऊन न्यावं....''  आजही काही राजकारणी मंडळींचा 'माज' यापेक्षा वेगळा असतो काय? हा संवाद वाचला तरीही  राग येतो, मग सादर करणार्‍या निळूभाऊंनी तो सादर केला तर त्याची तीव्रता काय असेल याचा अंदाजच केलेला बरा.
बेरकीपणा, मस्तवालपणा, उर्मटपणा, माज नि वरचढ ठरण्याची राजकारणी वृत्ती निळूभाऊंनी आपल्या खलनायकी व्यक्तिमत्वात कशी आणली असेल?  निरिक्षणातून तर नक्कीच. कारण खेड्यातूनच पुढे आलेल्या निळूभाऊंनी हे जग बघितले होते. काहींच्याच हातात केंद्रित झालेली सत्ता, त्यांचा माजही  त्यांनी बघितला होता. ज्या नजरेतून त्यांनी हे पाहिले, त्या नजरेतून हे सारं देहात भिनवत निळूभाऊंनी प्रेक्षकांसमोर आणलं आणि गारूड केलं. म्हणूनच  निळू फुले ही व्यक्तीच अशी खलनायकी असावी ही समजूत दृढ करण्यात ते यशस्वी ठरले. निळूभाऊ काही कारणपरत्वे गावोगाव गेल्यानंतर तिथल्या   शिक्षिका, नर्स त्यांच्यापासून चार हात दूर रहायच्या. या घटना निळूभाऊंच्या व्यक्तिरेखेतल्या अस्सलपणाचे द्योतक आहे.
WD
तो काळ 1985 ते 90 चा असेल प्रकृती अस्‍वाथ्‍यामुळे निळू भाऊंनी चित्रपट कमी करून विश्रांती घेण्‍याचा निर्णय घेतला. मात्र शांत बसेल तो कार्यकर्ता कसचा. याकाळात अंधश्रध्‍दा निर्मुलन समिती आणि समविचारी संघटनांच्‍या कामाची गतीही चांगलीच वाढली होती. आम्ही सांगत असलेले, मांडत असलेले विचार लोकांना पटू लागले होते. त्‍यामुळे कामही विस्‍तारत चालले होते.
याकाळात एक दिवस कुठल्याशा कार्यक्रमानिमित्त आम्ही निळू भाऊंकडे गेलो. निळू भाऊंनी स्‍वतःहून आम्हाला अंनिसच्‍या कामात मदत करण्‍याचे आश्‍वासन देऊन आठवड्याला दोन दिवस देण्‍याचा मनोदय बोलून दाखविला. मूळातच राष्‍ट्रसेवा दलाचे संस्‍कार आणि पुरोगामी विचारांची बैठक यामुळे निळूभाऊ आधीपासूनच चळवळीच्‍या संपर्कात होते. मात्र कामाच्‍या गडबडीत ते प्रत्‍यक्ष संघटनेच्‍या व्‍यासपीठावर
खूप क्वचित वेळा असत.
निळू भाऊंनी स्‍वतःहून आठवड्यात दोन दिवस देण्‍याचे आश्‍वासन दिल्‍यानंतर आमच्‍या कामाला जोर आला. मला आठवतं आता-आतापर्यंत ठरल्‍याप्रमाणे निळूभाऊ सलग आमच्‍या सोबत असायचे. सकाळी आठ वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत आम्ही त्यांचे कितीतरी कार्यक्रम निश्चित करून ठेवत असू आणि निळू भाऊ त्या सर्व कार्यक्रमांना सारख्‍याच उत्साहाने हजेरी लावत.
एवढा मोठा नट मात्र संघटनेच्‍या कामात त्‍यांनी कधीही आपल्‍या मोठेपणाची प्रौढी मिरवली नाही. सामान्‍य कार्यकर्त्‍यांमध्‍ये ते अगदी सामान्‍य म्हणून काम करताना मी पाहिले आहे. संघटनेच्‍या कामात मूळातच पैशांची वानवा असल्‍याने ब-याचदा त्‍यांच्‍या प्रवासाची सोय रेल्‍वेच्‍या सेकंड स्‍लीपरमधून केली जायची तर मुक्कामासाठीही मोठ्या लॉज परवडत नसल्‍याने स्‍थानिक पातळीवर ती गव्‍हर्मेंट गेस्‍ट हाऊसमध्‍ये केली जायची. तिथली अस्‍वच्‍छता व गैरसोयी अशा गोष्‍टी असूनही निळू भाऊंनी त्‍याबद्दल आमच्‍याकडे कधीही तक्रार केली नाही. त्‍यामुळेच मला त्‍यांच्‍यासोबत काम केल्‍याचा मनस्‍वी अभिमान वाटतो.
