ब्लॉग-कॉर्नर
सही रे सही या नाटकात एका साध्या, छोट्या, क्षुल्लक अशा सहीवरुन केवढे मोठे नाट्य घडते बघा. मी तर असेही वाचले की त्या नाटकाबाहेरही बरेच नाट्य घडले म्हणून. पण असो तो आपला विषय नाही पण एक गोष्ट मी तुम्हाला निर्विवाद सांगू शकतो कुठल्याही नाट्याला जर कोणी कारणीभूत असले तर ती आहे सही. जसे दोन पुरुषांच्या वादामागे एक स्त्री असते ना तसेच त्यांच्या आयुष्यात घडणार्‍या नाट्याच्या मागे सही असते. बर सहीवरुन नाट्य घडायला तुम्ही कोणी मदन सुखात्मे किंवा त्याचे वंशजच असायला हवे असे काही नाही. तुम्ही कोण्या बुद्रुकवाडीचे दगडू धोंडे पाटील जरी असलात तरीही तुमच्या आयुष्यात सहीवरुन नाट्य घडू शकते कारण सहीची ताकतच अशी आहे की ती अच्छे अच्छोकी बोलती बंद कर देती है. अगदी सफाइने खोट बोलणार्‍याला म्हणा ‘बाबारे तू जे बोलतोय ना ते सारे एका कागदावर सही करुन लिहू दे’ नाही त्याची दातखिळी बसली तर सांगा. या देशात धादांत खोटे बोलणारी माणसे दोनच एक राजकारणी आणि दुसरा साडीच्या दुकानातला सेल्समन. तुम्ही त्यांच्यापैकी कुणावरही हा प्रयोग करुन पहा, माझ्या म्हणण्याची प्रचिती नाही आली तर कळवा. इमेल एसएमएस काहीही करा.
हिंदी चित्रपटांच्या लेखकांना या सहीमुळे केवढा फायदा झाला बघा, तो लेखक कसलेही डोके न लावता चित्रपटाचा शेवट या सहीमुळे अगदी सहीसकट सहज लिहीतो. साधारणतः साऱ्याच चित्रपटातले दृष्य सारखेच असते. ती त्या विलेनची धमकी ‘बुढ्ढे तू उस कागजपे साइन कर दे वरना.’ पुढे काहीही असू शकते कधी कोणाचे तुकडे तुकडे करायचे तर कधी कुणाला जिवंत गाडायचे तर कधी उकळत्या तेलात फेकून द्यायचे. हल्ली त्यातही बरेच इनोव्हेशन आणि क्रिएटीव्हीटी आलेली आहे. लोक कशा कशात इनोव्हेशन करतील काही सांगता येत नाही आमच्यासाठी तर ते संडासतले फॉसेटच फार मोठे इनोव्हेशन होते. सार कस ऑटोमेटीक, असो. विलेनची ती धमकी ऐकून मग तो जर्जर म्हातारा थरथरत्या हातात पेन घेउन त्या कागदावर सही करणार तेवढ्यात हिरोची दिमाखात एंट्री, मग ती लुटुपुटुची लढाइ, विलेनची हार, हिरोचा विजय आणि शेवटी पोलीसांची सारवासारव. पोलीस गेल्यावर चित्रपटातला सर्वात महत्वाचा प्रसंग हिरोइनने त्या हिरोला गळे काढत मिठ्या मारणे. तो सीन बघितला की मग आपणही पैसे वसूल झाले म्हणून जोरजोरात शिट्या मारत थेयटर सोडतो कुठेतरी मनात आशा असते कधीतरी कुणीतरी अशीच सुंदर मुलगी आपल्याही मिठ्या मारेल म्हणून. स्वप्न बघायला पैसे पडत नाहीत हो. जरा विचार करा त्या हिरोची एंट्री व्हायच्या आधी जर का म्हाताऱ्याची सही करुन झाली असती तर काय झाले असते. मी तुम्हाला स्टँपपेपरवर सही करुन लिहून देतो त्या हिरोइनने आता हिरोएवजी त्या विलेनला मिठ्या मारल्या असत्या. अरे ती सही व्हायची थांबली म्हणून तो कालचा पोरगा, ज्याच्यावर कालपर्यंत रस्त्यावरच काळं कुत्रही भुंकत नव्हत, आज अचानक हिरो झाला. चांगल्या चांगल्या हिरोइनला मिठ्या मारायला लागला. सारी सहीची करामत.
आता म्हणे सहीएवजी बायोमेट्रीक की काय असा प्रकार येणार आहेत. त्यात ते तुमच्या बोटांचे ठसे, डोळ्याचा रॅटीना स्कॅन किंवा ह्रदयाचा स्कॅन वगेरे असले काहीतरी घेणार आहेत म्हणे. मागे ते आधार कार्ड आले होते त्यातही असलाच विचित्र प्रकार होता. शेवटी जे व्हायचे तेच झाले दोनच वर्षात ते आधार कार्ड निराधार झाले. अरे तुम्ही सहीचा आधार काढायला जाल तर तुमचा आधार राहील का? ही सहीच तर तुमची ओळख आहे. सहीची सर त्या बायोमेट्रिकला येनार आहे का? आठवा दिवारमधला तो दोन भावांमधला जागतिक ख्यातीचा अजरामर संवाद. हो जागतिक ख्यातीचाच, उद्या कुण्या हॉलीवूडच्या चित्रपटात सुद्धा जॉर्ज क्लूनी हेच वाक्य ब्रॅड पिटला ऐकवित असेल. ‘जाओ पहले उस आदमी का साइन लेके आओ जिसने मेरे हाथपे ये लिख दिया था के मेरा बाप चोर है. उसके बाद मेरे भाई तुम जो कागजपे बोलोगे उस कागजपर मैं साइन करनेको तयार हू.’ आता हाच संवाद जरा त्या बायोमेट्रीकचा आधार घेउन लिहायचा झाला तर कसा होइल. ‘जाओ पहले उस आदमी का अंगूठा लेके आओ जिसने मेरे हाथपे ये लिख दिया था के मेरा बाप चोर है. उसके बाद मेरे भाई तुम जो कागजपे बोलोगे उस कागजपर मैं अंगूठा लगानेको तयार हू.’ कसे वाटेल ते, असे काही ऐकणे म्हणजे बिर्याणीतला मसाला काढून त्याला तुप जिऱ्याची फोडणी देण्यासारखे आहे. खरच कोणी सलीम जावेद असल्या प्रकारचा संवाद लिहायला धजेल का? तेंव्हा सहीला आव्हान देणे म्हणजे आजपासून घरात माझी सत्ता आहे असे बायकोला सांगण्यासारखे आहे. ती ऐकणार आहे का? किंवा रिक्षावाल्याला लेन कटींगचा नियम समजावून सांगण्यासारखे आहे. तो समजून घेणार आहे का?
सही ही चार प्रकारची असते मालदार सही, वजनदार सही, भानगडीची सही आणि अतिसामान्य सही. ज्या सहीमुळे माल मिळतो ती सही म्हणजे मालदार सही. म्हणजे आता बघा तुम्ही पन्नास रुपयाला एक साधी फडतूस बॅट घ्या. त्या बॅटवर सचिन तेंडुलकरची सही घ्या. रीटायर्ड झाला म्हणून काय झाले आपण देव बदलत नसतो. तीच बॅट तोच दुकानदार तुमच्याच कडून पन्नास हजार रुपयाला विकत घेइल बघा. असा माल मिळवून देणारी सही म्हणजे मालदार सही. मालदार सहीचे दुसरे उदाहरण म्हणजे चित्रकाराची सही. माझ्यासारख्या अतिसामान्य बुद्धिच्या कलादरीद्री माणसासाठी ते मॉडर्न पेंटींग वगेरे म्हणजे मुलाचा पाय लागून सांडलेले रंग आणि त्यावर मारलेल्या उभ्या आडव्या रेषा. तरी त्या पेंटींगची किंमत मिलियन्स ऑफ डॉलर्स मधे असते. आता जर का त्याच पेंटींगवर त्या कोण्या मोठ्या चित्रकाराएवजी खालच्या आळीतल्या देशपांडे वकीलाने सही केली तर खरच कोणी त्यासाठी मिलियन डॉलर्स मोजनार आहे का? गपचुप त्याच्या हातात ऍफेडिव्हेटचे वीस रुपये टिकवून त्याला कटवतील. त्याचमुळे माझे असे मत बनले आहे की ती किंमत जी आहे त्या पेंटींगवर कोण सही करतो त्याच्यासाठी आहे. सहीमुळे असे धबाड मिळते म्हणूनच ते चित्रकार लोक त्या सहीला दागिण्यांनी मढवतात, फुलांनी सजवतात, बिंदी लावतात, वर एक छोटीसी टिकली सुद्धा लावतात. नाहीतर आमची सही बघा. दागिण्यांनी मढवणे तर सोडा आम्ही तिला धड कपडे सुद्धा घालीत नाहीत. सही नावाच्या अशा या ताकतवर स्त्रीकडे आमच्यासारखे वेंधळे अति सामान्य पुरुष नेहमीच दुर्लक्ष करतात. या मोठ्या लोकांच्या दागिण्यांनी मढवलेल्या, फुलांनी सजवलेल्या, चांगल्या नटवलेल्या सहीसमोर आमची सही म्हणजे म्हणजे पांढऱ्या गोठोड्यात गुंडाळून तिरडीवर बांधलेल्या प्रेतासारखी वाटते.
साहेब तुमचे सगळे काम झाले आहे फक्त मोठ्या साहेबांची सही तेवढी राहीली आहे हे वाक्य ऐकले नाही असा भारतीय नागरीक सापडणे शक्य नाही. किंबहुना भारतीय नागरीक ओळखण्याची परीक्षा घ्यायची ठरवली तर वरील वाक्याचा खरा अर्थ काय असा प्रश्न त्यात विचारावा. ज्याला सांगता आला नाही त्याला बिनबाभोट नापास करावे. या देशातल शेंबड पोर पण त्याचा खरा अर्थ सांगून जाइल. ज्या अशा सहीशिवाय टेबलावरचा कागद पुढे सरकत नाही ती सही म्हणजे वजनदार सही. त्या सहीचे वजन त्या सही करनाऱ्याच्या वजनावर अवलंबून असते. त्या सहीच्या वजनानुसार मग तुम्हाला तेवढ्याच वजनाचे पैसे सरकावे लागतात मग हळूहळू तुमचा सरकारी कागद सरकू लागतो. वजनदार सहीचे दुसरे उदाहण द्यायचे झाले तर आता हे बघा. तुम्ही तुमच्या लग्नासाठी लाखो रुपये खर्च कराल, मोठा हॉल घ्याल, हजार पाचशे लोकांना जेवू घालाल तरीही कोणत्याही देशाच्या एम्बसीमधे त्याला मान्यता नाही. पण तेच आता एका दहा बाय दहाच्या खोलीत चार लोकांच्या साक्षीने फाइलच्या ढीगाऱ्यातल्या एका रजिस्टरवर सही करा. मग आहे कोणाची बिशाद तुमचा व्हीसा रिजेक्ट करायची. हल्लीच्या या जमान्यात दोन इंडीपेंडंट माणसे फक्त व्हीसाच्या वेळेलाच डीपेंडंट असतात बाकी त्या लग्नाच्या सर्टीफिकेटचा फारसा उपयोग नसतो.
जी सही केल्याने बँकेत पैसे नसूनही चेक वठवला जातो ती म्हणजे भानगडीची सही. नावाप्रमाणेच भानगडीच्या सहीमुळे भांडणे होतात पण त्याने भ्यायचे असे काही कारण नाही कारण जोपर्यंत खरा गुन्हेगार कोण आहे हे ठरते तो पर्यंत तुमच्या दोन तीन पिढ्या आरामात त्या सहीमुळे झालेल्या कमाईवर जगलेल्या असतात. उपयोगितेच्या दृष्टीकोनातून विचार करायचा झाल्यास भानगडीची सही पहिल्या क्रमांकावर येइल. जिवंत बापाचे ‘डेड सर्टीफिकेट’ आणणे किंवा मेलेल्या बापाचे त्याने न केलेले मृत्युपत्र त्याच्या सहीसकट आणणे, असलेली बहीण गाळणे किंवा नसलेली बहीण सिद्ध करणे, बॉसच्या नकळत साळ्याचे भानगडीच्या प्रॉपर्टीचे लोन मंजूर करणे किंवा बॉसने मंजूर केलेले शेजाऱ्याचे लोन नाकरणे अशी कितीतरी भानगडीच्या सहीची उपयोग सांगता येतील. असे असूनही भानगडीची सही ही काही कोण्या लेच्यापेच्या माणसाला जमनारी गोष्ट नाही. त्यासाठी प्रखर बुद्दीमत्ता, सफाइदार कला आणि मुख्य म्हणजे प्रचंड हिम्मतीची गरज लागते. वेळ पडल्यास भाकरी आणि पिठल्याचा आस्वाद घेत एक खुनी आणि एक दरोडेखोराच्या सोबतीने एका खोलीत आयुष्य काढायचीही तयारी ठेवावी लागते.
