तयारी सीईटीची
WD
<!--endImage--> इंजिनियरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणार्‍या एमटी-सीईटीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया बारावीची परीक्षा संपल्यानंतरही किमान आठवडाभर सुरू ठेवण्याचे तं‍त्रशिक्षण संचालनालयाने निश्चित केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या काळात अर्ज भरण्याचा त्रास वाचणार आहे. 
यंदा एमटी-सीईटीची सर्व प्रक्रिया डीटीई तर्फे पार पाडली जाणार आहे. त्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. 
बारावी सायन्स शाखेचा अखेरचा पेपर 26 मार्चला आहे. त्यानंतर किमान आठवडाभर म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी विद्यार्थ्यांना अर्ज भरायची मुदत ‍‍मिळेल. ]]></content:encoded>
WD
<!--endImage--> नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट अर्थात नेटच्या स्वरूपात बदल होत आहे. यापूर्वी परिक्षेचा तिसरा पेपर दीर्घोत्तरी स्वरूपात घेतला जात असे. मात्र, यापुढील काळात तिसर्‍या पेपरसह ही परीक्षा पूर्णपणे वस्तुनिष्ठ स्वरूपात घेण्यात येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या  (यूजीसी) राष्ट्रीय शैक्षणिक परीक्षा मंडळातर्फे दरवर्षी नेट घेण्यात येते. या परीक्षेद्वारे  कॉलेजमध्ये प्राध्यापक होण्यासाठी तसेच कनिष्ठ संशोधक शिष्यवृत्तीसाठी आवश्यक पा‍त्रता  ठरविण्यात येते. वर्षातून दोन वेळा, जून आणि डिसेंबर महिन्यात प्रत्येकी एकदा ही परीक्षा  आयोजित केली जाते. त्यात तीन लेखी पेपर असतात. यापूर्वी परीक्षेचा तिसरा पेपर दीर्घोत्तरी  स्वरूपात घेतला जात असे. मात्र, यापुढील काळात तिसर्‍या पेपरसह ही परीक्षा पूर्णपणे  वस्तुनिष्ठ स्वरूपात घेण्यात येणार आहे. या तिन्ही पेपरसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह  मार्किंग स्कीम नाही. या बदललेल्या स्वरूपाचे ठळकपणे सांगता येणारे काही फायदे तर काही तोटे पुढीलप्रमाणे.... 
फायदे
उत्तरपत्रिका तपासताना व्यक्तिनिष्ठतेऐवज वस्तुनिष्ठतेने मूल्यमापन होईल, पेपर तपासणीविषयीची संदिग्धता कमी होईल, पेपर अपूर्ण राहण्याची शक्यता कमी होईल, निकाल  लकवकर मिळणे शक्य होईल. 
तोटे 
व्याख्यात्याच्या स्वतंत्र विचार मांडण्याच्या कौशल्यावर गदा आली, परीक्षा स्मृतिधिष्ठित बनली, अभ्यासाचा आवाका खूप वाढला. या स्वरूपाचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे वस्तुनिष्ठ  प्रश्न आणि त्यासाठी करावी लागणारी तयारी. बदललेल्या स्वरूपामुळे अभ्यासाची दिशा आणि  अभ्यासाची पद्धतही बदलावी लागणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी पुढील बाबींचा विचार  करावा. 
सखोल अभ्यास 
परीक्षेच्या वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपामुळे विषयाचा सखोल अभ्यास करावा लागणार आहे. तिसर्‍या पेपरमधले प्रश्न प्रामुख्याने आकलन उपयोजित कल आणि सखोलता तपासणारे असेल, तरी त्या त्या विषयांचा सर्वांगाने आणि खोलात जाऊन अभ्यास करणे गरजेचे आहे. 
सरावला नाही पर्याय 
बहुपर्यायी प्रश्न सोडविण्याचा कसून सराव करावा लागणार आहे. अशा सरावामुळे ऐन परीक्षेत उत्तरपत्रिकेवर काळ्या शाईने अचूक पर्याय रंगवणे सोपे जाईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ओएमआर उत्तरपत्रिकेवर सराव करायला हवा. 
