दिलीप चित्रे
WD
<!--endImage--> 17 सप्टेंबर 1938 रोजी बडोदा येथे जन्मलेले दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे स्वातंत्र्योत्तर काळातील एक प्रभावी व प्रयोगशील नवकवी, कथाकार, समीक्षक व विचारवंत म्हणून ओळखले जातात.
भोवतालचे समाजजीवन, भाषा यातून प्राप्त होणारे परंपरेचे संचित, वाङ्‍मयीन रूपसंकल्पना नाकारणारा हा कवी इथिओपियात 3 वर्षे शिक्षक आणि नंतर इंडियन एक्सप्रेसच्या कलाविभागात अधिकारी होता. आपल्या वेगळेपणाची, जीवनातील असंबद्धतेची जाणीव, मृत्यूची अटळता आणि जबर जीवनेच्छा यांच्याबरोबरच भेडसावणारे एकाकीपण त्यांनी  आपल्या कवितेतून मांडले. त्यांच्या कवितेत ऐंद्रिय संवेदना व प्रेमाला महत्त्व दिल्याचे जाणवते. मराठीतल्या ‘शब्द’ ह्या पहिल्या अनितकालिकाचे प्रवर्तक असणार्‍या चित्रे यांनी ‘आधुनिक कवितेला सात छेद’, ‘शतकाचा संधिकाल’ अशा लेखमाला  लिहिल्या. ‘कविता’, ‘पुन्हा कविता’ असे काव्यसंग्रह लिहिले. ‘सफायर’,‘रुधिराक्ष’ या लघुकादंबर्‍यांबरोबरच तुकारामांच्या  निवडक अभंगांचा आणि ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचा इंग्रजी अनुवाद केला.
ND
ND
<!--endImage--> वैशाली, स्वतःच्याच घरात येऊन आज पंधरवडा उलटला. या पंधरा दिवसातला प्रत्येक दिवस उदास नि चिंतेत ढकलणारा गेला. जवळपासहून मिळणारी किंवा लांबून येणारी प्रत्येक बातमी काही तरी अस्वस्थ करणारी किंवा भय देणारी ठरली आहे. कधी काळी एम्नी सेजेयरची एक दीर्घकविता वाचली होती, 'रिटर्न टू माय नेटिव्हलॅंड'. आपण आपली भाषा आणि समाजाप्रती इतके विन्मुख का होतो? 
इतक्या दिवसांनंतरही पुन्हा औदासिन्य आणि एकलेपणाचीच चर्चा करायला लागलो, असं तुम्ही म्हणाल, ठीक आहे, हे इथेच सोडून देतो. पण हा ब्लॉग हीच अशी जागा आहे, जिथे मी माझं दुःख आणि आनंद नेहमीच तुमच्याबरोबर वाटत राहिल. हे म्हणजे स्वतःच स्वतःशी संवाद साधल्यासारखे आहे किंवा आपल्यापासून सुटे होत इतरांपर्यंत किंवा मुक्तीबोधांच्या शब्दांत सांगायचं तर कुण्या आत्मिक सहचराशी किंवा समानधर्मीपर्यंत पोहोचण्यासारखे आहे. 
जवळपास दोन महिने मी जर्मनीत होतो. चार दिवस फ्रान्समध्ये. तब्बल बावीस कार्यक्रम. कवितावाचन, व्याख्यान आणि मुलाखतीचे. तेही वेगवेगळ्या शहरांत, वेगवेगळ्या तारखांना. काही जर्मन मित्रांनी तर सांगूनही टाकलं, आमचा देश आम्ही जितका नाही, पाहिला तेवढा तुम्ही पाहूनही टाकला. 
प्रवास नि प्रवास. 
(अरेरे ! हे काय झालं? मी हे टाईपच करतो आहे आणि हा आघात झाला.....
आमचे प्रिय मित्र आमच्या समकालीन सर्वोत्कृष्ट कवींपैकी एक असलेले दिलीप चित्रे यांचे निधन झाले... 
काही वेळापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांना कर्करोग झाला होता. फेसबुकवर नेहमी ते भेटत असत. शेवटपर्यंत ते प्रसन्न आणि चैतन्यशील होते. 
हा अतिशय शोकात्म असा काळ आहे. १९७५ पासून त्यांच्याशी परिचय होता. त्यावेळी ते गोदान नावाचा चित्रपट बनवत होते. २००६ च्या फ्रॅंकफर्ट जागतिक पुस्तक मेळाव्यात आम्ही बरोबर होतो. अगदी आत्ताच गेल्या वर्षी दिल्लीतील जागतिक पुस्तक मेळ्यातही ते भेटले होते. 