सौजन्य - मित्रहो
https://mitraho.wordpress.com
भानगडीच्या सहीच्या अगदी विरुद्ध म्हणजे अतिसामान्य सही. जी सही केल्याने बँकेत पैसे असूनही चेक परत येतो ती म्हणजे अतिसामान्य सही. या अतिसामान्य सहीवर एक फार मोठ बंधन असते ते म्हणजे ही सही नेहमी एकसारखीच असली पाहीजे नाहीतर त्या अतिसामान्यांच्या गर्दीत तुम्ही कोण ते ओळखू येत नाहीत. सामान्य माणसाचे सारे आयुष्य मग ती अतिसामान्य पण वेगळी अशी सही करण्यात जाते, सुरवातीला तुम्हाला ती वेगळी अशी सही म्हणजे काय ते आधी शिकावे लागते आणि मग तशीच सही आयुष्यभर करावी लागते. मागे एकदा माझा चेक परत आला कारण काय, तर सहीला शेवटी दोन स्ट्रोक जास्त झाले म्हणे. आता सही करताना त्याला किती स्ट्रोक आहेत हे मोजून सही करायची का? त्या दिवसापासून मला चेकबुकवर सही करायची धास्तीच वाटते. एका चेकबुकामागे निदान दहा तर चेक मी सही चुकली म्हणूनच फाडून फेकतो. हे असे चेक फाडून संपूर्ण आयुष्यात मी एका झाडाचा जीव नक्की घेइल. चेकबुकवर सही करणारे माझ्यासारखे निदान लाखभर माणसे तरी सापडतील तेंव्हा या सहीमुळे उगाचच एक लाख झाडांना आपला जीव गमवावा लागत आहे. कोणामुळे कोणाचा जीव जाइल काही सांगता येत नाही.
मला जी सही बरोबर वाटते तशी सही केल्याने काम भागते का? नाही. दोनच दिवसांनी गोड आवाजात इंग्रजीमधून धमकीवजा फोन येतो
“सर तुमची सही मॅच होत नाही आहे एक तासाच्या आत बँकेत येउन खातरजमा करा.”
अस कुण्या दरोडेखोऱ्याला किंवा भ्रष्ट अधिकाऱ्याला पोलीस दोन दिवसात आत्मसमर्पण करायला सांगतात ना हा तसलाच प्रकार असतो. त्याला तरी दोन दिवसाची वेळ दिली जाते आम्हाला तर तासाभरात हाजीर व्हायचे आदेश येतात. तिथे बँकेत गेल्यावर दोन गोड मुलींसमोर सही करायची. ती सही काही भलतीच तिसरीच निघते ती ना ओरीजनल सोबत मॅच होत ना त्या चेकवर केलेल्या सहीसोबत मॅच होत. त्या दोन गोड मुली मग उगाचच त्यावर खल करतात, त्याच्या गोड इंग्रजीमधून ‘काय माणूस आहे साधी सही सुद्धा करता येत नाही, सही करता येत नाही तर बँकेत अकॉउंट काढतातच कशाला?’ असे काही म्हणत असतात. मला अजून दोन तीन सह्या करायला लावतात वेगवेगळ्या कागदावर सह्या करायला लावतात. अरे असे कागद नाहीतर पेन बदलून मुद्दलात काही फरक पडनार आहे का? प्रत्येक वेळेला सही ही वेगळीच. मग त्यांच्या लक्षात येते ही तर पार हाताबाहेर गेलली केस आहे मग ओळखपत्राची झेरॉक्स घेउन माझी त्या गोड छळवादातून सुटका होते. हे प्रकरण इतक वाढल की हल्ली बायकोला भलतेच संशय यायला लागले. तिलाही समजावून सांगावे लागते अरे बाबा एवढ स्कील नाही माझ्यात. उलट मला अशी शंका येते की एसीत बसून कंटाळा आला म्हणून काहीतरी भेजाफ्राय विरंगुळा म्हणून असे माझ्यासारख्याला छळण्याचा छंदच या मुलींना जडला आहे की काय?
माझाच काय बहुतेकांचा कॉलेज पूर्ण होइपर्यंत सहीशी तसा फारसा संबंध येत नाही माझाही तसा आला नाही. नाही म्हणायला स्कॉलरशीपसाठी सही करावी लागायची पण त्यावेळेला आमच्या सहीपेक्षा त्या रेव्हून्यू स्टँपची किंमत जास्त होती. खर सांगायचे तर ज्यावेळेला रेव्हून्यू स्टँप लावून सही घेतली जाते त्यावेळेला त्या माणसापेक्षा त्या रेव्हून्यू स्टँपची किंमत जास्त आहे असे समजावे. मी आधी मराठीत सही करायचो, मग इंग्रजीत सही करायला शिकलो. छान कॅपीटल लेटर मधे सारी अक्षरे सुटसुटीत लिहायचो. कोणी म्हणाले की असे रांगेत उभे केलेल्या मुलांसारखी सही करशील तर कोणीही तुझी सही कॉपी करु शकेल. तेंव्हा करस्यू रायटींग मधे सही करायला शिक. मी ते शिकून घेतले. मुळात माझे अक्षर म्हणजे मुंगळ्याच्या पायाला शाही लावून त्याला कागदावर सोडून दिल्यासारखे आणि आता ते करस्यू रायटींग म्हणजे आधीच मुंगळा (मर्कट) त्यात मद्य प्याला. माझ्या एका मित्राने सांगितले कोणी सहीवरुन त्या माणसाचा स्वभाव, भविष्य वगेरे सांगतो. त्याने सांगितले की जर सही वर जाणारी असेल तर तो मनुष्य आयुष्यात वर जातो. सहीखाली एक रेष ओढली असेल तर ती त्या व्यक्तीचा आत्मविश्वास दर्शविते. या साऱ्या गोष्टी ऐकून मी पण माझे भविष्य बदलण्यासाठी स्वतःची सही बदली. तिला तिरपी करुन वर वर नेली, आत्मविश्वास दाखवायला त्याखाली एक काय दोन दोन रेषा ओढायला लागलो. हे असे केल्याने भविष्य कितपत बदलले आणि आत्मविश्वास कितपत वाढला हे काही सांगता येनार नाही पण कदाचित त्या सहीचा परिणाम की काय माझा वरचा मजला भरुन राहीला (निदान मी तरी असे मानतो), राहायला घरही वरच्या मजल्यावरच मिळाले.
कॉलेज संपल्यावर मी पहीले काम कुठले केले असेल तर ते होते पासपोर्ट बनविण्याचे. माणसाच्या स्वप्नांच्या भरारीचे काही सांगता येत नाही, उगाचच आशा आपली. त्यावेळेला जशी करता येत होती तशी सही मी त्या पासपोर्टवर केली आणि विसरुन गेलो. पुढे जाउन ही सही गोचीड जसे बैलाच्या पाठीला चिकटते तशी आयुष्यभर मला चिकटणार आहे आणि रक्त काढल्याशिवाय काही ती बाहेर येणार नाही याची त्यावेळेला तरी काही कल्पना नव्हती. एक साध्या सहीमुळे मनस्ताप व्हायला आमच्या बापजाद्याने काही आमच्या मागे गडजंग इस्टेट वगेरे ठेवली नव्हती. काही वर्षे गेली मी मुंबईला नोकरीला लागलो. बँकेत अकाउंट उघडायची गरज पडली तेंव्हा माझे ओळखपत्र म्हणून मी पासपोर्ट दिला. तोच पासपोर्ट माझ्या सहीचा पुरावा म्हणून वापरल्या जाणार होता. मी त्या बँकेच्या फॉर्मवर पण मला जमेल तशी सही केली. दुसऱ्याच दिवशी बँकेचा मनुष्य फॉर्म घेउन परत आला.
“सर सही मॅच होत नाही” मी निरखून बघितले तो म्हणत होता ते खरे होते.
“खरे आहे. आता वयोमानानुसार सही बदलतेच ना त्यात काय मोठे एवढे.”
“नो सर सही तशीच पाहीजे, पासपोर्टवर आहे अगदी तशी.”
आता आली ना पंचाइत. एक तर आमचे अक्षर असे दिव्य, त्यात त्या पासपोर्टवर करस्यू रायटींग मधे केलेली इंग्रजी सही. एकवेळ एकदा काढलेली चांगली अक्षरे परत तशीच काढता येइल पण एकदा केलेली घाण परत तशीच करता येत नाही हो. शेवटी घाण ही घाणच ती अशी केली का अन तशी केली का काय फरक पडनार आहे? माझे हे लॉजिक समजून घेण्याइतपत त्या बँकवाल्याची बुद्धी नव्हती. तो एकच री ओढत होता तशीच सही पाहीजे आणि मी त्या सहीची प्रॅक्टीस करण्याच्या नादात कागदावर कागद फाडीत होतो. शेवटी माझे लक्ष त्या पासपोर्टवरील फोटोकडे गेले. मी परत एकदा प्रयत्न करायचे ठरविले.
“का हो हा फोटो तुम्हाला आयडी प्रूफ म्हणून चालतो का?”
“हो”
“आता तर मी तसा अजिबात दिसत नाही तरी तो तुम्हाला चालतो मग ही सही का चालत नाही. माणसाचा चेहरा बदलू शकतो, त्याची उंची वाढू शकते, त्याचे शरीर वाढू शकते पण सही तशीच हवी हा अट्टहास का?” हे वेगळे सांगायला नकोच की माझा हा युक्तीवादही फसला. त्या दिवसापासून ते आजतागायत मी माझ्या तारुण्यात केलेली घाण परत तशीच करण्याच्या नादात रोज त्या झाडाचा गळा दाबत असतो.
अशी ही सहीची दुनिया आणि किमया. त्यातही काही सह्या अशा असतात की ज्या फ्रेम करावाशा वाटतात, ती फ्रेम दिवाणखान्यात टांगाविशी वाटते, त्या सहीसमोर रोज नतमस्तक व्हावयसे वाटते. त्या फ्रेमकडे बघितल्याने एक वेगळीच प्रेरणा मिळते, आयुष्याला एक दिशा मिळते. अशा साऱ्या सह्यांना माझा साष्टांग प्रणिपात.
सौजन्य - मित्रहो
https://mitraho.wordpress.com/
WD
वास्तविक समर्थ रामदासांनी 'मुर्खांची लक्षणे' सांगितली, असली तरी त्यात बरीच कमतरता आहे. आम्ही शोधून काढलेली लक्षणे आणि त्याचे फायदे वाचल्यानंतर तुम्हीही नक्की आमचे 'दास' होऊन आमचा 'बोध' मान्य कराल याची खात्री आहे.
वस्तुतः जगात आपण किती शहाणे आहोत, हे सांगण्याची जणू स्पर्धा चाललेली आहे. पण मी किती मुर्ख आहे, हे कधीही कोणीही सांगत नाही. याचे कारण अगदी सोपे आहे. कितीही शहाणे असलो तरी आपला मुर्खपणा सिद्ध करण्याची जबाबदारी आपली नसते. त्यासाठी जागोजागी लोक टपलेले असतात.
आता हेच घ्या ना. घरात आपल्याला खाली दाखविण्याची एकही संधी बायको सोडत नाही. 'तुम्हाला काही कळत नाही. तुम्ही म्हणजे अगदी 'हे' आहात, हे सांगणार्‍या बायकोला 'हे' चा आणि 'हे' असणार्‍या नवर्‍याला त्या 'हे'चा अर्थ चांगलाच माहित असतो. आता घरात आईच बाबांना मुर्खात काढते हे 'याची डोळीयाने' पाहिल्यावर कुलदीपक आणि कुलदीपिका ही संधी कशी बरे सोडतील? वेळ आल्यावर 'बाबा तुम्हाला ना काही कळत नाही' हे वाक्य आईच्याच चालीवर आपल्या दिशेने फेकून आपण किती मुर्ख आहोत, हे 'तो' शब्द न वापरता ते बरोब्बर सांगतात.
पण घरात असा मुर्खपणा पांघरून घेण्यातही आपलीच सोय आहे, हे कधी तुमच्या लक्षात आलेय? आपल्याला हे कळत नाही, या बाबतीत आपल्याला माहित नाही, किंवा त्याचे काय करायचे असे असे म्हटल्यावर त्यासंदर्भातली आपली जबाबदारीही तिथेच संपते. कारण आपलं 'अर्ध अंग' आपण असे म्हटल्याक्षणी 'पूर्णांग' होऊन आपली जबाबदारी आपल्यावर ओढवून घेते. सहाजिकच त्याविषयाचा जास्त विचार करण्याची वेळ आपल्यावर येत नाही. आपल्याला बाजूला काढून बाकीचे लोक ती बाजू भरून काढतात. शेवटी काय 'मुर्ख' बनून रहाण्यात फायदा आपलाच असतो.
हे घरचे. बाहेरही याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती नसते. ऑफिसात काही महत्त्वाचं काम असेल तर साहेब आपल्याबरोबरच्या हुशार सहकार्‍याला बोलवतो आणि त्याला ते देतो. त्यानं कुरकुर केली, की साहेब त्याला काही कळत नाही. तूच हे करू शकतो.' असं आपलं नाव घेऊन सांगतो. थोडक्यात आपल्याला मुर्ख ठरविण्याचा कार्यक्रम इथेही सुरू असतो. पण मला सांगा आपल्या मुर्खपणामुळे आपल्यावर येऊन पाहणार्‍या संभाव्या कामाच्या जबाबदारीतून आपली सुटका होत असेल तर मुर्ख रहाण्याचा फायदा आहे की नाही?
