अलविदा मुशर्रफ
      <content:encoded><![CDATA[राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना सत्तेवर हटवण्यासाठी परस्परांचे कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लिग (नवाज गट) यांच्यातील मतभेत आता तीव्र झाले आहेत. 
केवळ मुशर्रफ यांना पायउतार करण्यासाठी 1990 पर्यंत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणाऱ्या या पक्षांनी पाकमधील निवडणुकांनंतर एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. 
यानंतर निलंबित न्यायाधीशांच्या प्रश्नावरून या दोन्ही पक्षांमध्ये वाजले होते, परंतु कालांतराने मुशर्रफ यांनी आपली ताकद वाढवण्याचा पुन्हा प्रयत्न केल्याने या उभय पक्षांनी पुन्हा एकत्र येत मुशर्रफ यांच्या विरोधात मुसंडी मारली होती. 
आता मुशर्रफ पाडाव हे एकमेव उद्दिष्ट पूर्णं झाल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जोरदार वाद निर्माण झाले असून, निलंबित न्यायाधीशांच्या पुर्नबहालीच्या मुद्द्यावरून आयोजीत संयुक्त बैठकीत हे वाद चव्हाट्यावर आले. ]]></content:encoded>
      <authorname>वार्ता</authorname>
      <content:encoded><![CDATA[पाकचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्‍यावर दहशतवादी हल्‍ला होण्‍याची शक्‍यता लक्षात घेता पाक सरकारने त्‍यांना व्‍हीव्‍हीआयपी सुरक्षा देण्‍याचे निश्चित केले आहे. 
पाकिस्‍तानच्‍या अंतर्गत विषय मंत्रालयाच्‍या प्रवक्‍त्‍याने या संदर्भात माहिती देताना सांगितले आहे, की सुरक्षा आणि  गुप्‍तचर संस्‍‍थेने दिलेल्‍या अ‍हवालानुसार मुशर्रफ यांच्‍यावरील धोका लक्षात घेता त्‍यांना आवश्‍यक ती सुरक्षा पुरविण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.]]></content:encoded>
      <authorname>भाषा</authorname>
      <description><![CDATA[इस्लामाबाद, 
एकावेळी अमेरिकेलाही जवळ करायचे आणि त्याचवेळी कट्टरपंथीयांनाही दूर लोटायचे नाही, या दुटप्पी धोरणानेच मुशर्रफ यांच्यावर ही वेळ आल्याचे बोलले जात आहे.]]></description>
अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान अमेरिकेच्या दहशतवाद विरोधी मोहिमेचा साथीदार बनला होता. पण त्याचवेळी पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयचे तालिबानी अतिरेक्यांशी संबंधही पूर्वीसारखेच होते, असे न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.  
''मुशर्रफ यांनी शरीफ यांचे सरकार उलथवून सत्ता हाती घेतली तेव्हा अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. विशेषतः मदरशांचा प्रसार व त्यातून दिले जाणारे धार्मिक शिक्षण आणि त्यातूनच निर्माण होणारे अतिरेकी हे सगळे रोखण्यासाठी मुशर्रफ पुढाकार घेणार होते. पण त्यांनी मदरशांना हातही लावला नाही. त्यांनी याची सगळी जबाबदारी धार्मिक खात्याकडे दिली. पण या खात्याने मदरशांवरील कारवाईला नकार दिला, असे मुशर्रफ यांच्या मंत्रिमंडळात उद्योग मंत्री असलेल्या जहांगीर तरीन यांनी सांगितले. 
मुशर्रफ यांच्या कार्यपद्धतीत एक ठळक दोष होता, तो म्हणजे ते लोकशाही मार्गाच्या व नागरी राजकारणाचा तिरस्कार करत होते, असे मत तरीन यांनी नोंदविले.]]></content:encoded>
      <content:encoded><![CDATA[अमेरिकेने दहशतवादा विरोधात पुकारलेल्या युद्धात मुशर्रफ यांनी समर्पक साथ दिल्याचे स्पष्ट करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी पाकचे मावळते राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांची स्तुती केली आहे. 