पुरोगामी चळवळीचा आणि विचारांचा कोणताही कार्यक्रम असो लोकांपर्यंत पोचण्‍यासाठी आणि कार्यक्रमांना गर्दी व्‍हावी यासाठी आम्‍ही निळू भाऊंमधील नटाचे ग्लॅमर वापरण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र लोकांना त्यांच्‍यातील नटापेक्षा कार्यकर्ताच अधिक भावल्‍याचे माझ्या लक्षात आले.
चळवळीचे अनेक कार्यकर्ते त्‍यांच्‍याकडे यायचे आपल्‍या खाजगी अडचणी सांगायचे आणि निळू भाऊ त्‍यांना आपल्‍या खिशात हात घालून असेल तेवढी रक्कम द्यायचे. सामाजिक कृतज्ञता निधीची कल्‍पना यातून आमच्‍या समोर आली. यासाठी आम्ही निधी उभा करायचे ठरविल्‍यानंतर त्‍यासाठी नाटकांचे शो करणे असो की विद्यार्थी उपवास कार्यक्रम (प्रत्‍येक विद्यार्थ्‍याने एक दिवसातील एक वेळ उपास करून त्‍यातून वाचलेले पाच रुपये समितीला देणे अशी ही कल्‍पना होती. या उपक्रमात 5 लाख विद्यार्थ्‍यांनी सहभाग घेऊन 25 लाख रुपये निधी गोळा केला होता.) प्रत्येक वेळला या कार्यक्रमाच्‍या प्रचाराची जबाबदारी निळू भाऊंनी आपण होऊन स्‍वीकारली. (पुढील पानावर...)
vikas_shirpurkar1@webdunia.com
WD
निळू भाऊ नेहमी गमतीने आपण चळवळीतील 'ढोलकीवाला' असल्‍याचे म्‍हणत. 'ज्‍याप्रमाणे रस्‍त्‍यावरच्‍या कार्यक्रमासाठी  ढोलकीवाला ढोलकी वाजवून गर्दी गोळा करण्‍याचे काम करतो. तसे काम मी करतो', असे ते म्हणत. पण प्रत्‍यक्षात  केवळ ढोलकीवाला इतकेच काम त्‍यांचे नव्‍हते हे नंतर आमच्‍या लक्षात आले. निळू भाऊ केवळ एक नट किंवा कलावंत नव्‍हते. तर त्‍यांना एक वैचारिक व राजकीय समज होती. हौसी खातर कार्यकर्ता बनलेला नट तो नव्‍हता तर  अंतर्मनातील तगमगीतून त्‍यांच्यातील कार्यकर्ता तयार झाला होता हे मी मुद्दाम सांगू इच्छितो.
...आणि खलनायक हिरो ठरला
मला आठवतं बार्शी (जि.सोलापूर) येथे मी, राम नगरकर आणि निळू भाऊ एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. कार्यक्रमाला  प्रचंड गर्दी होती. मात्र माझ्या भाषणाच्‍या वेळी नेमका माईक बंद पडला. त्‍यामुळे लोकांना ते ऐकताच आले नाही.  स्‍थानिक कार्यकर्त्यांनी दुस-या माईकची व्‍यवस्‍था केली आणि राम बोलायला उभे राहिले. दुदैवाने त्याही वेळी माईक  बंद पडला आणि रामचे भाषणही लोकांना ऐकता आले नाही. नंतर निळू भाऊ बोलणार होते. ते नेहमी केवळ सात ते आठ मिनिटे बोलत असल्‍याने एवढ्या तयारीने केलेला कार्यक्रम फ्लॉप झाल्‍याचे पाहून आम्ही नाराज झालो. कार्यकर्त्यांनी घाई-घाईने तिस-या माईकची व्‍यवस्‍था केली आणि निळू भाऊ बोलायला उभे राहिले. एरवी सात-आठ  मिनिटे बोलणारे निळू भाऊ त्‍यादिवशी तब्बल अर्धा तास एखाद्या अभ्‍यासू आणि फर्ड्या वक्त्यासारखे प्रवाही बोलत राहीले. एरवी लोकांना खलनायक म्हणून माहीत असलेला हा माणूस त्या दिवशी ख-या अर्थाने आमच्‍या कार्यक्रमाचा हिरो ठरला.