समजा साहेबाने आपल्याला काम सोपवलेच तर ते टाळण्याची आणखी एक युक्ती तुम्हाला सांगतो. साहेबाने सोपविलेल्या कामातले आपल्याला फार कळते असे कधीही चुकूनही दाखवून देऊ नका. आपल्याला काहीच कळत नाही, असे सोंग घ्या आणि चेहर्‍यावर त्या सोंगावर छानपैकी थोडा बावळटपणा शिंपडा. तेच मुखमंडल घेऊन साहेबाकडे जा. आता थोडी निर्भत्सना सहन करण्याची तयारी ठेवा. कारण, असे म्हणतात, की मोठ्या विजयासाठी थोडी माघार घ्यावी लागते. साहेब, तुम्हाला म्हणेल, 'काय हो एवढं साधं तुम्हाला कळत नाही?'
ते समजावून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न जरी केला, तरी चेहर्‍यावरचे बावळटपणाचे भाव केसावरच्या तेलासारखे ढळू देऊ नका. ते तसेच ठेवा. म्हणजे तुमच्या बावळटपणावर शिक्कामोर्तब होईल. आणि मग हताश झालेला साहेब तुमच्याच एखाद्या सहकार्‍याला बोलावून ते काम त्याच्याकडे सोपवेल. थोडक्यात थोड्याशा बावळटपणामुळे तुमच्यावरचा कामाचा ताण किती कमी होईल? जरा कल्पना करा.
मी असा मुर्खपणा अनेकदा दाखवतो. बाजारात गेलो की खरेदी करताना आपण अगदी बावळट आहोत, आपल्याला काही कळत नाही, असा चेहरा करतो. दुकानदाराने एखादी वस्तू दाखवली की थेट त्याच्या निम्मी किंमत सांगतो. तो माझ्याकडे 'काय मुर्ख माणूस आहे हा, असा चेहरा करून बघतो. मी मात्र माझा चेहरा कायम ठेवतो आणि तिथेच चिकटून बसतो. दुकानदार मला सुरवातीच्या काळात किंमत पटवून देण्याचा प्रयत्न करतो, पण मी ते पटत नसल्याचे दाखवतो. नंतर तो हरतर्‍हेने घालविण्याचा प्रयत्न करतो. पण मी डिंकासारखा चिकटून रहातो. यामुळे होतं काय की नंतर दुकानदार वैतागून मला ती वस्तू सांगितली त्यापेक्षा बर्‍याच कमी किमतीत देऊन टाकतो. अर्थात ही युक्ती सगळीकडे चालत नसली तरी बर्‍याच ठिकाणी चालते हेही तितकेच खरे आहे.
PR
PR
तुम्हाला जवसाची चटणी, लाल ढब्बू मिरचीचे सूप, मोडाण्याची भेळ, अक्की रोटी, व्हर्जिन पीन कोलाडा, टोफू टिक्का मसाला हे पदार्थ कसे करायचेत हे माहिती आहे? नाही ना. खाद्यपदार्थांची रेसिपी दिलेल्या पुस्तकातही या पदार्थांची माहिती एकत्रित मिळणार नाही. पण इंटरनेटवर भटकंती करत असाल तर 'वदनी कवळ घेता' हा ब्लॉग चुकवू नका. या पदार्थांची माहिती तर येथे मिळेलच, पण त्याशिवायही इतर पदार्थांचा शब्दास्वाद येथे घेता येईल. वास्तविक खाण्याच्या पदार्थांवर ब्लॉग सुरू करता येईल ही कल्पनाच अफलातून. पण या ब्लॉगकर्त्याने ती प्रत्यक्षात उतरवून नेटीझन्सना खमंग भेट दिली आहे. वाचता वाचताच तोंडाला जाम पाणी सुटते.
ब्लॉगकर्त्याने आपले मूळ नाव दिलेले नाही. पण 'मिंट' या उपनामाने हा ब्लॉग चालवला जातो. मूळची पश्चिम महाराष्ट्रातील मिंट आता नोकरीनिमित्त अमेरिकेत असते. अर्थातच सॉफ्टवेअर तंत्रज्ञानात ती काम करते. याच वर्षी अठरा मार्च २००७ ला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या ब्लॉगची सुरवात तिने केली आणि त्याचा दरवळही लवकरच सर्वत्र पोहोचला. त्यामुळे अल्पावधीतच ब्लॉग लोकप्रियसुद्धा झाला.
या ब्लॉगमध्ये काय नाही? उघडल्यानंतर जीभ नुसती चाळवायला लागते. मिंटला खाण्याची आणि खिलवण्याची चांगलीच आवड दिसतेय. त्यामुळे सगळ्यांच्या गरजा लक्षात घेऊन तिने पाककृती दिल्या आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला न्याहरीसाठी पदार्थ करायचे की जेवणासाठी? दोन्ही प्रकारचे पदार्थ येथे आहेत. शिवाय जेवणाच्या आधी असणाऱ्या एपेटाझरची कृतीही वाचायला मिळते. विविध प्रकारच्या चटण्या, कोशिंबिरी येथे आहेत. विविध प्रकारची पेये, रोज करता येण्यासारखे पदार्थ, पार्टीसाठीचे पदार्थ, झटपट होणारे पदार्थ, कॉकटेल फूड असे शेकडो पदार्थ येथे आहेत. जिभा चाळवणार्‍या पदार्थांशिवाय ज्यामुळे आपले पोषण चांगले होईल, असे पौष्टिक पदार्थ कसे बनवावेत हेही येथे वाचायला मिळते. महत्त्वाचे म्हणजे प्रांतनिहाय खाद्यपदार्थही आपल्याला कसे करायचे याची माहिती मिळते. खानदेशात प्रसिद्ध असलेले वांग्याचे भरीत, कर्नाटकातील अक्की रोटी, ढब्बू मिरचीची मसालेदार भाजी या पदार्थांच्या कृती वाचायला मिळाल्यानंतर आपोआपच त्यांची चव घेण्याची इच्छाही 'जिभेवर' दाटून येते.
रोजच्या पदार्थ या सदरात तब्बल तेवीस पाककृती आहेत. यात फोडणीचे वरण, शेपूची भाजी, डाळ मेथी, डाळ कांदा अशा ओळखीच्या पदार्थांव्यतिरिक्त मूगाचा डोसा, लाल ढबू मिरचीचे सूप, सोयाबिन व गाजराची भाजी, पालकाची कोशिंबीर हे थोडेसे हटके पदार्थही आहेत.पौष्टिक पदार्थांत झटपट मटकी, खजूर रोल्स, टोफू टिक्का मसाला, कैरीची डाळ, कोबीची कोशिंबीर असले फारसे ऐकिवात नसलेले पदार्थ 'चाखायला' मिळतात.
मिंटच्या या खाद्ययात्रेत गोड पदार्थही आहेत. साखरांबा, शेवयाची खीर, पंचखाद्य या नेहमीच्या पदार्थांबरोबरच सात कप बर्फी कशी बनवावी याचीही कृती आहेत. विविध पेयांच्या कृतीही मिंटने दिल्या आहेत.
घरी जावे आणि फ्रिझ उघडून पहावा आणि कोणतीही भाजी शिल्लक नसावी. बाहेर जाऊन काही आणण्याची इच्छा नसावी आणि भूकही लागलेली असावी. अशाच एकदा भुकेपोटी लागलेला 'लज्जतदार पराठ्यांचा' शोधही येथे आहे.
या पदार्थांबरोबरच त्याच्या टिप्सही मिंटने दिल्या आहेत. उदा. लाल ढबू मिरचीच्या सुपाची कृती सांगताना हिरवी ढबू मिरची वापरून हा पदार्थ करू नये असा 'इशारा'ही ती देते. खुसखुशीत शब्दांत दिलेल्या काही टिप्सने ब्लॉगची लज्जत वाढवली आहे. हिरव्या मिरचीचा खर्डा हा एक अस्सल कोल्हापूर, सातारा भागातला पदार्थ करताना आणि खाताना स्वत:च्या जबाबदारीवर करावा/खावा ही सावधगिरीची सूचनाही ती देते.  ''कोल्हापुरी मिसळ - माझ्या पद्ध्तीने! हॉटेलवाले घालतात तेवढे तेल, आणि तिखट आणि मसाला वापरुन जर मी कुणाला करुन घातली तर मला लोक वाळीतच टाकतील!!!'' ही कॉमेंट त्या मिसळ इतकीच झणझणीत आहे.
या ब्लॉगचे वैशिष्ट्य म्हणजे पदार्थांबरोबर मिंटचे असलेले नातेही तिने अतिशय अल्पशब्दात तितक्याच खमंगपणे मांडले आहे. उदाहरणार्थ बटाटेवड्याची कृती देताना कराडच्या दिवेकरांच्या बटाटेवड्याची आलेली आठवण, लहानपणापासून आवडणारं फोडणीचं वरण शेवयांच्या खिरीसंदर्भात परवीनमावशीकडून येणारा शीरखुर्म्याचा डबा अशा अनेक आठवणी पदार्थांसोबत येऊन त्याची लज्जत वाढवतात.
या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी या ब्लॉगला नक्की भेट दिली पाहिजे.
ब्लॉगचे नाव- वदनी कवळ घेता
ब्लॉगचा पत्ता- http://vadanikavalgheta.blogspot.com/
ब्लॉगर- मिंट
PR
PR
आयटी क्षेत्रात काम करत असणाऱ्या अजितच्या साहित्य जाणीवाही चांगल्या प्रगल्भ आहेत. शिवाय त्याला लिखाणाची ही विशेषतः खुसखुशीत चांगली शैली आहे, हे या ब्लॉगवरील नोंदी पाहिल्यावर आवर्जून जाणवतं. ब्लॉग साधारणपणे कथा, कविता, खुसखुशीत लेख, टीका, प्रवासवर्णन, ललित आणि व्यक्तिचित्रणात्मक लेख अशा लिखाणात विभागला गेला आहे.
यात खसखसमध्ये ४१ म्हणजे सर्वांत जास्त लेख आहेत. (काही लेख इतरही विभागांमध्ये आहेत.) यातल्या चकली या लेखात मातोश्रींना न जमणाऱ्या चकलीवरचं कवित्व चकल्यांइतकंच खुसखुशीत आहे. त्याचा थोडा मासला पाहू.
प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते; ती वेळ आल्याखेरीज काही होत नाही म्हणतात। चकल्यांचेही असंच असावं। प्रत्येक भाजणीची एक वेळ असते। उत्तम भिजवून त्यात (प्यारे) "मोहन" घालून, त्याहून छान वर्णन सांगून चकल्या पाडल्या की तुकडे तयार! मग आमची आई "या वर्षी तांदूळच कसा बरोबर नव्हता (म्हणजे गेल्या वर्षीसारखाच) " पासून ते "पावसाची लक्षणं ना बाहेर आज?" वरुन "सो-या जरा जास्तचा घट्ट बसलाय आज" ते "राजकीय अनिश्चितता आहे ना आफ्रिकेत" अशी सगळी कारणमीमांसा देते.
चकलीच्या या आस्वादावरूनच अजितच्या खुसखुशीत लेखनशैलीची कल्पना यावी. माझा नावडता ऋतू हा पावसाळ्यावर लिहिलेला लेख भन्नाट. पावसाळा आवडत नाही यासाठी दिलेल्या कारणांपैकी `पावसाळ्यात मला सर्दी होते. सर्दीवर अजून कुठलेच औषध सापडलेले नाही. सर्दी मला आवडत नाही. विशेषतः नाक चोंदले की तोंडाने श्वास घ्यावा लागतो. ते आवडत नाही` अशी कारणे वाचताना तुमच्या चेहऱ्यावर मिस्किल हास्य उमटल्याशिवाय रहाणार नाही. धुम-2 या चित्रपटाचे परीक्षण लिहितानाही अजितची लेखणी सुसाट सुटली आहे. त्यातल्या कंसातल्या कॉमेंट तर भन्नाटच. त्याच्या खुसखुशीत सदरात काही किस्सेवजा गमतीदार छोटेखानी स्फुटेही वाचण्यासारखी आहे. भाषेतल्या गमतीजमती सांगताना अजित म्हणतो, आपल्याला जर कोणी 'डोळा मारला' तर मग आपल्याला [तो] 'डोळा लागतो' का?. काय पटलं ना.