त्यांचे जीवन एकीकडे सृजनात्मकतेच्या शिखराला स्पर्श करत होते, त्याचवेळी वैयक्तिक जीवनात अनेक दुःखद घटनांशी आणि वेदनांशी ते झगडत होते. हे फार कमी लोकांना माहिती आहे, की त्यांचा मुलगा भोपाळच्या वायू दुर्घटनेचा बळी ठरला होता.  त्याच्या मृत्यूने ते आतून पार हलले होते. 
ते एक अस्सल कवी आणि लेखक होते. 
त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करायला हवी. आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. )
मराठीतील सारे मित्र यावेळी या धक्क्यात असतील. मला ही बातमी काही वेळापूर्वीच उडिया कवी मनू दास यांनी कळवली. 
दिलीप चित्रे यांचे वेबवर एक खासगी आयुष्यही होते. त्यात ते काही ना काही लिहित असायचे. आता मात्र ती जागा कोरी राहिल. कायमचीच.
( उदय प्रकाश हे हिंदीतील मान्यवर लेखक आहेत. त्यांच्या ब्लॉगवरून साभार.)
(अनुवाद-अभिनय) ]]></content:encoded>
PR
PR
<!--endImage--> दिपुंच्या 'एकूण कविता' हा कविता संग्रह नव्वदीच्या दशकात तीन खंडात प्रकाशित झाला. इंग्रजीतही ते लिहित. ट्रॅव्हलिंग इन द केज हा त्यांचा इंग्रजी कवितांचा  संग्रह. 'एन एंथ्रोपॉलॉजी ऑफ मराठी पोएट्री' हा इंग्रजी ग्रंथही त्यांनी संपादित केला. भाषांतराच्या बाबतीतही दिपुंनी फार थोर काम केले आहे. संत तुकारामांच्या  अभंगाचा 'सेज तुका' या नावाने अनुवादीत ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथाने तुकोबांना 'ग्लोबल' केले. केवळ तुकारामच नव्हे तर ज्ञानेश्वरांचे अनुभवामृतही त्यांनी  इंग्रजीत नेले. त्यांची अनेक पुस्तके हिंदी, गुजराती, जर्मन भाषांत अनुवादित झाली. अनेक वृत्तपत्रे व नियतकालिकांसाठी त्यांनी मराठी व इंग्रजीतून स्तंभलेखन  केले. शब्द या लघुनियतकालिकाच्या संपादनाबरोबर 'न्यू क्वेस्ट'चेही ते संपादक होते. ऑर्फियस हा त्यांचा एकमेव कथासंग्रह. त्यांचे अनेक लेखन अजूनही प्रकाशित झालेले नाही. 
त्यांची लेखनसंपदा अशी-
कविता
ऑर्फियस
शीबा राणीच्या शोधात 
कवितेनंतरच्या कविता 
चाव्या
दहा बाय दहा 
मिठू मिठू पोपट आणि सुतक 
तिरकस आणि चौकस 
पुन्हा तुकाराम 
शतकांचा संधीकाल 
भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा 
एकूण कविता १, २, ३ 
चतुरंग 
इंग्रजी 
एन एथ्रॉपॉलॉजी ऑफ मराठी कविता, एब्म्युलन्स, ट्रॅव्हलिंग इन द केज, द रिझनिंग व्हिजन, टाटा, टेंडर आयर्निज,  श्री ज्ञानदेव्ज अनुभवामृत, द माऊंटेन, नो मून मंडे, ]]></content:encoded>
ND
ND
<!--endImage--> शेवटी एखादी बातमी इतकी वाईट कशी असू शकते? इतकी वाईट की तीच सांगतेय दिलीप चित्रे यांचे निधन झाले आहे...
इतक्या वाईट बातम्यांचा त्याचवेळी गळा का दाबला जात नाही? 
जगातल्या चांगल्या गोष्टींना 'मृत्यू' देणार्‍या अशा सगळ्या वाईट बातम्यांना प्रसारीत व्हायची परवानगीच नको मिळायला. काही वेळापूर्वीच उदय प्रकाश यांनी  (हिंदीतील प्रसिद्ध साहित्यिक) बातमी दिली, दिलीप चित्रे यांचे निधन झाले. उदय काय सांगतोय ते क्षण-दोन क्षण कळलेच नाही. कळले तेव्हा, वाटलं,  की ही बातमी खोटी असल्याचं जोरजोरात ओरडून सांगू. शिव्या देऊ, काही स्वतःला, काही जगाला, काही या मृत्यूचे नियंत्रण करणार्‍या नियंत्याला. 