मुशर्रफ यांनी घेतलेल्या काही खंबीर निर्णयामुळेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या काही भागातील दहशतवाद मोडून काढता आल्याचे बुश यांनी स्पष्ट केले. त्यांनी स्वतः: देशासाठी पदाचा त्याग केल्याने त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे बुश म्हणाले. 
बुश यांच्या पाठोपाठ अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कोंडालिजा राईस यांनीही मुशर्रफ यांच्यावर स्तुती सुमने उधळली आहेत. काही दिवसांपूर्वी राईस यांनी मुशर्रफ यांना अमेरिकेत आश्रय देणे अशक्य असल्याचे म्हटले होते. यानंतर आता त्यांनीही मुशर्रफ यांनी दिलेल्या आपल्या पदाच्या राजीनाम्यावर खूश होत, त्यांची तोंडभरून स्तुती केली आहे. 
मुशर्रफ यांच्यामुळेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दरम्यान सीमावर्ती भागात दहशतवादाचे उच्चाटन करण्यात उभय देशांना काही प्रमाणात यश मिळाल्याचे राईस म्हणाल्या. ]]></content:encoded>
      <authorname>वार्ता</authorname>
      <content:encoded><![CDATA[नेहमीच मुशर्रफ यांच्या कामाची तरफदारी करणाऱ्या डेमोक्रेटीक पक्षाने आता त्यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे. 
मुशर्रफ हे लोकशाही मार्गाने निवडून आले नसल्याने त्यांच्या सारख्या नेत्याला आता ब्लॅक चेक देणे अमेरिकेला परवडणार नसल्याचे मत राष्ट्राध्यक्ष पदाचे डेमोक्रेटीक पक्षाचे दावेदार बराक ओबामा यांनी व्यक्त केल्याने मुशर्रफ समर्थकांना चांगला धक्का बसला आहे. 
मुशर्रफ यांच्यावर ओबामा यांनी सुरवातीपासूनच टीकेची झोड केल्याने ओबामा यांचे हे वक्तव्य फारसे महत्त्वाचे नसल्याचे मत ओबामा विरोधकांनी व्यक्त केले आहे. 
डेमोक्रेटीक पक्षाने आपल्या 2008 च्या राष्ट्रीय निवडणूक संमेलनातील प्रस्तावात मुशर्रफ आणि पाकिस्तानावर टीकेची झोड उडवली आहे. 
मुशर्रफ यांच्यावर त्यांच्या देशातच महाभियोग चालवला जात असताना आता त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचां असा सवालच या प्रस्तावात उपस्थित करण्यात आला आहे. 
पाकच्या कबायली भागातूनच अमेरिकी सैन्यांना जास्त धोका असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. ]]></content:encoded>
      <authorname>वार्ता</authorname>
      <description><![CDATA[इस्लामाबाद, 
आपल्या राजीनाम्याची घोषणा करण्यासाठी देशाला उद्देशून भाषण करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत परवेझ मुशर्रफ हे द्विधा मनस्थितीत होते, असे त्यांच्या काही जवळच्या व्यक्तींचे म्हणणे आहे.]]></description>
मुशर्रफ राजीनामा देण्याची घोषणा करेपर्यंत इस्लामाबादच्या अध्यक्षीय प्रासादातील वातावरणही अस्वस्थतेचेच होते. राजीनाम्याची कल्पना देण्यासाठी काही निवडक पत्रकारांनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनीही मुशर्रफ हे अतिशय तणावात असल्याचे पाहिले. 