ललित सदरात अजितने लिहिलेला गिन्न्या हा लेख वाचकांना नक्कीच त्यांच्या बालपणात घेऊन जाईल. लहानपणी अनेकांना वेगवेगळे छंद असतात. अजितला काड्यापेट्यांवरची कव्हर जमा करण्याचा छंद होता. त्याला गिन्न्या म्हणतात. त्या गोळा करण्याचा आटापीटा, त्यांची साठवणूक आणि एकेदिवशी हरवलेली गिन्न्यांची पिशवी. हे सारं वाचताना उगाचच हुरहुर लागून जाते. नकळत आपण आपल्या बाळपणात जातो. असा कातर बनलेला आपला मूड नंतरच्या रविवार दुपार या खुसखुशीत लेखाने मात्र कापरासारखा उडून जातो. रसिक नावाच्या लेखात गानमैफिलीतील रसिक व क्रिकेटच्या सामन्याचा रसिक या दोहोंतील साम्य छान दाखवले आहे. नारळाचं झाड हा लेखही छान जमलाय. याशिवायही या विभागात इतर छोटेखानी लेख आहेत. तेही तितकेच वाचनीय आहे.प्रवासवर्णनाची कलाही अजितला चांगलीच साध्य आहे, हे त्याने लिहिलेली प्रवासवर्णने वाचून कळते. कोलकत्याचे लिहिलेले प्रवासवर्णन भन्नाट आहे. त्याची सूक्ष्म निरिक्षणशक्ती त्यातून दिसून येते. त्याचा हा छोटा मासला.
``कलकत्ता हे भलतेच "गोड" गाव आहे. हावडा station ते Salt Lake City मधले guest house या प्रवासात आम्हाला याचा अनुभव (की ऑनुभोव) पुरेपुर आला. प्रत्येक गल्लीत, छोट्या-मोठ्या रस्त्यांवर ठळक उठून दिसतात ती "मिष्टान्न भांडारे". 'भांडार' हा शब्द मी खादी भांडार वगॆरे wholesale context मध्ये ऎकला होता. बाग्ला भाषेत भांडार म्हणजे दुकान असल्यामुळे इथे पानाचे दुकान सुद्धा पान-भांडार अशी शेखी मिरवते. एकंदरीतच वंगभाषा अतिशयोक्तीसाठी विशेष वाटते. साधा त्रास सुद्धा "ऑशुबिधा" असा लांबलचक वॆताग देउन जातो.``
याशिवाय हिमालयातील सफर, बेळगावातील प्रवास, बंगलोरमधील अंतर्गत प्रवासाचे अनुभवही छान जमलेत. जावे त्याच्या देशा हा मलेशियन सफरीवर आधारीत तीन भागातील लेख आवर्जून वाचावा असा आहे. पुलंची छापही त्यावर प्रकर्षाने जाणवते. नाशिक ते पुणे या प्रवासावर लिहिलेला लेखही मस्त आहे. विशेषतः हा प्रवास करण्याची वेळ आलेल्यांना (हे वाक्य नकारात्मक झालं नै) तो नक्कीच आवडेल असा आहे.
कथा विभागातील फुलवाली कथा जमलीय. पण खरी मजा कविता विभागात गेल्यानंतर येते. या विभागात अजितला आवडणाऱ्या मान्यवर कवींबरोबरच त्याच्याही काही कविता आहेत. बालकवी हे त्याचे विशेष आवडते कवी. ते का आवडतात यावर त्याने लिहिलेला लेखही वाचनीय आहे. या शिवाय त्याला आवडलेल्या मान्यवर कवींच्या कविताही वाचाव्यात अशाच आहेत.
एकूणच हा ब्लॉग म्हणजे बुकमार्क करून ठेवावा असा आहे.
ब्लॉगचे नाव - उगाच उवाच
ब्लॉगर- अजित ओक
PR
PR
PR
PR
PR
PR
या लेखनानंतर युवराज यांची लेखन मुशाफिरीही सुरू झाली. टाईम्स ऑफ इंडियासारख्या बड्या दैनिकांमधूनही त्यांनी या विषयावर लिहिले. लोकप्रभा या नामवंत साप्ताहिकामधूनही त्यांचे लेखन लोकांपर्यंत जात आहे. प्रसिद्धीच्या एवढ्या विविध वाटा असतानाही, महाजालावर मात्र मराठीतून या विषयावर माहिती नाही, या कळकळीपोटी त्यांनी २००६ मध्ये ब्लॉग सुरू केला.
PR
PR
PR
PR
PR
PR
या ब्लॉगचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर असलेले सुंदर फोटो. युवराज स्वतः उत्तम फोटोग्राफर आहेत. म्हणूनच एवढे सुंदर फोटो त्यांनी दिले आहेत. शिवाय या फुलपाखरातलं नेमकं सौंदर्य काय याची जाणीवही त्यांना असल्यामुळे तो अँगल त्यांनी बरोबर टिपला आहे. त्यामुळे हा ब्लॉग माहितीबरोबरच नेत्रसुखदही झाला आहे. शेजारीच माहिती गुंफल्याने त्यांनी सांगितलेली वैशिष्ट्ये फोटोत पहाताही येतात. त्यामुळे माहितीची मजा आणखी वाढते.
PR
PR
आणखी एक महत्त्वाची बाब. युवराज यांच्या ब्लॉगला चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. ब्लॉगवरील लेखाखाली दिलेल्या कॉमेंटवरून तर ते कळतेच. पण या लेखांचा उपयोग करून ठाण्यातील एका शाळेच्या विद्यार्थिनीने एक प्रोजेक्टही केला होता. याशिवाय अनेक जण त्यांच्याशी फोन, इमेल द्वारे संपर्क साधत असतात. युवराज यांनी वेबवर खुला केलेला खजिना खरोखरच सार्थकी लागतोय असे म्हटल्यास वावगे ठऱणार नाही.
ब्लॉगचे नाव - युवराज बरोबर निसर्ग निरीक्षण
ब्लॉगर- युवराज गुर्जर, ठाणे (महाराष्ट्र) - संपर्क- ९८९२१३८३३८
ब्लॉगचा पत्ता- http://nature-observations-with-yuwaraj.blogspot.com
पांढर्‍यावरचं काळं
PR
PR
तर लेखकाचे नाव राहूल फाटक हे वर आलेच. वास्तविक राहूल मुळचा मुंबईकर. मुंबईतच `पला-बडा` झालेला राहूल आता पुण्यात स्थायिक झाल्यानंतर जातिवंत पुणेकराचे गुणही त्याला चिकटले नसते तरच नवल. तर अशा या राहूलचा ब्लॉग म्हणजे एका वेगळ्या प्रकारच्या वाचनाची पर्वणी देणारा आहे. रोजच्या जीवनात दुर्मिळ झालेला विनोद उपहासाच्या, उपरोधाच्या माध्यमातून राहूलच्या नोंदींमधून मिळतो आणि मनाला प्रसन्न, तजेलदार अनुभव देतो. गांभीर्याची, चिंतेची, काळजीची काजळी झटकून त्यांच्याकडे हसऱ्या नजरेने पहायला शिकवतो. राहूलच्या नोंदी तुम्हाला जालावर भटकणाऱ्या अनेक ई-मेलमधून मिळाल्या असतीलच. (खाली आयशॉट उरफ राफा (सहावी 'ड') असे लिवले असेल तर तो येक राहूल फाटक वोळखावा.) `पावूस` हा त्याचा `निबंद` खूप गाजला. अक्षरशः भन्नाट लिहिलंय बेट्यानं. वाचून हसू नाय आलं तर नक्कीच त्याला हसता येत नसणार. विषय काढलाच तर थोडं हसून घ्या.
``पावूस हा माजा आतिशयच आवडीचा रुतु आहे. पावूसामुळेच शेतात आंबेमोर भात व कणकेचे पिठ पिकते म्हणुनच आपण सगळे जेवू शकतो. पाउसाळ्यात मुख्यतवे गळीत हंगाम असतो. पाउसाळ्यात जास्त करून पावूस पडतो, हिवाळ्यात थन्डी पडते व उन्हाळ्यात ऊन पडते. त्यामुळे वरशभर कुठला ना कुठला रुतु पडिक असतो. 'रिमजिम पडती श्रावण गारा' हे गाणे आतिशय रोमहर्शक आहे. आमचा रेडियो गेल्या वरशी भिजल्याने बिघडला आहे त्यामुळे गाणे नीट ऐकू नाही आले तरीही आतिशयच  आवडले.``
कन्फ्यूजन तो हे अटर हाही त्याचाच एक भन्नाट लेख. राहूलला अनेक प्रश्न पडले आहेत. त्याची त्याला कधीच उत्तरे मिळालेली नाहीत. त्यातले काही प्रश्न तुमच्यासाठी तुम्हाला त्याची उत्तरे मिळाली तर जरूर राहूलला कळवा.
``सीट कव्हर घट्ट बसलेली एम ८० कुणी पाहिली आहे का ? (डीलर ने तरी ?)
ब-याचदा बायका रस्त्याने चालताना, लहान मुलाना ट्रॅफिकच्या बाजूला ठेवून आपण स्वत: अजागळपणे भलतीकडेच बघत का जात असतात ?
'पाणी आडवा पाणी जिरवा' ! पण कुठे अडवा आणि कुठे जिरवा ? ह्या असल्या वाह्यात संदिग्ध पाट्या लिहिणा-याना लिहिण्यापासून अडवले पाहिजे मग तरी त्यांची 'जिरेल' का ?``
पुण्यातील रिक्षावाल्यांवर राहुलचा विशेष अभ्यास आहे. त्यांच्या सवयी त्यानं अगदी बारकाईनं टिपल्या आहेत. त्याच्यावर येता का जाऊ हा लिहिलेला लेख म्हणजे धमाल आहे. रिक्षावाल्यांच्या भाषेसह त्याने जो काही मजा आणलाय तो म्हणजे यंव रे यंव.पुण्यातील खड्ड्यांनी राहूलमधील लेखकाला लिहिण्यातली `खोली` दिली. त्याचा उपहास, उपरोध या ठिकाणी कळस गाठतो. त्याचा खड्डे में रहनें दो खड्डा ना बुझाओ याला निव्वळ अप्रतिम एवढंच म्हणता येईल. यात उंबरकर आणि झुंबरकर यांच्यातील संवाद, खासदार श्री. क.ल. माडीकर आणि पत्रकार बंधू भगिनी यांच्यात रंगलेला कलगीतुरा, महापालिका आयुक्तांची पत्रकार परिषद आणि शेणोलीकर काका ह्यानी एका ट्राफिक हवालदाराची घेतलेली मुलाखत हे महाजालावर हिंडणाऱ्यांनी वाचल्याशिवाय पुढे सरकू नये. हसून हसून पोट नाय दुखलं तर नाव सांगणार नाय, असं लिहिण्याचाही इथे मोह होतोय.
पुण्यातील एकूण वाहतूक व्यवस्थेवरचा डायवर कोन हाय हा लेखही भन्नाट. उद्भवेल्या परिस्थितीवर लागू पडणारे हिंदी शिणुमाचे डायलॉकही मजा आणतात.
या व्यतिरिक्त उलटं जगा, आज, समुद्र, लिखाण ए गंमत ही त्याची वेगळ्या विषयावरची स्फूटसुद्धा वाचनीय आहेत. संगीत व चित्रपटाच्याविभागात रेड ऑन एन्टिबी या चित्रपटावर लिहिलेला लेख नक्की वाचावा. इस्त्रायलच्या विमानाचे युगांडात अपहरण झाले. त्यातील प्रवाशांची इस्त्रायलच्या कमांडोजने तेथे जाऊन सुटका केली ही कथावस्तू असणाऱ्या या चित्रपटाचे जे विश्लेषण राहूलने केलंय ते पटते. त्यातली सौंदर्यस्थळं, मर्मस्थळं त्यानं उलगडून दाखवली आहेत. याच विभागातील चल धन्नो हा लेखही वाचनीय आहे. तोच अनुभव यादों की बारात हा आर. डी. बर्मनवरचा लेख देतो
राहूलमध्ये एक चांगला कथाकारही लपला आहे. त्याची सोनेरी पाणी ही कथा वाचल्यावर याची अनुभूती पटते. लिहिण्याची शैली ते कथावस्तू हे सगळं त्याने छान तोललंय. त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा बाळगायला हरकत नाही.
या ब्लॉगचे वैशिष्ट्य म्हणजे तो चित्रमयही आहे. राहूलने फोटोशॉपवर काढलेली एकेक भन्नाट चित्र येथे पहायला मिळतात. त्यातील सत्तामधील रवीन टंडनचे मुख फार छान जमले आहे. इतर निसर्गचित्रेही पाहण्यासारखी आहेत. पण वैयक्तिदृष्ट्या मला आवडले ते फेसाळ पाणी या नावाचे चित्र. पाण्याच्या लाटा, अर्धस्फूट सावल्या अतिशय बारकाईने रेखाटल्या आहेत. राहूलमधला चित्रकार येथे प्रकर्षाने जाणवतो.
म्हणूनच हा ब्लॉग वाचल्यानंतर आणि त्याची गुणवत्ता तपासायच्या पातळीपर्यंत येऊन ठेपलं की त्याच्याच शब्दांत सांगायचं झालं तर...
तमाम गवाहोंको मद्दै नजर रखते हुए ये अदालत इस नतिजेपे पहुची है की..
....ये ब्लॉग नक्की वाचो. उसको अजिबात मत चुकावो.
आता मायमराठीत...... हा ब्लॉग नक्की वाचा. अजिबात चुकवू नका. (आपल्या भाषेत किती छान वाटलं नै?)