स्वप्रयत्नांवर भर 
अभ्यास करताना महत्त्वाचे वाटणारे संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्न लगेच अधोरेखित करा किंवा लिहून काढा. जर तुम्ही स्वत:च वस्तुनिष्ठ प्रश्न तयार केलेत तर अभ्यास चांगला होण्यासाठी मदतच होईल. 
घड्याळाकडे लक्ष 
या नव्या आणि बदललेल्या स्वरूपामुळे वस्तुनिष्ठ प्रश्नांचा विचार करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळणार आहे. तरीही एका प्रश्नासाठी किती वेळ द्यायचा, त्याचे नियोजन  करायलाच हवे. प्रत्येक प्रश्नासाठी साधारणपणे दीड ते दोन मिनिटांचा वेळ मिळेल. 
अचूकतेवर भर 
बहुपर्यायी प्रश्न सोडविण्यासाठी अचूक पर्याय निवडण्याचे कौशल्य विकसित करा. निगेटिव्ह मार्किंग नसेल तरी अचूक उत्तरे लिहिण्याचा असा प्रयत्न केल्याने तुमचा फायदाच होईल. 
एकमेका साह्य करू 
एकट्याने अभ्यास करण्यापेक्षा ग्रुपमध्ये अभ्यास करा. तेव्हा चर्चा करा. वादविवाद घाला. अशाप्रकारचा अभ्यास जास्त लक्षात राहतो.]]></content:encoded>
      <content:encoded><![CDATA[देशातील 11 नामांकित राष्टीय विधी महाविद्यालयात पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रवेश परीक्षा घेतली जाते. वर्ष 2009च्या चालू वर्षाला प्रवेश घेण्यासाठी कॉमन लॉ टेस्ट (सीएलएटी) दि. 17मे रोजी घेतली जाणार आहे. 
प्रवेश परीक्षाचे अर्ज 12 जानेवारीपासून सगळ्या केंद्रावर उपलब्ध केली जाणार आहेत. परीक्षार्थ्यांनी  पूर्ण भरलेले अर्ज दि.10 एप्रिलपर्यंत संबंधीत केंद्रावर जमा करावयाची आहेत.
भोपाळसह देशातील 20 शहरात ही परीक्षा घेण्यात येणार आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या निवडक शाखा तसेच प्रत्येक राष्ट्रीय विधी महाविद्यालयात प्रवेश परीक्षेचे अर्ज दि. 12 जानेवारीपासून उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यंदाच्या वर्षी तीन महाविद्यालये वाढविण्याचा विचार शासनाने केला आहे. 2009 वर्षाच्या प्रवेश परीक्षेची संपूर्ण जबाबदारी हैद्राबाद येथील नाल्सार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ कडे सोपवण्यात आली आहे. 2010 मध्ये होणार्‍या सीएलएटीची जबाबदारी भोपाळ येथील नॅशनल इन्स्टीट्यूट युनिव्हर्सिटीला मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय विधी महाविद्यालयाची नावे:
1) नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बेंगळूरू.
2) नाल्सार युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, हैद्राबाद.
3) नॅशनल इन्स्टीट्यूट युनिव्हर्सिटी ऑफ भोपाळ.
4) नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, जोधपूर.
5) हिदायतुल्ला नॅशनल लॉ इन्स्टीट्यूट युनिव्हर्सिटी, रायपूर.
6) गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, गांधीनगर.
7) डॉ. राममनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, लखनऊ.
8) चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, पटना. 
9) राजीव गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लॉ, पटीयाला. 
10) बंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ जूरी‍डीशियल सायंस, कोलकत्ता. 
11) नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅडव्हान्स लीगल स्टडीज, कोची.]]></content:encoded>
      <content:encoded><![CDATA[आयआयटी-जेईई ही परीक्षा सर्वात कठिण परीक्षांमध्ये गणली जाते. अभियांत्रिकी परीक्षांची तयारी करणारा प्रत्येक विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छितो. म्हणूनच दरवर्षी जवळपास दोन लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. आणि त्यातील फक्त तीन हजार विद्यार्थीच पास होतात.