शेवटच्या मिनिटापर्यंत त्यांची द्विधा मनस्थिती होती. लढायचे की पलायन करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता., असे मुशर्रफ यांच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितल्याचे वृत्त डेली टाईम्सने दिले आहे.]]></content:encoded>
      <description><![CDATA[लाहोर 
पाकिस्तानात आतापर्यंत चार लष्करशहांनी देशाची सत्ता हातात घेतली. त्यांच्यात काही साम्यही आहे. या सगळ्यांनी सत्ता हातात घेतली तेव्हा देशाची अर्थव्यवस्था राजकारण्यांनी डबघाईला आणून ठेवली होती.]]></description>
      <content:encoded><![CDATA[पाकिस्तानात आतापर्यंत चार लष्करशहांनी देशाची सत्ता हातात घेतली. त्यांच्यात काही साम्यही आहे. या सगळ्यांनी सत्ता हातात घेतली तेव्हा देशाची अर्थव्यवस्था राजकारण्यांनी डबघाईला आणून ठेवली होती. त्याचबरोबर अयूब खान, याह्याखान, झिया उल हक व परवेझ मुशर्रफ या चारही लष्करी हुकुमशहांपैकी कुणीही महाभियोगाला सामोरे गेले  नाही. आपल्या पदाची सूत्रे त्यांनी स्वतःहून खाली ठेवली, असे डेली टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे. 
अयूब खान हे पाकिस्तानचे पहिले लष्करी हुकुमशहा. त्यांनी २७ ऑक्टोबर १९५८ पंतप्रधान इस्कंदर मिर्झा यांना  पदच्युत करत सत्ता ताब्यात घेतली. देशाच्या राजकारणात लष्कराच्या हस्तक्षेपाचे हे पहिलेच उदाहरण होते. अयूब  यांनी अकरा वर्षे सत्ता उपभोगली. त्यांच्या काळात मर्यादीत प्रमाणात लोकशाही होती. औद्योगिक सुधारणा, कृषी  विकासाला त्यांनी उत्तेजन दिले. कालव्यांचे जाळे बांधले. पण भारताशी युद्ध करण्याची खुमखुमीही त्यांनी १९६५ च्या  युद्धात भागवून घेतली. त्यात पराभवही पाहिला. 
कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षांत अयूब यांनी आपल्या वारसदारांसंदर्भात चर्चा सुरू केली. त्यासाठी मौलाना भाषानी,  झुल्फिकार अली भुट्टो यांची नावे चर्चेत होती. पण परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की १९६० मध्ये अयूब यांना  सत्ता सोडण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यांनी २५ मार्च १९६९ ला राजीनामा दिला. 
त्यानंर लष्करशहा याह्या खान सत्तेवर आले. त्यांनी आल्या आल्या पाकिस्तानात मार्शल लॉ लागू केला आणि ते देशाचे अध्यक्ष बनले. त्यांच्या काळात महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे त्यांनी १९७० मध्ये निवडणुका घेतल्या. त्यात पाकिस्तान पीपल्स पार्टीने पश्चिम पाकिस्तानात बहूमत मिळवले, तर अवामी लीगने पूर्व पाकिस्तानात. सत्ता हस्तांतरण होत असतानाच पाकिस्तानने भारताची पुन्हा एकदा कुरापत काढली आणि युद्ध पेटले. त्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. शिवाय बांगलादेश वेगळा केला. हा पराभव पाकिस्तानी जनतेला सहन झाला नाही आणि त्या दबावापोटीच याह्या खान यांनी राजीनामा देऊन २० जिसेंबर १९७१ ला सत्ता भुट्टो यांच्याकडे सुपूर्द केली. 
भुट्टो यांनी १९७६ मध्ये झिया उल हक यांना लष्करप्रमुख म्हणून नेमले. पण झिया यांनी भुट्टो यांची सत्ता उलथवून ५ जुलैला १९७७ ला सत्ता हातात घेतली. मग देशात तिसरा मार्शल लॉ लागू केला. झिया यांच्या काळात अफगाण युद्ध झाले. 
त्यानंतर मुशर्रफ यांनी १२ ऑक्टोबर १९९९ ला नवाझ शरीफ यांची सत्ता उलथवली. पण त्यांनी मार्शल लॉ लागू केला नाही. ते देशाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी ठरले. त्यांनी हे पद खास स्वतःसाठी निर्माण केले.]]></content:encoded>
      <content:encoded><![CDATA[पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी महिला आरूढ होऊ शकते, असे संकेत पाकिस्तान पीपल्स पक्षाचे सहअध्यक्ष असफि अली झरदारी यांनी दिले आहे. मात्र सत्ताधारी आघाडीत सहमतीनंतरच अंतिम निर्णय होईल, असे सांगून स्वत: शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले. 