ब्लॉगचे नाव- राहूल फाटक
ब्लॉगर- राहूल फाटक
ब्लॉगचा पत्ता- http://rahulphatak.blogspot.com/
PR
या ब्लॉगचा लेखक आहे 'पम्या'. रहाणार शहर पुणे. आवड पक्षीनिरिक्षण आणि त्या पाठोपाठ येणार्‍या भटकंतीची. त्यामुळे हा ब्लॉग माहितीपूर्ण तर आहेच. पण तितकाच नेत्रसुखदही. पम्यातला पक्षीनिरिक्षक, भटक्या आणि उत्तम छायाचित्रकारही या ब्लॉगमधून दिसून येतो. २००६ मध्ये त्याने हा ब्लॉग सुरू केला. ब्लॉगवरच्या नोंदी विरळ असल्या तरी त्यात काही एक नियमितता आहे. मुख्य म्हणजे माहिती आहे.
सामान्यपणे आपल्याला पक्ष्यांविषयी फारशी माहिती नसते. असलीच तर ती आजूबाजूच्या रोजच्या वावरण्यातल्या पक्ष्यांचीच. त्यापलिकडे आपल्या माहितीचं आकाश विस्तारत नाही. पम्या मुळातच पक्षीनिरिक्षक असल्याने वेगळे पक्षी त्याच्या ब्लॉगमधून भेटायला येतात. पक्ष्यांची छायाचित्रे दाखवून पम्या थांबत नाही, तर त्यांची माहिती, वैशिष्ट्ये आणि त्याला आनुषांगिक अशी इतर माहितीही तो देतो.
PR
तू शाहीन है, परवाझ है काम तेरा, काम तेरा
तेरे सामने आसमां और भी है, और भी है
तू शाहीन है, बसेरा कर, पहडों की चट्टानों पर
तू शाहीन है! तू शाहीन है! तू शाहीन है!
ससाण्याचं किती मार्मिक वर्णन यात केलंय नाही? दरवर्षी रोहित अर्थात फ्लेमिंग पक्षी आल्याचं चित्र जवळपास सर्व वर्तमानपत्रात प्रसिद्ध होतं. या पक्ष्याविषयी छान माहिती पम्यानं दिलीय. फ्लेमिंगो या नावाच खुलासा अनेकांना ते नाव अनेकदा उच्चारूनही माहित नसतो. फ्लेमिंगोला मराठीत अग्निपंख किंवा रोहित पक्षी असं म्हणतात. हा पक्षी उडत जाताना ज्वाळाच उडत जातेय की काय असे वाटते म्हणून Flamingo (Flame is going) असे त्याला म्हटले जाते.
PR
सासवडच्या एका सफरीत आढळलेल्या पक्ष्यांची छान माहितीही त्याने दिलीय. त्यात क्वेल, वेडा राघू, होला, सिंगींग, बुशलार्क, विष्फुल्लिंग नर आणि मादी यांची अतिशय देखणी चित्रे या नोंदीत आहेत. विष्फुल्लिंग या पक्ष्याचे घरटे सापडल्यानंतर त्याचे निरिक्षण करण्याचा अनुभवही छान वाटतो. पक्षीनिरिक्षणातील काही संकल्पनाही या निमित्ताने समजून येतात. उदा. टाईम बजेटिंग करणं. टाइम बजेटिंग म्हणजे नर आणि मादी किती वेळ घरट्यावर असतात? किती वेळा अन्न आणले जाते? कोण भरवते? अंडी कोण उबवते? नर किती वेळ गाणी म्हणतो? या सगळ्याचा आलेख.
PR
पम्या पक्षीनिरिक्षक असल्याने दिसलेला पक्षी कोणता नि त्याचे कूळ खोदून काढण्याचा त्याला भलताच नाद आहे. या नादातून त्याने युवराज या पक्ष्याचे कूळ शोधून काढले. सिंहगडावर एकदा फिरायला गेला असताना त्याला युवराज हा पक्षी दिसला. सुरवातीला त्याचे नाव माहित नव्हते. उपलब्ध पुस्तकातही ते नव्हते. अचानक एका रद्दीवाल्याकडून घेतलेल्या पुस्तकात त्याला त्याचे नाव व इतर माहिती कळाली. ही माहिती देण्याची त्याची शैलीही छान आहे. युवराज या नर व मादी पक्ष्याविषयी लिहाताना तो म्हणतो,
''काळे कुळकुळीत पोट, चॉकलेटी पाय, चिलखत घातल्याप्रमाणे दिसणारे ब्रॉंझ रंगाचे पंख, जिरेटोपाची आठवण करुन देणारा तुरा, त्याचे ते छाती फ़ुगवून बसणे, डोळ्यातली ती चमक आणि एकूणच वागणे, सगळे एखाद्या "बिगडेदिल शहजाद्या" सारखे. हे वर्णन झाले नराचे.''
PR
सासवड भागात पम्या आणि त्याच्या टीमने रातवा या पक्ष्याला शोधून काढून त्याचे फोटो घेतले आहेत. त्याची माहितीही दिली आहे. हे सगळेच वाचायला मजा येते. यानिमित्ताने देणारी इतर माहितीही वाचकाच्या ज्ञानात भर घालणारी असते. उदा. आपण नेहमी बेचका या शब्दाचा वापर करतो. बेचक्यात अडकला वगैरे. पण बेचका म्हणजे काय तर झाडाच्या दोन फांद्या जिथून फुटतात, तो बेचका. पण त्याही पुढे जाऊन तीन फांद्या फुटतात त्याला 'तिचका' म्हणतात ही नवी माहितीही या ब्लॉगमध्ये वाचायला मिळते.
पक्षीजीवनाविषयी जाणून घेण्यासाठी आणि नितांतसुंदर, देखण्या आणि खिळवून ठेवणार्‍या छायाचित्रांसाठी या ब्लॉगला चुकवून चालणारच नाही.
ब्लॉगचे नाव- भटक्या विमुक्त उनाड- पम्या
ब्लॉगर- पम्या
PR
PR
केवळ गाण्यांचा संग्रह हा ब्लॉगचा विषय होतो, ही बाबच मुळात स्पृहणीय आहे. अनेकदा आपण गाणी ऐकतो, पण सर्व गाणी पाठ नसतात. अनेकदा त्याचे नेमके शब्द माहित नसतात. त्यामुळे आपण केवळ चालीचा, त्याच्या संगीताचा आनंद घेतो. शब्दांचा आनंद घेऊ शकत नाही. त्याचा अर्थ समजून घेऊन गाणे मनात रूजविण्यात अडथळा येतो. मराठी गाण्यांप्रती जिव्हाळा, आवड असलेल्या मिलिंद दिवेकर यांनी अतिशय कष्ट घेऊन या गाण्यांची मैफल रसिकांसाठी सादर केली आहे. या ब्लॉगवर गेल्यानंतर आपल्याला छान छान गाण्यांचा शाब्दीक आस्वाद घेता येतो. गाण्यांचे शब्द वाचता वाचताच, आपण कधी गुणगुणू लागतो ते कळतही नाही.
दिवेकरांच्या या गानसत्राची सुरवात गेल्या वर्षी १९ नोव्हेंबरला झाली, ती लळा जिव्हाळा शब्दच खोटे या गाण्याने. यानंतर सुरू झालेला हा सुरेल प्रवास यापुढे बहरत गेला आहे. आतापर्यंत या ब्लॉगमध्ये २१० गाणी झाली आहेत. या गाण्यातही कुठला भेदभाव दिवेकरांनी केलेला नाही. सर्व रसांची गाणी यात आहेत. प्रसिद्ध, अप्रसिद्ध गाणी तर आहेत. पण सुमधूरता व काव्यविशेषता असलेली गाणी हा प्रामुख्याने गाणी निवडण्याचा निकष असल्याचे जाणवते.
मराठी गाणी हा दिवेकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याचे त्यांनी गोळा केलेल्या गाण्यातील वैविध्य पाहून लक्षात येते. म्हणूनच अगदी जुन्या काळातील अण्णासाहेब किर्लोस्करांच्या नाट्यपदापासून ते अगदी आताच्या काळातील अगदी संदीप खरेची गाणी येथे आहेत. मराठी माणसाचा वीक पॉईंट म्हणता येईल अशी, घेई छंद मकरंद, हे सूरांना चंद्र व्हा किंवा दिव्य स्वातंत्र्यरवी आत्मतेजोबले प्रकटला, ही नाट्यगीते त्यांनी मर्मबंधातील ठेवीप्रमाणे जपून ठेवली आहेत.याशिवाय इतर लोकप्रिय, प्रसिद्ध गाणीही येथे आहेत. पण त्याचबरोबर अनेक दुर्मिळ गाणीही वाचायला मिळतात. जुन्या काळातील मंडळींच्या अजूनही लक्षात असलेले खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या हे वि. भा. पाठकांचे गाणेही येथे आहे. अनेकांना गाणे माहित असेल, पण त्याचे कवी व गाण्याचे पूर्ण शब्द माहित नसतील. काही गाणी आजच्या पिढीला माहितही नसतील अशी आहेत. उदा. भर उन्हात बसली धरून सावली गुरं हे १९६० सालच्या उमज पडेल तर या चित्रपटातील गाणं किंवा राजा बढेंनी लिहिलेले आणि सुलोचना चव्हाण यांनी गायलेली कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना ही लावणी.
दिवेकरांच्या ब्लॉगचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ गाणी देऊनच ते थांबले नाहीत, तर त्याचे गायक कोण, संगीतकार कोण, गीतकार कोण आणि संबंधित नाटक, चित्रपट कोणता हेही त्यांनी दिले आहे. त्यामुळे वाचकाला परिपूर्ण माहिती मिळते. अगदी सांग सांग भोलानाथ हे गाणं आज अबालवृद्धांच्या ओठावर आहे. पण त्याचं संगीत लतादिदींच्या भगिनी मीना खडीकरांनी दिले आहे व रचना, योगेश खडीकर व शमा खळे यांनी गायलंय ही माहिती येथे आल्यावर कळते. शाळा सुटली पाटी फुटली आई मजला भूक लागली हे नाशिकच्या योगेश्वर अभ्यंकरांनी लिहिलेले व गाजलेले बालगीत कुंदा बोकिल- भागवतांनी गायले आहे, हे वाचून नवीन माहिती मिळते.
पूर्वीच्या काळी गाणी लिहिलेले कागद मिळायचे. त्यावर ही सर्व माहिती गाण्यासह दिलेली असायची. हा ब्लॉग पाहून अगदी त्याचीच आठवण येते. दिवेकरांनी वाचकांच्या सोयीसाठी अ ते ज्ञ अशा आद्याक्षरांमध्येही गाणी विभागली आहेत. त्यामुळे केवळ आद्याक्षरावरूनही गाणी शोधता येतात.
या शिवाय आधुनिक वाल्मिकी अशी सार्थ उपाधी दिलेल्या गदिमांच्या लेखणीतून उतरलेले गीत रामायणही दिवेकरांनी येथे लिखित स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून दिले आहे. दिवेकरांच्या या सुरेल प्रवासात त्यांना इतरांकडूनही मदत मिळते.  म्हणूनच मराठी गाण्यांच्या या गानकोशात इतरांनीही आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन ते करतात. मग, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणार ना?
ब्लॉग - मराठी चित्रपटातील गाणी
ब्लॉगर - मिलिंद दिवेकर
ब्लॉगचा पत्ता- http://chitrapatgeet.blogspot.com/
आगामी काळात मराठी साहित्य टिकेल काय आणि टिकले तरी वाचेल कोण असले गळेकाढू परिसंवाद महाराष्ट्रात जागोजागी होत असतात. पण इंटरनेटवर जरा जरी सर्फिंग केले तर मराठी साहित्याला वाहिलेले ब्लॉग्ज सगळ्यात जास्त आहेत, हे लक्षात येईल. एवढे ब्लॉग्ज आहेत, म्हणजे त्याला वाचकही आहेत. आणि या वाचकांतही अर्थातच तरूणाईचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे आजकालचे तरूण काहीच वाचत नाही आणि मराठी साहित्य टिकेल काय या `शेवाळवगुंठित` वाक्यांना काहीही अर्थ नाही, हे लक्षात येते.
या ब्लॉग्जवर नजर फिरवली तरी नव्या पिढीचे वाचन, विचार करण्याची क्षमता व नव्या जुन्या साहित्याचा आनंद घेणारी आस्वादक्षमता दिसून येते. ही पिढी चांगले वाचणारी तर आहेच, पण चांगल्या लेखनाचीही चाहती आहे. म्हणूनच यावेळी आपण मराठी साहित्याला वाहिलेल्या आणि तेच नाव असलेल्या 'मराठी साहित्य' या ब्लॉगविषयी जाणून घेऊ.
अमेरिकेत कॅलिफोर्निया राज्यात सॅन डिएगो येथे रहाणार्‍या नंदन होडवदेकर या मर्‍हाटी संगणक अभियंत्याचा हा ब्लॉग आहे. २९ जुलै २००५ ला सुरू झालेल्या या ब्लॉगने गेल्या दोन वर्षांतच नेटकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेटवर भटकंती करणारे व चांगल्या साहित्याचे चाहती असणारी मंडळी या ब्लॉगला ओलांडून पुढे जात नाहीत. म्हणूनच इंडिब्लॉगतर्फे झालेल्या सर्वोत्कृष्ट ब्लॉग स्पर्धेत मराठीतील सर्वोत्कृष्ट ब्लॉग म्हणून त्याची निवड झाली आहे. आकडेवारीतच सांगायचे तर जानेवारीपूर्वीच्या सहा महिन्यात या ब्लॉगला भेट देणार्‍यांची संख्या साडेतीन हजार होती. ब्लॉगवरील साहित्याची सकसता दाखविण्यासाठी एवढे पुरेसे आहे.