मग काही वेळाने दिलीपभाईचा हसरा चेहरा समोर आला. तेव्हा रडू आवरले नाही. आणखी काही वेळ गेला नि त्याच्या आठवणी चित्रपटासारख्या डोळ्यासमोरून  सरकू लागल्या. 
दिलीप चित्रे आणि भोपाळ. भारत भवनमधील वागर्थ या कवितांविषयक विभागाचे ते संचालक होते. भोपाळमध्ये आल्या आल्या त्यांचे निरिक्षण तरी बघा काय होते! म्हणे, 'यार, हे तर नंबरी लोकांचे शहर आहे.' भोपाळमध्ये रहिवासी भागांची नावे 1250,1464,1100 क्वार्टर्स, 74 बंगले, 45 बंगले, 8 बंगले व 4  बंगले अशी आहेत. त्यांचे हे गमती गमतीत केलेले निरिक्षण पुढे त्यांच्याच बाबतीत वास्तव म्हणून उभे ठाकले. भोपाळच्या 'नंबरी' लोकांनी त्यांचे 'नंबरीपण' दाखवून दिले....
ही गोष्ट १९८१ किंवा ८२ ची असावी. इंदूरमध्ये जाणार्‍या एका बसमध्ये दिलीप आणि त्यांची पत्नी विजया बसल्या होत्या. त्यांच्या मागच्याच सीटवर मी बसलो  होतो. पण त्यांना हे माहित नव्हते. इंदौरमध्ये दलित साहित्यविषयक चर्चा होती. विजयाजींनी विचारले, 'दिलीप, इंदौरमध्ये कुठे नि कसे पोहोचायचे ते माहित  आहे ना?'
'राणी साहेब, चिंता करू नका. तिथे बस स्टॅंडवर आपल्यासाठी रथ आलेला असेल. तो आपल्याला घेऊन जाईल.' 
दिलीपजींना घेऊन जाण्यासाठी मध्य प्रदेश साहित्य परिषदेचे अधिकारी पूर्णचंद्र रथ येणार होते. रथाला हा संदर्भ होता. 
मागून मी आवाज दिला. 'दिलीप भाई, रथ मिळेल न मिळेल, तुम्ही माझ्या रिक्षातून येऊ शकता.' त्यांनी  मागे वळून पाहिले, नि म्हणाले, 'नक्की. रथालाही रिक्षातच टाकून घेऊ. आणि काय?'
या आनंदी नि सदाउत्साही व्यक्तीशी मृत्यूने क्रूर खेळ खेळला. त्यांचा तरूण मुलगा आशय त्यांच्यापासून हिरावून घेतला. आशय १९८४ च्या भोपाळ विषारी वायू दुर्घटनेचा बळी ठरला. १९ वर्षे तो आजाराशी झुंजला आणि २००३ मध्ये दिलीपभाई आणि विजयाजींना एकटे सोडून गेला. 
या धक्क्याने हे दाम्पत्य कोसळलेच होते. पण तरीही त्यांनी परस्परांना सावरले. परस्परांना जगण्यासाठी उत्तेजन देण्यामागचे इंगित एकच होते- आणखी  चांगले जगून दाखविणे. जगातल्या प्रत्येक अशा गोष्टीशी निगडित होणे की त्यामुळे जगण्याला नवा अर्थ लाभेल. विस्तार होईल. या गोष्टीमुळे इतरांच्या जगण्यात  नवे रंग भरता येईल. जगण्याचा उत्साह वाढवेल. 
आजही माझ्या ई- मेल बॉक्समध्ये दिलीप भाईंनी पाठवलेली शेकडो निमंत्रण पत्रे पडली आहेत. कधी कुठल्या कार्यक्रमाची. कधी कुठल्या पुस्तकाची, किंवा कुठली  कविता, लेख. सोशल नेटवर्किंग साईट्सच्या नेटवर्किंग ग्रुप्सचे सदस्य होण्यासाठीची निमंत्रणे. काहीच नसेल तर फेसबुकमार्फत पाठवलेल्या शुभेच्छा. फुलांचा गुच्छ  वा रोप. 
आतापर्यंत ते कितीतरी आजारांनी ग्रस्त होते. त्यांना आतड्याचा कर्करोगही होता. मला बर्‍याच उशिरा हे कळले. कळल्यानंतर त्याच दिवशी मी त्यांना  एक मेल पाठवला. 
दिलीप भाई 
दुःखात आहे. 