मुशर्रफ पायउतार झाल्यानंतर व्यवस्था, राष्ट्रीय राजकारभार व परराष्ट्रधोरणातही बदलाचे संकेत देताना प्रादेशिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भारत, अफगाणिस्तान, इराण व अरब देशांची परिषद घेण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. 
मुशर्रफ सत्ताधारी आघाडी सरकारविरूद्ध कटकारस्थान करत असल्याच्या अहवालानंतर त्यांच्यावर महाभियोग भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ]]></content:encoded>
      <authorname>वार्ता</authorname>
      <content:encoded><![CDATA[पाकचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ हे खूप चांगले आणि वचनाचे पक्के आहेत, परंतु अमेरिकेला लोकशाहीही महत्त्वाची असल्याने मुशर्रफ यांना अमेरिकेत आश्रय देणे अशक्य असल्याचे मत अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कोंडालिजा राईस यांनी व्यक्त केल्याने आता मुशर्रफ यांच्यासाठी अमेरिकेचे दरवाजेही बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 
अमेरिका आणि पाकिस्तानची विचार सरणी व्यापक आहे. दोनही देशांना दहशतवादाचा मुकाबला करायचा आहे. मुशर्रफ हे चांगले व्यक्ती आहेत, ते वचनाचे पक्के आहेत परंतु अमेरिकेसाठी लोकशाही तितकीच महत्त्वाची असल्याने मुशर्रफ यांना अमेरिकेचा आश्रय मिळणे अवघड असल्याचे त्या म्हणाल्या.  ]]></content:encoded>
      <authorname>भाषा</authorname>
  <!--BD-->मला आता देशाची चिंता आहे. मी आतापर्यंत देशासाठी लढत आलो, या पुढेही मी एक सैनिक म्हणूनच लढा देईल. देशातील राजकीय जंगलात चालेल्या घोडेबाजारापासून आता देशाला कोणीही वाचवू शकणार नाही'<!--ED-->      
<!--@@EndLeftBlock@@--><!--end inline--> पाकचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ हे राजीनामा देणार का? या विषयाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सध्या पाकमध्ये सुरू असतानाच आता मुशर्रफ यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात अत्यंत भावुक होत आपण केलेल्या कामाचा पाढा वाचत आणि विरोधकांना कानपिचक्या देत अखेर आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. 
आज एक वाजता मुशर्रफ यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली.सुमारे तसाभर त्यांचे भाषण चालले. या भाषणात मुशर्रफ काही प्रसंगी अत्यंत भावुक झाले होते. आपण खऱ्या अर्थाने 1995 नंतर पाकला नवी ओळख मिळवून दिली. तोपर्यंत पाकला कोणीही ओळखत नव्हते पाकला आंतरराष्ट्रीय राजकारणात काडीचेही महत्त्व नव्हते. 
अशा वेळी मी सत्ता हातात घेतल्यानंतर आज पाक आंतरराष्ट्रीय क्षेत्रात एक महत्त्वाचा देश मानला जात असल्याचे मुशर्रफ यांनी सांगितले. 
पाकमध्ये आपण आर्थिक विकास तर केलाच परंतु याच सोबत आपण देशातील प्राथमिक गरजांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी केला. देशातील तरुण भरकटले होते, त्यांना शिक्षण काय याचा गंधही नव्हता, अशा वेळी देशातील तरुण आणि शिक्षणाचा विस्कळीत झालेला गाडा आपणच पूर्वपदावर आणल्याचे ते म्हणाले. 
मी पाकच्या जनतेला आतापर्यंत राजकारण्यांच्या या जंगलातून अनेकदा वाचवले आहे, हे राजकारणी केवळ स्वतः:चाच स्वार्थ पाहतात. त्यांनी पाकची ओळखच बदलून दिली, नुकसान म्हणजे पाकिस्तान अशी ओळख त्यांनी जगाला पाकची करून दिली. हे चुकीचे असून मला राजकारण्यांविरोधात काही कट करायचेच असते तर मी निवडणुकाच होऊ दिल्या नसत्या. आतापर्यंत कधीही झाल्या नसतील इतक्या पारदर्शक निवडणुका मी देशात शांतीपुर्ण पद्धतीने घेतल्याचे मुशर्रफ म्हणाले. 