आता ब्लॉगविषयी. नंदन, साहित्याचा अगदी खराखुरा चाहता आहे. अगदी त्याच्याच भाषेत सांगायचे तर साहित्य हा विषय नंदनच्या आवडीचा आणि जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळेच साहित्याविषयी दर्जेदार असे काही येथे नेहमीच वाचायला मिळते.
वास्तविक ब्लॉगवर नंदनच्या पोस्टींग खूप उशिरा होतात. पण जे काही तो मांडतो ते दर्जेदार असते. स्वतः नंदन अतिशय चांगला वाचक आहे. तो नुसता वाचक नाही. तो वाचलेले शोषतो. स्वतःत भिनवून घेतो आणि त्याच संवेदनशीलतेने तो ते इतरांपर्यंत पोहोचवतो. त्याचे वाचनही विशिष्ट लेखकांपुरते मर्यादीत नाही.
अगदी आजच्या काळात प्रसिद्धीच्या बाबतीत वळचणीला पडलेले दर्जेदार लेखकांचे लेखनही हुडकून नंदन ते लोकांसमोर मांडतो. त्यातील सौंदर्य आणि त्याच्या जागा दाखवून देतो. म्हणूनच तर दि. बा. मोकाशी या नवकथांकारांपैकीच एक मानल्या जायला हव्या अशा साहित्यिकाच्या 'आमोद सुनासि आले' या कथेतील सौंदर्य तो उलगडून दाखवतो. श्री. दा. पानवलकर यांची चित्रदर्शी वर्णनाची एक सुंदर कथाही तो आवडली म्हणून ब्लॉगवर टाकतो. आणि मोजक्या शब्दांत त्यातील सौंदर्यबिंदू दाखवून देतो.मराठी साहित्यातील अनेक दर्जेदार उतारे तुम्हाला या ब्लॉगवर वाचायला मिळतील. पण त्याव्यतिरिक्त चांगल्या कवितांचा आस्वादही घेता येईल. अगदी पु. शि. रेगे, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, विंदा, पाडगावकर ते अगदी मर्ढेकर, अरूण कोलटकरांपर्यंतच्या कविता येथे वाचायला मिळतात. या कवितांचे सौंदर्यही नंदन अतिशय छान शब्दांत उलगडून दाखवतो.
त्यामुळे कविता त्याला जशी भावली, अगदी तशीच ती वाचकापर्यंतही पोहोचते. मर्ढेकरांच्या मुंबईवरील कवितेचे त्याने केलेले रसग्रहण अगदी वाचायलाच हवे असे आहे. बनगरवाडीत व्यंकटेश माडगूळकरांना भेटलेला आणि मुंबईतील कांदेवाडीत गंगाधर गाडगीळांना भावलेला पाऊस उतार्‍यांच्या रूपात नंदनने वाचकांच्या भेटीसाठी एकत्रित आणला आहे. दोन्ही प्रतिभावंतांची ही गळाभेट आपल्यालाही भावते.
नंदनच्या ब्लॉगवर दोस्तायेवस्की, मराठी साहित्यातील स्त्री-वाद, मराठी साहित्यातील किशोर वाड्मयाचे स्थान अशा अनेक विषयांवर लिहिलेले लेख आहेत. नंदन चांगल्या साहित्याचा चाहता तर आहेच, पण या आवडीचे वर्तुळ विस्तारावे यासाठी प्रयत्न करणारा कृतीशील वाचकही आहे. या कृतीशीलतेतूनच त्याने दोन उपक्रम राबविले. आपल्या आवडणारी पाच पुस्तके, वाचायची राहिलेली पाच पुस्तके ही वाचनमोहिम त्याने राबवली.
अनेकांना त्याने यासाठी 'टॅग' केले. त्यातून चांगल्या पुस्तकांचे संचित जमा झाले. मराठीतील चर्चेत असणारी व चांगली पुस्तके म्हणूनही ही यादी (प्रत्येकाची वेगळी असली तरीही) महत्त्वाची आहे. सध्या तो 'जे जे उत्तम' हा उपक्रम राबवतो आहे. यात मराठी साहित्यात जे चांगले उतारे वाचनात येतात, ते नेटवर द्यायचे असा हा उपक्रम आहे. यातही टॅग केले जाते, त्यामुळे ज्याला टॅग केले जाते त्यावर आपल्या वाचनात आलेले चांगले उतारे देण्याची जबाबदारी येते. यामुळे चांगले काही जे वाचनातून सुटून गेले किंवा वाचताना न लक्षात आलेले असे सौंदर्य अनुभवायला मिळते.
नेटवर फिरताना वेळ वाया न घालविण्यासाठी आणि चांगले काहीतरी वाचायला मिळेल या आशेने फिरत असाल तर या ब्लॉगला नक्की भेट द्या. नंदनचा या व्यतिरिक्त अनुदिनी अनुतापे, Viprashna, Amalgam of thoughts, A picture is worth... हे तीन ब्लॉग आहेत. तेही आवर्जून भेट देण्यासारखे आहेत.
ब्लॉगर- नंदन होडवदेकर
ब्लॉगचे नाव- मराठी साहित्य
ब्लॉगचा पत्ता- http://marathisahitya.blogspot.com
ब्लॉग लिहिणार्‍याच्या भावनांची अभिव्यक्ती करणारे व्यासपीठ असले तरी त्यातून अनेकदा इतरांनाही पुष्कळ काही मिळतेसुद्धा. अशा ब्लॉगची मराठीत कमी नाही. इंटरनेटवर मुशाफिरी करताना असे ब्लॉग्ज टाळून चालत नाही. आता 'पांढर्‍यावरचं काळं' हाच ब्लॉग घ्या. वाचताना आपल्याला नविन काही सापडत जातं. बाहेर पडताना आपण समृद्ध होऊन बाहेर पडतोय याचा आनंद होतो.
अर्चना हा ब्लॉग लिहिते. तिच्याविषयी फारशी माहिती ब्लॉगवर नाही. ती स्वतः संस्कृत साहित्याची अभ्यासक आहे. शिवाय इतर भाषांविषयीसुद्धा तिला ममत्व आहे. म्हणूनच अनुवाद हा प्रकार तिच्या जास्त आवडीचा आहे. त्यामुळे ब्लॉगचं स्वरूपही तशाच प्रकारचं आहे.
संस्कृत आवडीचाही विषय असल्याने संस्कृत अनुवादीत साहित्याची ब्लॉगवर रेलचेल आहे. भासाच्या स्वप्नवासवदत्तम नाटकाच्या सहा अंकांचा अतिशय सुंदर अनुवाद वाचायला मिळतो. भासाचे हे नाटक संस्कृत साहित्यातील अजरामर साहित्यापैकी एक आहे. भरतमुनीच्या नाट्यशास्त्रानुसार नाटकात झोप दाखवता येत नाही. पण भासाने झोपेत पडणारं स्वप्न नाट्यरूपात दाखवलं. या नाटकाच्या अनुवादासह त्याची पार्श्वभूमी व एकूण या नाटकाच्या सौंदर्यस्थळांचं विवेचन करणारे लेखही वाचनीय आहेत. या लेखांची व अनुवादाची वाचनीयता त्याखाली दिलेल्या प्रतिसादातूनही दिसून येते. कालिदासाच्या उत्तुंग नाट्यप्रतिभेविषयी आदर असणार्‍या अर्चनाला भास मात्र त्याहून जास्त आवडतो. त्याविषयीचे तिचे विश्लेषण भास या लेखात येते. हा लेखही आवर्जून वाचावा असा आहे.
संस्कृत साहित्याविषयी लिहिताना तिने कटपयादि सूत्रांवर लिहिलेला लेख माहितीपूर्ण आहे. दैनंदिन व्यवहारात अनेकदा मोठ्या आकड्यांच्या संख्या लक्षात ठेवायला लागतात. त्या लक्षात ठेवण्यासाठी कटपयादि सूत्र अतिशय उपयुक्त ठरते. अंकांना अक्षरांमध्ये लक्षात ठेवण्याविषयीचा लेख ज्ञानात भर घालणारा आहे.
अर्चनाच्या अनुवाद शृंखलेतील आणखी एक मोती म्हणजे गुरूवर्य रवींद्रनाथ टागोरांच्या 'द क्रिसेंट मून' या काव्याचा मराठी भावानुवाद. चर्चगेटला फिरत असताना अचानक अर्चनाच्या हाताला हे पुस्तक लागलं. त्यात रवींद्रनाथांच्या ४१ कविता आहेत. एका बैठकीत त्या वाचून काढल्यानंतर तिला त्याचा अनुवाद करावासा वाटला. हा अनुवादही सरस उतरला आहे. अर्चनाचं अनुवाद विश्व केवळ संस्कृत व इंग्रजी भाषेपुरतं मर्यादीत नाही. हिंदीतील चांगली गाणी, शेर यांचाही तिने छान अनुवाद केला आहे. वानगीदाखल घ्यायचे तर आनंद चित्रपटातली 'कहीं दूर जब दिन ढल जाये' या गाण्याचा तिने केलेला अनुवाद बघूया.
नभी दूर दिन मावळू लागे
सांजवधुही पदर सावरीत भूवरी उतरे
मम मनाच्या गाभार्‍यात
कोण गे उजळे हे स्वप्नदिवे, हे स्वप्नदिवे …
क्षणी एका अवचित श्वास जडावे
पळी त्याच नयनांत जलद दाटले
येइ जवळ कोणी प्रेमभराने
स्पर्श करी पण नजर ही चुकवे, नजरही चुकवे …
कधी गीत मीलनाचे राही अधुरे
तर कुठे जुळे नाते जन्मांतराचे
अडके गुंती, वैरी मन माझे,
मज छळी साहुनी ते […]जॉर्ज कूपरच्या द लिव्हज अँड वाईंड या कवितेचा अनुवादही मजा आणतो. जॉन अक्करकरन याच्या द मॉन्सून स्टोरी या कवितेचे प्रसाद शिरगावकरने केलेला अप्रितम अनुवाद आणि त्याच कवितेवर अर्चनाने लिहिलेली लघुकथाही येथे वाचायला मिळते. तिच्या या अनुवादात मला वैयक्तिकरित्या मार्क ट्वेनच्या द डेथ डिस्क या कथेचा अनुवाद (खरे तर रूपांतरण म्हणणे योग्य ठरेल.) आवडला आहे. या कथेचे पूर्णपणे भारतीयकरण करताना ती परकिय संकल्पनेवरून उचलली आहे, हे कुठेही तिने दाखवून दिलेले नाही. एका मुलीच्या वडिलांना झालेली देहदंडाची शिक्षा आणि त्यात अपघाताने तिने बजावलेली भूमिका असा सगळा मानसिक गुंता मांडणारी कथा शेवटपर्यंत वाचकाला खिळवून ठेवते. हे श्रेय जेवढे मार्क ट्वेनचे तेवढेच तिचा सरस अनुवाद करणार्‍या अर्चनाचेही. नुकताच तिने शेरलॉक होम्सच्या कथेचा अनुवाद दिला आहे. बारावीची परीक्षा संपल्यानंतर तिने केलेला हा अनुवाद हा तिच्यातील अनुवादक किती आधीपासून जागा झाला होता, याची प्रचिती देणारा आहे.
केवळ अनुवादच नाही, तर अर्चनाची स्वतंत्र निर्मितीही येथे कथा, कवितांतून आणि संस्कृत समस्यापूर्तीतून दिसते. भूकंपावर आधारीत कथा तिने लिहिलेली कथा खऱोखरच वेगळी आहे. त्याला पार्श्वभूमी अगदी जुन्या म्हणजे संस्कृत साहित्याच्या काळाची दिली आहे. सुनामी आल्यानंतर तिच्या डोक्यात या कथेचे बीज पडले. तिने ते फुलविले. त्यासाठी भूकंपाविषयी  संस्कृतात जे लिहिले आहे, ते वाचून तिने ही कथा लिहिली. स्वतंत्र निर्मिती म्हणून कथा वाचावी अशी आहे.
तिने दिलेल्या संस्कृत समस्यापूर्तीही ज्ञानवर्धक आहेत. एकूणच या ब्लॉगला भेट दिल्यानंतर आपण रित्या हस्ते परतत नाही. काहीतरी घेऊनच जातो. ज्ञानसागरातील बिंदू आपोआप आपल्याकडून टिपला जातो. ज्ञान या संकल्पनेविषयीचा एक श्लोक आणि त्याचा अर्चनाने केलेला हा भावनुवाद पहा.