नेहमीच तुमच्या आजाराची बातमी कळत असते. पण तुम्हाला आतड्याचा कर्करोग आहे, हे माहित नव्हते. 
या क्षणी मी स्वतःला इतका लाचार समजतो आहे, की जणू माझे हात-पाय बांधून कुणी फेकून दिले आहे आणि मी असहायरित्या पहातो आहे. पण एकच उमेद  आहे.- तुमचा चिवटपणा आणि विजीगीषी वृत्ती. तुमच्याविषयीची बातमी कळत नाही, असे होत नाही. तुमची सक्रियता ठळकपणे दिसून येते. पण त्यावेळी कधी  वाटलेच नाही, की तो 'परमेश्वर' तुमच्याशी काही खेळ खेळतोय ते. 
पण एक कानगोष्ट सांगतो दिलीपभाई, हा परमेश्वर आपल्या प्रियजनांशी जे खेळ खेळतो ना ते हरण्यासाठी. मोठी माणसे नाही का लहान मुलांसोबत खेळताना  जिंकण्यापेक्षा हरण्यात आनंद मानतात ना तसे. 
मी आत्ताही तुम्ही विजयी होताना नि परमेश्वराला आनंदी होताना पहातोय. 
आमेन. 
बेपर्वाई आणि निष्काळजीपणाबद्दल माफी आणि प्रार्थनेसह, 
राजकुमार
दिलीप भाई मोठे होते. त्यांनी मला माफ केले. पण मी त्या परमेश्वराला कधीच माफ करणार नाही, ज्याने या दुनियेतून चांगल्या लोकांना उचलून आपल्याकडे  नेले.... 
(राजकुमार केसवानी हे हिंदीतील प्रसिद्ध पत्रकार आहेत. त्यांच्या 'बाजे वाली गली' या ब्लॉगवरून साभार) 
(अनुवाद- अभिनय)]]></content:encoded>
ND
ND
<!--endImage--> मराठीतील ख्यात कवी दिलीप चित्रे यांच्या निधनाने मी व्यथित झालो आहे. त्यांचे जाणे ही माझी व्यक्तिगत हानीही आहे. भारतीय सृजनशील परिप्रेक्ष्यात ते  बहुआयामी सर्जनशील आणि फार मोठे कवी होते. गेल्या काही वर्षांपासून आजारी असतानाही त्यांची सर्जनशीलता तितकीच उत्फुल्ल होती. म्हणूनच अनेक  पेंटिंग्जही ते करत होते. मानवी संस्कृती संदर्भात उत्पन्न होणार्‍या धोक्यांबाबत ते फारच सावध होते, शिवाय त्या विरोधात ते आपल्या कवितांमधूनही त्यावर  भाष्य करत होते. महाराष्ट्रात मनसेविरोधात त्यांनी आपला विरोध कोणत्याही दबावाविना व्यक्त केला. 
मराठी व इंग्रजीत लिहिलेल्या त्यांच्या कविता खूप वाचल्या गेल्या. त्यांच्या कवितांचे भारतीय आणि परदेशी भाषांतही अनुवाद झाले. मीही त्यांच्या कवितांचे  हिंदीत अनुवाद केला. 'दिलीप चित्रे की कविताएँ' या नावाने त्याचे पुस्तक प्रसिद्ध आहे. कवितांसह त्यांनी अनेक साहित्यकृतींचे अनुवादही केले. संत तुकाराम  आणि संत ज्ञानेश्वरांच्या अनेक कलाकृती त्यांनी इंग्रजीत नेल्या. त्यांच्या या कामाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले.  