मी सत्ताधाऱ्यांविरोधात कट रचतो असा आरोप माझ्यावर केला जातो, पण असे असते तर पाकमध्ये मी लोकशाहीची स्थापनाच होऊ दिली नसल्याचे ते म्हणाले. मला गेल्या आठ वर्षात असलेल्या अनुभवाचा फायदा सरकारने करून घेण्याऐवजी ते मला पाकपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत असून मी त्यांना समस्या सोडवणारा नाही तर समस्याच वाटत आहे. 
मला माझ्यावर विश्वास आहे, मी केलेल्या कामावर मला विश्वास आहे, म्हणूनच मी आज ठणकावून सांगतो की मी माझ्यापेक्षा माझ्या देशाला अधिक महत्त्व दिले आहे, म्हणून माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल होणे अशक्यच असल्याचे मुशर्रफ यांनी ठणकावून सांगतानाच धर्म आणि गरिबीचा उल्लेख आपल्या भाषणात करत सामान्यांचे आपल्या विरोधातील मत बदलण्याचा प्रयत्नही केला. अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकसह जगभरात धर्माचे नाव बदनाम झाले आणि आत्मघाती हल्ल्यांची नवी संस्कृती उदयास आली, याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आता पाकमध्ये स्थिरता हवी आहे, आणि ति देशात हवी असल्याने सर्वांनी एकत्र येण्याची गरजही मुशर्रफ यांनी व्यक्त केली. 
पाकवर माझे प्रेम आहे, मी गेल्या 44 वर्ष आपले प्राण धोक्यात घालून देशाचे रक्षण केले आणि यापूढेही करत राहीन, काही अनेक विचार आपल्या मनात आहेत, मला आता देशाला घोडे बाजारापासून वाचवायचे आहे. आपल्या भाषणाच्या अखेरीस अत्यंत भावूक होत मुशर्रफ यांनी आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.
आता मुशर्रफ कोठे जाणार? 
आपला राजीनामा दिल्यानंतर आता मुशर्रफ नेमके काय करणार आणि सरकार त्यांच्याविरोधात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुशर्रफ आता आश्रयाला पाकिस्तानबाहेर पळण्याची शक्यता असल्याने सरकाने त्यांच्या भोवती आपले सुरक्षा रक्षक पेरल्याची बातमी आहे. मुशर्रफ यांना आश्रय देण्याचा प्रश्नच नसल्याचे अमेरिका आणि ब्रिटनने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तर ते चीन किंवा सऊदीत आश्रय घेऊ शकतात असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
पाकमध्ये जल्लोष सुरु
राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी आपल्या भाषणात राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच पाकमध्ये दिवाळी साजरी केली जात आहे. मुशर्रफ यांच्या भाषणाच्या शेवटी आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी जाहीर करताच लाहौरच्या प्रमुख चौकात मुशर्रफ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अनेकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ]]></content:encoded>
      <content:encoded><![CDATA[मुशर्रफ यांच्या काळात उभय देशांचे संबंध आणखी सुधारल्याचे स्पष्ट करत चीनने मुशर्रफ यांच्यावर स्तुती सुमनांची उधळणं केली आहे. 
मुशर्रफ यांनी आशियाई देशांच्या शांततेसाठी केलेले प्रयत्न महत्त्वाचे असल्याचे मत चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते कीन गांग यांनी व्यक्त केले आहे. 
पाकमधील राजकीय घडामोडींना वेग आल्याने आणि आपल्या विरोधात महाभियोग दाखल करण्याच्या तयारींना वेग आल्याने मुशर्रफ यांनी आपला चीन दौरा रद्द केला होता. यानंतर चीनने आता त्यांची स्तुती केली असून मुशर्रफ यांच्या मुळे पाकिस्तान आणि चीन आणखी जवळ आल्याचे गांग यांनी स्पष्ट केले आहे. ]]></content:encoded>
      <authorname>वार्ता</authorname>