अपूर्वः कोऽपि कोषोऽयं विद्यते तव भारति।
व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति सञ्चयात्॥
''प्रत्येक देवतेची काही ना काही खासियत असते. कोणा इंद्राकडे संहारक अस्त्र असतं, कोणा कृष्णाकडे जगन्मोहिनी बासरी असते, कोणा लक्ष्मीकडे दामाजीपंत असतात, तशी ही आपणा सर्वांना वंदनीय अशी वाग्देवता, हिच्याकडे एक जादूचा खजिना आहे. या खजिन्यातलं द्रव्य इतरांमध्ये वाटलं, की कमी न होता उलट वाढतं. आणि कुणालाही न देता जर तसंच साठवून ठेवलं, तर आपलं आपण कमी होतं. असं एक अजब द्रव्य या खजिन्यात भरलेलं आहे, आणि ते म्हणजे ज्ञान!''
अर्चनाच्या ब्लॉगवर आल्यानंतर या संस्कृत सुभाषिताचा अनुभव येतो.
ब्लॉगचे नाव- पांढर्‍यावरचं काळं
ब्लागर - अर्चना
ब्लॉगचा पत्ता- http://pandharyavarachekale.wordpress.com/
हिरव्या निसर्गाची भूल कुणाला पडत नाही? फडकेंनाही ती पडली आहे. म्हणूनच हिर्वा रंग, झाडं, पान, फुलं आणि पक्षी हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्याचे प्रतिबिंब ब्लॉगमध्येही पडले आहे. एका रविवारी मुंबईच्या जिजामात उद्यानात जाऊन येण्याचा तो अनुभव काय, पण त्यावर त्यांनी लिहिलेल्याचा थोडा आस्वाद घेऊया.
``परवाचा माझा रविवार इतका हिरवागार होता!! नुसता हिरवागारच नाही तर जोडीला चाफ़्याचा शुभ्र रंग होता. पेल्टोफ़ोरम चा पिवळा सोनेरी मोहोर होता. तिवराच्या लाल गुलाबी नाजुक चांदणीसारख्या फ़ुलांच्या सड्याचा होता. समुद्रफुलाच्या एकाचवेळी प्रशस्त तरीही नाजुक, साध्या तरीही डौलदार आकाराच्या फुलांचा होता. केवड्याच्या रानाचा होता. तामणीच्या निळ्या जांभळ्या बहराचा होता. कैलासपतीच्या तोफ़गोळ्यांसारख्या दिसणार्‍या फ़ळांचा आणि त्याच्या विलक्षण देखण्या नागफ़णी असणार्‍या फ़ुलांचाही होता. दुर्मिळ भद्राक्ष आणि भूर्ज वृक्षाचा होता. सीतेच्या अशोकाचा आणि आसूपालवाचा होता. प्रचंड मोठा विस्तार असणार्‍या प्राचीन वडाचा आणि दहा जणांच्याही कवेत न मावणार्‍या अफ्रिकन बाओबाब वृक्षाचा होता. लोभस अमलताश आणि सुरेख रामधन चंपाचाही होता. सर्वात जास्त देखणेपण ह्या रविवारच्या मी पाहीलेल्या हिरवाईला लाभल ते दुर्मिळ उर्वशीच्या भान हरपून टाकणार्‍या अलौकिक रंगाच्या आणि देखण्या आकाराच्या फुलांमुळे.``
मजा आली की नाही. असाच माझे जडावाचे दागिने नावाचा लेखही वाचनीय आहे. फडकेंचे दागिने म्हणजे दुसरे तिसरे काही नसून पुस्तके आहेत. या पुस्तकांविषयी त्यांनी फार आसुसून लिहिले आहे. रिनोव्हेशनच्या निमित्ताने घर आवरत असताना पुस्तकांची आवरासावर करावी लागली आणि या कामातच पुस्तकांची एक मस्त मैफलच सजली. विविध पुस्तके हाताळताना त्याच्या विषयीच्या आठवणीही दाटून आल्या. हा लेख म्हणूनच मुळातून वाचण्यासारखा आहे. वाचताना फडकेंचा स्वतःचा ग्रंथसंग्रह आणि वाचनाची आवड किती तीव्र आहे, हेही समजते. त्यांच्या या अक्षरधनाविषयी त्यांनी फार छान लिहिलंय. ते त्यांच्याच शब्दात वाचूया.
``काही काही बायका कशा सणासुदीला किंवा ठरावीक महिन्यांनी एकेक ग्रॅम सोने, एकेक वळे वगैरे जमा करत रहातात तशीच अगदी मी हे माझे सारे अक्षरदागिने जमा केलेले. ह्यातले बरेचसे दागिने माहेरहून पण मिळालेले. माझं स्त्रीधनच हे सारं. मी हळूवारपणे एकेक दागिना न्याहाळला. हाताळला. हळूच अंगावर चढवून पहावा त्यातला एखादा, तसं एखाद पुस्तक पानं उघडून थोड चाळलं. काही दागिने कसे रोजच्या वापरातले. काही ठेवणीतले. काही असेच हौस म्हणून खरेदी केलेले, त्या त्या वेळची क्रेझ म्हणून. पण ते नुसतेच दिखावू, शोभेचे ठरले. ते जरा मागच्या कप्प्यात ढकलले. ह्यातला प्रत्येक दागिना खरेदी करतानाच्या आठवणी पण तेव्हढ्याच खास.``
त्यांचा गृहव्यवस्थापिका हा लेखही खुसखुशीत आहे. त्यांच्या मते घरात सुस्त, त्रस्त, व्यस्त आणि मस्त अशा प्रकारच्या गृहव्यवस्थापिका म्हणजे गृहिणी असतात. त्यांची वैशिष्ट्ये त्यांनी अगदी वेधक शब्दांत टिपली आहेत. याशिवाय भूतानभेटीवर आधारीत त्यांचा लेख फारच छान आहे. हे नुसतं प्रवासवर्णन नाही. तिथली संस्कृती आणि होणारे बदल टिपणारा हा लेख आहे. एका पत्रकाराची जागृत दृष्टि त्यातून दिसून येते. म्हणूनच साठच्या दशकापर्यंत अस्पर्शित असणारा हा देश त्यानंतर आधुनिकतेच्या वाटेवर चालताना किती वेगात जातो आहे, हे लिहिताना लेखिकेची लेखणीही कातर झाल्यासारखी वाटते. तिथल्या निसर्गाचा रंगही त्यांनी फार छान टिपला आहे.
जालावर भटकत असताना या ब्लॉगवर यायलाही हरकत नाही. शर्मिलाताईंनी लिहिण्यात सातत्य ठेवलं तर वाचायलाही आणखी मजा येईल.
ब्लॉगचे नाव- शमा-ए-महफिल
ब्लॉगर- शर्मिला फडके
PR
PR
अनुवादित साहित्याचे महत्त्व सांगताना अदिती म्हणते, ''सध्याच्या काळात परदेशगमन पूर्वीपेक्षा फारच सोपं झालं आहे. पण परदेशगमनाइतकंच मनोरंजक असतं ते परदेश समजून घेणं जे बरेचदा तिथे प्रत्यक्ष जाऊनही जमत नाही. पण परभाषांमधल्या उत्कृष्ठ साहित्यात ही किमया करण्याची शक्ती असते. त्या त्या प्रांतातल्या साहित्यकृतींमधून तिथल्या लोकजीवनाचं, त्यातल्या प्रेरणांचं,सुखदुःखाचं आणि एकूणच साऱ्या मानवी जीवनाचं एक प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. एक असं प्रतिबिंब जे खरं असतं. निर्मळ असतं. आपल्या मनातले विचार समाजातीत इतरांना सांगण्याच्या प्रक्रियेतून जन्माला आलेलं असल्यामुळे ते अतिशय प्रामाणिक, क्वचित रोकठोक सुद्धा असू शकतं. या साहित्याचा जर मुळातून आस्वाद घेता आला तर ते फारच छान असतं पण जगातल्या सर्वच भाषा सगळ्यांना येणं जे अशक्य आहे. म्हणून आपल्यासमोर पर्याय उभा राहतो तो भाषांतराचा.''
अदितीच्या ब्लॉगची सुरवात आनंदी आनंद गडे या लेखाने झाली आहे. अनुवादित साहित्य वाचण्याची आवड कशी लागली हे सांगणारा लेखही वाचनीय आहे. लहानपणी ग्रंथालयात गेल्यानंतर भा. रा. भागवतांनी आनंदी आनंद गडे या नावाने भाषांतरीत केलेल्या एका इंग्रजी पुस्तकाने अदितीचे लक्ष वेधून घेतले आणि हे हातात घेतलेल्या पुस्तकच तिच्या आवडीला कारणीभूत ठरले. जगन्नाथ कुंटे यांचे नर्मदेच्या परिक्रमेवरचे 'नर्मदे हर' हे पुस्तक खूप गाजले. या पुस्तकाविषयी अदितीने लिहिलेला लेख वाचनीय आहे. शिवाय तिला भावलेल्या काही पुस्तकांविषयी तिने जे काही लिहिलेय त्यावरून ती पुस्तके वाचण्याची नक्कीच ओढ निर्माण होते.
मार्जोरी किनन रेलिंग्ज या लेखिकेने लिहिलेल्या द यर्लिंग या पुस्तकाचे राम पटवर्धनांनी पाडस या नावाने मराठीत भाषांतर केले आहे. हे पुस्तक काय आहे नि ते का आवडावे यावर अदितीने लिहिलेला लेख अगदी आवर्जून वाचावा असा आहे.
अदिती अनुवादित साहित्याच्या पुस्तकांची ओळख करून देण्यावरच थांबत नाही. तिनेही काही अनुवाद यावर पोस्ट केले आहेत. त्यातील जेफ्री आर्चरची 'डू नॉट पास गो' या कथेचा अनुवाद मस्त जमला आहे. याशिवाय ऑर्थर कॉनन डायल याच्या होम्सकथांचेही अदितीने अनुवाद केले आहेत. यातील प्रॉयॉरी स्कूल ही अतिशय रंजक व औत्सुक्यपूर्ण कथा अदितीने त्याच शैलीत अनुवादीत केली आहे. होम्सकथांची मोहिनी अदितीवर बरीच आहे. म्हणूनच त्याच्या आणखी एका कथेचा तीन विद्यार्थी म्हणून केलेला अनुवादही सरस उतरला आहे. याशिवाय नौदलाच्या कराराचा मसुदा, संत्र्याच्या बिया या होम्सकथाही वाचवल्याशिवाय पुढे जाता येत नाही.
अदितीवर होम्सकथांचा प्रभाव एवढा का असावा याचे विश्लेषण तिनेच 'माझे हिरोज' नावाच्या लेखात केले आहे. त्यात ती म्हणते, ''डोक्यावर टोपी, तोंडात पाईप असलेली त्याची मुद्रा मलपृष्ठावर असलेलं ते पुस्तक मी पहिल्यांदा वाचलं तेंव्हा त्याचं नाव मी नुसतंच उडत उडत ऐकलं होतं. त्याची थोरवी किंवा त्याचा 'बाप'पणा मला अजिबात माहीत नव्हता. तरीपण शंभर वर्षांपूर्वीच्या त्या कल्पनेतल्या खाजगी गुप्त पोलिसाने म्हणजे अर्थातच शेरलॉक होम्सने माझा पुरता कब्जा घेतला. आपण वाचतोय ते काहीतरी विलक्षण आहे हे मला जाणवलं. पण होम्स वाचल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया मला अजून आठवते. याला रेल्वेगाड्या वेळेवर कशा मिळतात? तारा अचूक पत्त्यावर कशा येतात? केवळ रेल्वे वेळापत्रक आणि आपलं घड्याळा एवढ्या गोष्टींच्या साहाय्याने तो आपला दिनक्रम कसा काय आखू शकतो?''
'माझे हिरो'ज हा अदितीने लिहिलेला लेख वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर तिला आवडलेल्या लेखकांविषयी, पुस्तकांविषयी व त्यातील नायकांविषयी आहे. भा. रा. भागवतांच्या फास्टर फेणेपासून तर अगदी आताच्या हॅरी पॉटरपर्यंत अनेक हिरो तिला या वाचनाच्या प्रवासात भेटले. मधल्या काळात मृत्यूंजयमधील कर्ण, फाऊंटनहेडमधील रोआर्क हेही तिच्या मनावर ठसले. त्याविषयी अदितीने अगदी आसूसून लिहिले आहे. वाचन वैयक्तिकदृष्ट्या किती समृद्ध करणारा अनुभव असतो ते हा लेख वाचल्यानंतर कळते. आदितीचा ऍगाथा ख्रिस्तीच्या द सीक्रेट ऍडव्हर्झरी वरील परिचयात्मक लेखही उत्तम आहे.
अदितीचा ब्लॉग चुकवून चालत नाही, हे तिच्या ब्लॉगच्या या परिचयावरूनही कळलं असेलच. मग तिच्या ब्लॉगला भेट देणार ना?