निळू भाऊंच्‍या सामाजिक जाणीवेची दुसरी एक घटना त्‍याही पेक्षा मला जास्‍त महत्‍वाची वाटते. निळू भाऊंच्‍या साठाव्‍या वाढदिवशी त्‍यांचा षष्‍ठ्यब्‍धपूर्ती सोहळा करण्‍याचा निर्णय आम्ही घेतला. मी त्‍याची कल्‍पना निळू भाऊंना  सांगितली. आम्ही तुमच्‍या कार्यक्रमासाठी सहा लाख रुपये गोळा करतो ते पैसे तुम्ही सामाजिक कृतज्ञता निधीला द्या  अशी आमची कल्पना होती. निळू भाऊंनी त्‍यास होकार दिला. मात्र नंतर दोन दिवसांनी त्‍यांचे मला लेखी पत्र आले,  पत्राचा मजकूर होता. 'अशा प्रकारे माझ्या वाढदिवसाच्‍या नावे माझ्याच संघटनेच्‍या माध्‍यमातून माझ्या लोकांकडून पैसे  गोळा करणे मला योग्य वाटत नाही. कृपया क्षमस्‍व'.
निळू भाऊंसोबत काम करताना या दोन घटना मला नेहमीच लक्षात राहिल्‍या. प्रसिध्‍दीच्‍या झोतात राहूनही लहानपणापासून मिळालेले सेवा दलाचे संस्‍कार त्यांनी अखेर पर्यंत जपले. चित्रपटातून खलनायकाची भूमिका वठवणारा हा कलावंत प्रत्यक्षात मात्र माझ्या सारख्‍या अनेक कार्यकर्त्यांसाठी नायक होता. आयुष्‍याच्‍या रंगमंचावरून  या नायकाची एक्झिट चटका लावणारी आहे.
ND
ND
निळू फुले शाळामास्तरीणीशी बोलताना खास आवाजात "पण बाई आम्ही काय म्हणतो.."
एका चित्रपटात
पोलिस- बलात्कार तुम्हीच केलात का?
फुले- हो
पोलिस-कधी केलात?
फुले-(काहीतरी वेळ सांगतात)
पोलिस-कुठे केलात ती जागा दाखवा.
फुले- साहेब, साखर बेडरुममध्ये खाल्ली काय संडासात खाल्ली काय, गोडच लागते.!!
आमच्या घराण्यात गलास फोडल्याचे बारा आणे कधी कुणी भरले नाहीत. पोरानं दारु प्यावी, मास्तराला मारावं, हवालदाराच्या कानफटात ठेऊन द्यावी आन बापानं नायतर आज्यानं सगळं नुसतं करंगळीवर निभाऊन न्यावं....
.निळूभाऊ: हे बगा इनिसप्याक्टर...
इन्स्पेक्टरः मांजरेकर!
निळूभाऊ: क्वॉकनातले क्यॅय?
इन्स्पेक्टरः हो!
निळूभाऊ: तर्रीपन ऐकायचं! ते तुमचं काय डायर्‍या, यफाराय, पंचनामा जितं कुटं युवराजांचं नाव असंल तितं काट मारायची......येवड्यासाठी मला शीयेम ना फोन करायला लाऊ नका! ते सोत्ता इथं येतील.
बाकी....पोरीला साडीचोळी..ह्ये$$$ आमी करु! आवो खानदानी पध्दतय ती आमची!
बाई, अहो आपला स्वतःचा येव्हडा वाडा असताना तुम्ही त्या पडक्यात राहणार ? तुम्हाला तिथे बघुन, आम्हाला हिकडं रातीला झोप यायची नाही.
ह्म्म्म. जाधव शीएमला फोन लावा, सांगा आम्ही बोलणारे म्हणाव.
निळूभाऊ- मास्तर तुम्ही जेवणार नसला तर आम्ही बी जेवणार नाही.
श्रीराम लागू - आम्ही तुम्हाला आमच्यावर प्रेम करण्याचा हक्क दिलेला नाही.
(सिंहासन)
निळुभाउ : मास्तर हे काय सोंग?
लागू : तो आमचा राजमुकुट आहे
(सिंहासन)
गावातल्या अनेक लोकांना अजुन २ वेळचं प्र्ण जेवण मिळत न्हाय, उपाशी झोपतात पोरं.
