जॉन अब्राहम आपला आगामी चित्रपट 'दनदना दन गोल' बद्दल अतिशय उत्सूक आहे. या चित्रपटानंतर लोक क्रिकेटशिवाय फुटबॉलला पसंत करतील असे त्याला वाटते. यूकेच्या फुटबॉल संघात भारत, पाकिस्तान व बांगलादेशातील खेळाडूंना आपले स्थान निर्माण करण्यासाठी किती संकटाचा सामना करावा लागतो याचे चित्रण या चित्रपटात दाखविले आहे.
जॉन स्वत: फुटबॉलचा चाहता असून या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. या खेळात खेळांडूवर असणारा दबाव व खूप कमी करिअर याची जाणीव त्याला चित्रपटात काम केल्यानंतर झाली. आपल्या देशात केवळ बॉलिवुड कलाकारालाच स्टार मानले जाते. परंतू एखाद्या खेळाडूलाही स्टारपेक्षा कमी लेखू नये असे त्याला वाटते.
|