ब्लॉग- पुस्तकायन
ब्लॉगर- अदिती
PR
PR
'विदग्ध' या नावाचा हा ब्लॉग असून शैलेश खांडेकर हे त्याचे लेखक आहेत. पुणे येथे रहाणारे खांडेकर त्यांच्या भाषेत सांगायचे तर 'संगणक आज्ञावलीच्या' चवर्‍या ढाळतात. संगणक क्षेत्रात काम करत असणार्‍या खांडेकरांचे भाषा, गणित, संगणक, संगीत,  भौतिकशास्त्र, व्याकरण असे अनेक विषय आवडीचे आहेत. हा ब्लॉग विशिष्ठ विषयाला असा वाहिलेला नाही. पण बहुतकरून त्यावर कथा, स्फूट, काव्य, ललित, तंत्रज्ञान व विनोदी लेखन या प्रकारातील लेखन आढळते. गेल्या वर्षी फेब्रुवारीत हा ब्लॉग सुरू झाला. ''अमृताते पैजा जिंकणा-या रसाळ मराठी भाषेतील एक लहानशी ज्ञानज्योत'' असे खांडेकर आपल्या ब्लॉगचे वर्णन करतात.
नांदीलाच पाऊस या विषयावर त्यांनी अप्रतिम ललित लिहिलं आहे. त्यांच्या लेखनाचा हा मासला पहा.
''ऊन-पावसाच्या खेळात रंगांचा दंगा चालतो. जेथे अक्ष रमतात ते अक्षर असे एक वचन आहे. पाऊस म्हणजे अक्षांचा विसावा आहे. तशीच प्रेरणाही आहे. इंद्रधनुच्या या जनकाचे आणि वा-याचे विशेष अनुबंध आहेत. हे दोघे सूर्याचे किरण आपल्या ओंजळीत झाकून तृर्षात डोळ्यांत आशेचे किरण जागवतांत.''
ललितलेखनाची नस खांडेकरांना सापडली आहे. त्यामुळेच त्यांचे समईची शुभ्र कळी, सौंदर्य, ग्रीष्माख्यान, समुधूर भाषिणीम वाचायला मजा येते. भाषेवरची त्यांचे चांगले प्रभूत्व आहे. शिवाय त्यांचे वाचनही उत्तम असल्याचे कळते. लिहिता लिहिता अचानक ते संदर्भ देऊन जातात त्यातून या वाचनाचा प्रत्यय येतो.
याशिवाय खांडेकरांचा विनोदी लेखनाचा बाजही छान जमला आहे. बारीकरावांनी भिंगेबाईंना निविदा सूचनांच्या रूपात लिहिलेले प्रेमपत्रही झकास जमले आहे. उड्या मारण्याचा जागतिक दिन वगैरे हास्यस्फुटेही वाचनीय आहेत. साहित्यिक्स हे स्फूट तर मस्तच जमलंय.  ब्लॉगला मराठीत नेमके काय म्हणायचे जालनिशी? नोंदस्थळ, अनुदिनी की कोणता शब्द वापरावा, यावर खांडेकरांनी पाडलेला 'किस' वाचण्यासारखा आहे.
हास्यस्फुटाव्यतिरिक्त खांडेकरांचे इतर स्फूटलेखनही छान आहे. थोडक्यात पण चांगले काही वाचल्याचा आनंद त्यातून मिळतो. पण या स्फूट प्रकारात त्यांनी अनेक विषयांवर लिहिले आहे. अगदी सी. व्ही. रामन, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापासून ते अगदी मनात असलेल्या एखाद्या विषयावर लिहिले आहे. रवींद्रनाथ ठाकूरांच्या गीतांजलीचा एका मराठी गृहस्थाने संस्कृतात अनुवाद केला. त्याविषयीचे स्फूटही वाचनीय आहे. याशिवाय त्यांनी एक नाटकही लिहिले आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्या ते सखे नावाची एक कादंबरी लिहित असून त्याचे २७ भाग झाले आहेत.
खांडेकरांना महाजालावर भटकण्याचाही चांगलाच नाद आहे. अर्थातच हा नाद त्यांना ज्ञानाच्या अनेक पाणपोयांपर्यंत नेऊन पोहोचवतो. सहाजिकच 'जे जे आपणा ठावे ते ते इतरांस सांगावे' या न्यायाने मग ते त्याची माहिती इतरांपर्यंत पोहोचवतात. त्यातून खूप चांगली माहिती मिळते. उदा. अंकाविषयी लिहिलेल्या स्फुटात त्यांनी छंद बाळगणार्‍यांविषयीचा दुवा दिला आहे. अनेकदा आपल्याला अनेक बिनकामाचे इ- मेल येत असतात. त्यांना रोखण्याविषयीच्या संकेतस्थळाचा दुवा अशा अनेक संकेतस्थळांची माहिती आपल्याला यातून मिळते.
खांडेकर स्वतः संगणकाच्या दुनियेत असल्याने या विषयावरील लेखही येथे बरेच आहेत. त्याच्याविषयीच्या माहितीचा संकेतही ते देतात. त्यामुळे वाचकाच्या रोखाने जणू माहितीचा पूर वाहत असतो. उदा. बिल गेट्सच्या निवृत्तीसंदर्भातही त्यांनी अनेक दुवे  सुचविले आहेत.
खांडेकरांच्या या ब्लॉगचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर संगणकविषयक शब्दांसाठीची 'मर्‍हाटी' भाषा आहे. संगणकीय शब्दांना मराठी प्रतिशब्द देण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. त्यासाठीच त्यांचा एक उपक्रमही सुरू आहे. त्याअंतर्गत त्यांनी दिलेले हे पर्याय वाचा बरं.
''Bulleted list (text style) चिंचोग्दी (चिंचोक्या+यादी, संधी, त्याचे लघुरूप, Computing संगणन, Connection संयुज, Constant अधृव, Control-Click नियंचकी, CPU / Central Processing Unit समात्य (संगणकाचा अमात्य), Cursor दर्शल Operating System संविधी (संगणन विधी)''
मातृभाषेविषयी आत्यंतिक आग्रही असणार्‍या खांडेकरांचा मर्‍हाटी बाणा यातून दिसून येतो. म्हणून ''मी ध्वन्यपथाने विश्वगोफात शिरत असल्याने संयुज वेग मर्यादितच मिळतो.'' हे वाक्यही ते लिलया लिहून जातात. त्यांच्या मते इंग्रजी शब्दाला पर्याय
म्हणून दिलेले हे शब्द सुरवातीला अपरिचित वाटतील. पण एकदा रूळले तर मराठीत या शब्दांची भरच पडेल. खांडेकरांची ही मनीषा नक्कीच पूर्ण होईल. मग या ब्लॉगला नक्की भेट देणार ना?
ब्लॉगचे नाव- विदग्ध
ब्लॉगर- शैलेश खांडेकर- पुणे
ब्लॉगचा पत्ता -http://vidagdha.wordpress.com
माधव शिरवळकर हे नाव मराठी वाचकाला विशेषतः तंत्रज्ञानविषयक वाचकाला नवे नाही. गेल्या अनेक वर्षांपासून विविध वर्तमानपत्रात त्यांचे लिखाण येते आहे. लोकसत्तात गाजलेल्या संगणक जगत या सदराचे लेखक ते हेच. याशिवाय समग्र राम गणेश गडकरी हे मराठीतील पहिले ई- बुकही त्यांनी प्रकाशित केले. त्यानंतर केशवसुत, लक्ष्मीबाई टिळकांचे आत्मचरित्र स्मृतिचित्रे यासह सुमारे पन्नास मराठी, इंग्रजी ई बुक्सची निर्मिती केली आहे.
तर अशा या शिरवळकरांचा ब्लॉग म्हणजे संगणकावर काम करणार्‍यांचा मार्गदर्शक आणि जालावर भटकंती करणार्‍यांसाठीचा पथदर्शक आहे. हे मार्गदर्शक आणि पथदर्शक वगैरे जड शब्द का वापरले असा प्रश्न तुम्हाला कदाचित पडला असेल. पण या ब्लॉगला तुम्ही भेट दिली तर याचा अनुभव तुम्हालाही आल्याशिवाय रहाणार नाही. हा ब्लॉग म्हणजे संगणकाविषयीचा एनसायक्लोपिडीया किंवा आन्सर.कॉम आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
संगणकविषयक कोणताही प्रश्न तुम्हाला पडलेला असो या ब्लॉगद्वारे शिरवळकरांना तो विचारल्यास तुम्हाला त्याचे उत्तर मिळेल. Tiff, JPG, GIF यांचा लॉंगफॉर्म म्हणजे काय पासून ते Blue Ray Disk म्हणजे नेमकं काय किंवा तुमच्या संगणकात येणारा प्रॉब्लेम असो किंवा एखाद्या संगणकीय जगतातील संज्ञेविषयी तुमच्या मनात दाटलेलं कुतूहल असो, अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे मिळू शकतात. या प्रश्नांची उत्तरे देऊनच शिरवळकर थांबत नाही तर उत्तरासंदर्भात अधिक माहिती देणार्‍या संकेतस्थळांचा दुवाही ते देतात. त्यामुळे तेथे जाऊनही आपल्याला ती माहिती मिळू शकते. शिवाय आगामी काळासाठी आपल्याकडे अशा संकेतस्थळांची बॅंकही तयार होते. माहिती शेअर करण्याचा हा त्यांचा दृष्टिकोन अतिशय चांगला आहे.
शिरवळकरांच्या ब्लॉगचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते जालावरचे अस्सल भटके आहेत. त्यांच्या या भटकंतीत त्यांना अनेक माहितीपूर्ण संकेतस्थळं सापडतात. आठवड्याची सात संकेतस्थळं म्हणून ते त्याची संक्षिप्त माहिती देतात. ते शिफारस करतात त्या संकेतस्थळांचे विषयही वैविध्यपूर्ण असतात. त्यामुळे आपल्या माहितीच्या कक्षाही चांगल्याच रूंदावरतात. उदाहरणेच सांगायची झाली तर व्होडका कसा बनवावा, त्याचा इतिहास, सॅंडविच शब्द कसा आला, त्याचा इतिहासा, वृत्तपत्रांचा इतिहास दर्शविणारी साईट, मोफत छायाचित्रे डाऊनलोड करण्याची सुविधा कुठे आहे, रूग्ण व त्याच्या नातेवाईकांना विविध चाचण्यांबद्दल माहिती कुठून मिळेल अशा अक्षरशः शेकडो संकेतस्थळांविषयीची माहिती त्यांनी दिली आहे. माहितीचा हा पूर उर धपापून टाकणारा आहे.
याशिवाय कुठे काय आहे आणि कुणासाठी ते उपयुक्त आहे याची शिफारसही ते करतात. त्यामुळे आपल्या आवडीच्या विषयांसंदर्भात किंवा आपल्याशी संबंधित विषयाचे संकेतस्थळ पाहता येते. त्याचे दुवेही ते देतात. अनेक संकेतस्थळांवर मोफत सॉफ्टवेअर असतात. त्याविषयीही ते माहिती पुरवतात. किंवा एखादी फॉंट पुरविणार्‍या संकेतस्थळाचीही ते शिफारस करतात. थोडक्यात जालावर भटकंती करताना कवडीही न खर्चता मोफत अनेक बाबी मिळतात तेही या ब्लॉगवर गेल्यानंतर कळते.
शिरवळकरांच्या ब्लॉगचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते संगणकविषयक अनेक युक्त्या आणि क्लृप्त्या सांगतात. रोजचे काम करताना त्या अतिशय उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ तुम्हाला ई मेलमधून मोठी फाईल पाठवायची आहे. पण सामान्यपणे ई मेलमधून फाईल पाठविण्याची क्षमता दहा एमबी असते. पण त्यापेक्षा मोठी फाईल पाठवायची तर काय करावे लागेल? शिरवळकरांच्या ब्लॉगवर त्याचे उत्तर आहे.
असा हा माहितीच्या कक्षा रूंदावणारा ब्लॉग. जालावर भटकंती करताना या ब्लॉगवर भेट दिल्यानंतर बाहेर पडताना नक्कीच समृद्ध झाल्याचा अनुभव येतो. त्यामुळे अस्सल नेटकर या ब्लॉगला टाळून पुढे जात नाहीत. मग शिरवळकरांना भेटताय ना?
ब्लॉगचे नाव - संगणक जगत अर्थात Madhav Shirvalkar's info
ब्लॉगर- माधव शिरवळकर, मुंबई
URL - http://sanganaktoday.blogspot.com
WD
WD
ब्लॉग म्हणजे अनुदिनी. ज्याला डायरी असेही म्हणता येईल. अनेकांनी आपल्या विचारांच्या अभिव्यक्तीसाठी ब्लॉग सुरू केले आहेत. मराठीत अल्पावधीच हे ब्लॉगविश्व समृद्ध झाले आहे. या ब्लॉगमध्ये काय काय नाही? साहित्यविषयाला वाहिलेले ब्लॉग जसे आहेत, तसे राजकारण, संगणक, अवकाश, पाककृती, सण समारंभ अशा अनेक विषयांना हे ब्लॉग स्पर्श करतात. यातील अनेक ब्लॉगवर अतिशय वाचनीय लेख असतात.
वेबदुनियाच्या वाचकांनाही या वाचनाचा आनंद मिळावा. यासाठी यातील निवडक वाचनीय ब्लॉगचा परिचय आम्ही दर शुक्रवारी करून देणार आहोत. याची सुरवात उद्यापासून (ता.२८) करणार आहोत. तुमच्याकडे अशा ब्लॉगविषयी माहिती असल्यास वा तुम्ही विशिष्ट विषयाला वाहिलेला ब्लॉग चालवत असाल तर आम्हाला जरूर कळवा.