दोन लाख विद्यार्थ्यांमधून फक्त तीनच हजार विद्यार्थी का बरे पास होतात? याच तुम्ही कधी विचार केलाय? ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थी जीव तोडून प्रयत्न करतात, पण ज्या विद्यार्थ्यांची रणनीती अचूक असते, तेच यशस्वी होतात.
साधारणपणे या परीक्षेची तयारी केव्हापासून सुरू करावी हा प्रश्न प्रत्येकाला भेडसावत असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांजवळ तीन पर्याय असतात.... 
* बारावीनंतर ड्रॉप घेऊन
* अकरावीदरम्यान 
* बारावीत असताना
आयआयटी-जेईईच्या सध्याच्या अभ्यासक्रमानुसार, विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी फक्त दोनच संधी मिळतात. पहिली, विद्यार्थी बारावीत असताना आणि दुसरी तो बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला असेल त्यावेळी. अशा परिस्थितीत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच या परीक्षेचा अभ्यास सुरू करणे योग्य ठरेल. दहावी उत्तीर्ण झाल्याच्या काळात एकतर विद्यार्थी उत्साही असतो आणि आव्हान स्वीकारण्याची त्याची तयारी असते. 
विद्यार्थ्याच्या मुलभूत संकल्पना स्पष्ट असतील तर त्याला फार अडथळे येत नाहीत. त्यासाठी आवश्यक आहे अचूक रणनीती आणि काही छोट्या-छोट्या गोष्टीवर लक्ष देण्याची. त्यामुळे या परीक्षेसाठी आधीच एक रणनीती आखा आणि खाली दिलेल्या गोष्टींवर लक्ष द्या....
आत्मविश्वास:
सुरवात नेहमी सकारात्मक दृष्टिकोण आणि आत्मविश्वासाने करावी. परीक्षेसंबंधात कुठलीही द्विधा मनस्थिती ठेवू नका. 'मी सर्व करू शकतो' असे मानून स्वतः:वर विश्वास ठेवा.
तयारीः 
या परीक्षेची तयारी अकरावीतच सुरू करा. पहिल्या शंभरात येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये अशाच विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते.
नेमके मार्गदर्शन:
परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग क्लास आणि पत्राद्वारे देण्यात येणार्‍या अभ्यासक्रमाची निवड करताना आधी त्यासंबंधी संपूर्ण माहिती मिळवा. त्यानंतरच निवड करा.
लक्ष केंद्रीत करा:
एकाबरोबर बरेच कोर्स किंवा पुस्तकांपेक्षा एखाद्या अनुभवी विद्यार्थ्यांचा सल्ला घेऊन कोणत्याही एका कोर्सपासून तयारीला लागा. त्यामुळे तुमचा गोंधळ होणार नाही.
अभ्यासाचे वेळापत्रक बनवा:
कोणत्याही परीक्षेची तयारी करताना आधी अभ्यासाचे वेळापत्रक बनवा आणि आपले ध्येय केंद्रित ठेवून या वेळापत्रकाची अंमलबजावणी करायला सुरुवात करा.
आपले कच्चे दुवे ओळखा:
जो विषय किंवा मुद्दा कठीण वाटतो, त्यावर अधिक लक्ष देऊन आपला कच्चा दुवा पक्का करण्याचा प्रयत्न करा.
गुणवत्तेकडे लक्ष द्या :
तुम्ही किती प्रश्न सोडवीत आहात यापेक्षा तुम्ही ते कसे सोडवीत आहात हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे असे प्रश्न सोडवा जे कठीण असतील. कोणताही प्रश्न सोडून देण्यापेक्षा तो सोडविण्याचा प्रयत्न करा.
स्वतःचीच परीक्षा घ्या:
एखाद्यावेळी स्वत:चीच परीक्षा घ्या. त्यामुळे तुम्ही किती पाण्यात आहात याचा अंदाज येईल. तुम्ही स्वतः:ची जितकी जास्त परीक्षा घ्याल तितके ते तुमच्यासाठीच हितकारक ठरेल.
या सोबतच आपल्या मित्रांशी यासंबंधी चर्चा करीत राहा आणि तयारीच्या आधुनिक तंत्राची माहिती ठेवा. ]]></content:encoded>