तुम्ही आम्लेट घ्या ...
(सामना)
काय करणार, जुनी खोड, स्वतःलाही सोडलं नाही. नको त्या वेळेला नको ते प्रश्न विचारणारच : इति मास्तर (सामना)
मारुती कांबळेचं काय झालं?" (सामना)
"अरे मास्तरांना दूध भातात साखर घालून दे"(सामना)
निळू फुले यांच्या निधनाचे वृत्त समजताच येवला तालुक्यातील (जि. नाशिक) आपला पूर्वनियोजित दौरा रद्द करून श्री. भुजबळ यांनी पुणे येथे धाव घेतली. येथील वैकुंठ स्मशानभूमीत निळू फुले यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांनी श्रद्घांजली वाहिली. त्यावेळी ते बोलत होते.
निळू भाऊंचा पहिला चित्रपट म्हणजे एक गाव बारा भानगडी. यानंतरचे त्यांचे मराठी चित्रपट- पैजेचा विडा , जिद्द , भालू , फटाकडी , हीच खरी दौलत , कडकलक्ष्मी , पैज , सतीची पुण्याई , सवत , आई , लाथ मारीन तिथं पाणी , भन्नाट भानू , बिळावर नागोबा , दीड शहाणे , हळदी कुंकू , आघात , रिक्षावाली , कळत नकळत , मालमसाला , पटली ते पटली , एक होता विदुषक , एक रात्र मंतरलेली , प्रतिकार , जन्मठेप , सेनानी साने गुरूजी , पुत्रवती चटक चांदणी , गल्ली ते दिल्ली , शापित , बायको असावी अशी , पायगुण , राघुमैना , जगावेगळी प्रेमकहाणी , दिसतं तसं नसतं , रावसाहेब, सामना , सोबती , चोरीचा मामला , सहकारसम्राट , सासुरवाशीण , नणंद भावजय , अजब तुझे सरकार , पिंजरा , शापित , भुजंग , सिंहासन , रानपाखर , मुक्काम पोस्ट ढेबेवाडी , धरतीची लेकरं , गणानं घुंगरू हरवलं , आई उदे गं अंबाबाई , लाखात अशी देखणी , हऱ्या नाऱ्या जिंदाबाद , वरात , पदराच्या सावलीत , सोयरीक , बन्याबापू , भिंगरी , जैत रे जैत , मानसा परीस मेंढरं बरी , नाव मोठं लक्षण खोटं , चांडाळ चौकडी ,सर्वसाक्षी , आयत्या, राणीने डाव जिंकला
निळू फुलेंचे हिंदी चित्रपट:
अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांचा कुली हा चित्रपट सर्वाधीक गाजला.  सारांश , जागो हुआ सवेरा , सूत्रधार , इन्साफ की आवाज , कॉंच की दीवार , मशाल , सौ दिन सास के , जुगलबंदी , जरासी जिंदगी , गुमनाम है कोई , रामनगरी , नागिन, भयानक , घर बाजार , दिशा , गरिबों का दाता , उँच नीच बीच , औरत तेरी कहानी , मोहरे , कब्जा , हिरासत ,  दो लडके दोनो कडके , कानून का शिकार , मेरी बिबी की शादी , दुनिया , जख्मी शेर , वो सात दिन , नरम गरम
निळू फुले यांची गाजलेली नाटकं:
निळूभाऊंच्या रूपाने मराठी चित्रपटांना एक टॉनिक मिळालं होतं. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टी रिती झाली असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले आहे. ते माणूस म्हणून अत्यंत चांगले होते.
आपण त्यांच्यासोबत जरी अनेक चित्रपटात काम केले नसले तरी एक व्यक्ती म्हणून आपण त्यांना चांगले ओळखत होतो. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रसृष्टी पोरकी झाल्याचे मत सुलोचना ताईंनी व्यक्त केले आहे.