बडौद्यात १९३९ मध्ये जन्मलेल्या 
दिलीपजींनी गोदान नावाचा वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटही बनविला. त्याचे कौतुकही बरेच झाले. त्यांनी फोटोग्राफीही केली. परदेश प्रवासही बरेच केले. त्यांची प्रवासवर्णने वाचण्यासारखी आहेत. त्यांनी इंग्रजीत 'मेकिंग लव्ह लाईक ए हिंदू' ही कादंबरी लिहिली. भोपाळच्या भारत भवनमध्ये १९८४ ते ८६ पर्यंत ते संचालक म्हणूनही होते. साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांची ग्रुप फोटो नावाची कविता विलक्षण आहे. ती खूप लोकप्रिय झाली. मुंबईवर लिहिलेल्या या कवितेत ऐतिहासिक, आर्थिक व सामाजिक परिप्रेक्ष्यात मुंबई कुणा एका समूहाची नाही, तर ती विकसित करण्यात मोठी सामूहिक शक्ती सहभागी आहे, असे म्हटले आहे. प्रख्यात बंगाली साहित्यिक महाश्वेता देवी यांनीही दिलीपजींचा मराठी परंपरेचे पुरूषार्थ असा गौरव केला होता. (शब्दांकन- रवींद्र व्यास) 
((श्री. देवताले हिंदीतील प्रख्यात कवी असून त्यांनी अनेक मराठी साहित्यकृतींचे हिंदीत अनुवाद केले आहेत.) ]]></content:encoded>
PR
PR
<!--endImage--> दिलीप पुरूषोत्तम चित्रे यांचा जन्म १७ सप्टेंबर १९३८ रोजी बडोद्यात झाला. त्यांचे वडिल हे साहित्यिक अभिरूची जपणारे होते. अभिरूची नावाचे एक नियतकालिकही ते चालवायचे. पुढे १८५१ मध्ये चित्रे कुटुंबिय बडोद्याहून मुंबईत स्थळांतरीत झाले. त्यानंतर साहित्यिक म्हणून ते वेगाने पुढे येऊ लागले. दिपुंचा पहिला कवितासंग्रह १९६० साली प्रकाशित झाला. मराठीत साठीच्या दशकात लघुनियतकालिकांची एक चळवळ सुरू झाली. दिपु या चळवळीचे एक अध्वर्यू होते. अरूण कोलटकर आणि रमेश समर्थ यांच्या जोडीने त्यांनी 'शब्द' हे लघुनियतकालिक सुरू केले. 
पुढे १९७५ साली अमेरिकेतील आयोवा शहरातील विद्यापीठाने त्यांना आंतरराष्ट्रीय लेखन कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले. इंडियन पोएट्री लायब्ररीत त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. तसेच भोपाळच्या भारतभवन या कला वास्तूच्या स्थापनेतही चित्रेंचा मोठा वाटा आहे. त्यांनी नवी दिल्लीत जागतिक कवींचे संमेलनही भरवले होते. 
त्यांच्या 'एकूण कविता' हा कविता संग्रह नव्वदीच्या दशकात तीन खंडात प्रकाशित झाला. इंग्रजीतही ते लिहित. ट्रॅव्हलिंग इन द केज हा त्यांचा इंग्रजी कवितांचा संग्रह. 'एन एंथ्रोपॉलॉजी ऑफ मराठी पोएट्री' हा इंग्रजी ग्रंथही त्यांनी संपादित केला. भाषांतराच्या बाबतीतही दिपुंनी फार थोर काम केले आहे. संत तुकारामांच्या अभंगाचा 'सेज तुका' या नावाने अनुवादीत ग्रंथ प्रसिद्ध आहे. या ग्रंथाने तुकोबांना 'ग्लोबल' केले. केवळ तुकारामच नव्हे तर ज्ञानेश्वरांचे अनुभवामृतही त्यांनी इंग्रजीत नेले. त्यांची अनेक पुस्तके हिंदी, गुजराती, जर्मन भाषांत अनुवादित झाली. अनेक वृत्तपत्रे व नियतकालिकांसाठी त्यांनी मराठी व इंग्रजीतून स्तंभलेखन केले. शब्द या लघुनियतकालिकाच्या संपादनाबरोबर 'न्यू क्वेस्ट'चेही ते संपादक होते.  
'दिपुं' चा ओढा चित्रपटांकडेही होता. गोदान हा त्यांनी बनविलेला पूर्ण लांबीचा चित्रपट होता. या चित्रपटाच्या सर्व बाजू त्यांनी सांभाळल्या होत्या. त्याशिवाय त्यांनी डझनभर वृत्तपट आणि कित्येक लघुचित्रपट तयार केले. वीस व्हिडीओ डॉक्युमेंटरी फिचर्स त्यांच्या नावावर आहेत. अनेक चित्रपटांच्या कथा, पटकथा त्यांनी लिहिले आणि अनेकांच्या दिग्दर्शनातही सहभाग घेतला. गोविंद निहलानी दिग्दशित शशी कपूर अभिनित 'विजेता'ची पटकथाही त्यांचीच होती. 
अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या अनेक पु्स्तकांना राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले आहेत. कित्येक संस्थांवर त्यांच्या नेमणूकाही झाल्या आणि अनेक संस्थांवर त्यांना मानद सदस्यत्व, संचालकपद आदी पदे देण्यात आली होती. जगभरातील अनेक देश त्यांनी पालथे घातले होते. त्याचवेळी भारतही उभा-आडवा फिरले होते. ]]></content:encoded>