WD
WD
त्यांच्यातल्या अभिनेत्याचा जन्म फार लहानपणीच झाला होता. निळूभाऊंना लहाणपणापासूनच नकलांची आवड. शिक्षकांच्या नकला ते करून दाखवायचे. मग शिक्षकांनाही त्यांना प्रोत्साहन दिले. त्यातूनच नाटकाची आवड जोपासली गेली. याच काळात देशात स्वातंत्र्याचे आंदोलन चालले होते. त्यांचे बंधू दत्तात्रय हे या आंदोलनात होते. त्यांना शिक्षाही झाली होती. त्यांचीच प्रेरणा घेऊन हान असले तरी चिठ्ठ्या पोहोविणे, निरोप देणे ही कामेही त्यांनी केली. चळवळीशी त्यांचा संबंध आला तेव्हापासून. याच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रसेवा दल या दोन्ही संघटना फार्मात होत्या. निळूभाऊ खेळायसाठी म्हणून संघाच्या शाखेवर जायचे. पण त्यांच्याबरोबर दलित, ख्रिश्चन आणि इतर जातीतील मुलंही असायची. दलित आणि मुस्लिम मुलांना आणू नका, असे तिथल्या शाखा प्रमुखांनी सांगितले. त्यामुळे मग संघ सुटला. मग तिथे राष्ट्रसेवादलाशी संबंध आला. तिथे मात्र सर्वधर्मियांना येण्याची मुभा होती.
सेवादलातच त्यांना राम नगरकर, लीलाधर हेगडे, वसंत बापट ही मंडळी भेटली. निळूभाऊंच्या अभिनयाचा पाया कलापथकाने घातला. या कलापथकाद्वारे प्रबोधन आणि मनोरंजन यांचा संयोग साधून लोकनाट्ये व्हायची. त्यातला अर्धा भाग लिखित आणि अर्धा स्वयंस्फूर्त असायचा.मग व्यावसायिक नाटकात त्यांनी पदार्पण केले. कथा अकलेच्या कांद्याची, सखाराम बाईंडर, सूर्यास्त, जंगली कबुतर ही नाटके मिळाली. दहा एक हजार प्रयोग केले. कथाचे दोनेक, जंगली कबूतरचे दीडेक हजार, सखारामचे आठशे प्रयोग केले.
मग दिग्दर्शक अनंत मानेंनी त्याच्यातला गुणी अभिनेता हेरला आणि 'एक गाव बारा भानगडी'मध्ये झेले अण्णाची भूमिका दिली. ही भूमिका अजरामर झाली. शंकर पाटलांनी लिहिलेला हा चित्रपट होता. मराठी आणि कानडी सीमेवरील ही व्यक्तिरेखा होती. शंकर पाटलांकडे जाऊन पंधरा दिवस तेही भाषा शिकले. यानंतर मग त्यांच्याकडे चित्रपटांची रांग लागली. सामना, सिंहासन, शापित हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. त्यांनी अनेक हिंदी सिनेमेही केले. त्यापैकी ‘ कुली , गुमनाम है कोई , जरा सी जिंदगानी , रामनगरी , नागिन - २ ’ यात त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. पण मराठी चित्रपटाला त्यांचा बेरकी, खलनायकी पाटील किंवा सरपंचच जास्त गाजला.
व्यक्तिरेखा खलनायकी असल्या तरी निळूभाऊ अत्यंत भला माणूस होते. ते म्हणायचे, की ' प्रत्येक कलावंताला आपल्या भूमिकेला न्याय दिला पाहिजे. मी माझ्या जीवनात अत्यंत साधा आहे, पण पडद्यावर मात्र खलनायक. पण मी या भूमिका किती प्रभावीपणे करतो हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच आजही मी सामाजिक कामाच्या निमित्ताने खेड्यापाड्यात जातो, तेव्हा माझ्या पडद्यावरची खलनायकी भूमिका किती प्रभावी आहे याची पावती मिळते. गावातल्या शिक्षिका, नर्स, गृहिणी माझ्यापासून दूर रहातात. त्यांना वाटते, की पडद्यावरचा निळू फुले प्रत्यक्षातही तसाच वागतो की काय?'
चित्रपटातल्या भूमिकांनी निळू फुले देशभर पोहोचले असले तरी नाटक हीच त्यांची मूळ आवड आहे. 'नाटक करताना मजा येते, असं ते म्हणायचे. नाटक करताना सावधगिरी बाळगावी लागते. तुमच्या प्रत्येक संवादावर लगेचच प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असते. तिथेच खर्‍या अभिनेत्याची कसोटी लागते, असं ते म्हणत.
अभिनयासाठी त्यांना महाराष्ट्र सरकारने तीन वेळा ‘ उत्कृष्ट अभिनेता ’ हा पुरस्कार देऊन गौरविले . संगीत नाटक अकादमी , अनंतराव भालेराव पुरस्कार आदी पुरस्कारही त्यांना मिळाले होते .