मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > आगामी चित्रपट
सुझाव/प्रतिक्रिया मित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
लहान मुलाचे भावविश्वः तारे जमीं पर

चित्रपट-- तारे जमीन पर
निर्माता व दिग्दर्शक-- ‍आमिर खान
कलाकार-- आमिर खान, तनय चढ्ढा, दरशील सफारी, टिस्का चोपडा
गीतकार-- प्रसून जोशी
संगीतकार-- शंकर एहसान रॉय

tare jaminpar
IFMIFM
आमिर खानने दिग्दर्शित केलेल्या 'तारे जमीं पर' या चित्रपटातील गाणी चांगलीच लोकप्रिय होत आहेत. बॉलिवूडमध्ये मुलांवर आधारीत चित्रपट खूप कमी तयार होतात. आमिरने या चित्रपटात मुलांच्या समस्या मांडल्या आहेत. त्यात ईशान अवस्थी नावाच्या मुलाची कथा आहे. आठ वर्षांचा ईशान स्वत:तच रमणारा मुलगा आहे. त्याला मासे, पतंग, कुत्रे या मोठ्यांच्या जगात स्थान नसणार्‍या गोष्टी आवडतात.

tare jami par
IFMIFM
ईशानला होमवर्क करायला बिलकूल आवडत नाही. यामुळे तो वर्गात मागे पडतो. या गोष्टीमुळे त्याचे आई-वडिल नेहमी चिंतेत असतात. ही समस्या ते ईशानला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकून सोडवायला पहातात. ईशान तिथे कडक शिस्तीत सुधारेल, असे त्यांना वाटते. पण असे केल्यानेही ईशानच्या वागण्यात फरक पडत नाही.

tare jami par
IFMIFM
आई-वडिलांपासून दूर गेल्याने तो दु:खी होतो. बोर्डिंग स्कूलमध्ये रामशंकर निकुंभ (‍आमिर खान) कलाशिक्षक म्हणून प्रवेश करतात. त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळी असते. ते मुलांना विचार करणे, स्वप्न बघणे, कल्पना करणे या गोष्टी शिकवतात. ईशान सोडून बाकीच्या विद्याथ्यांना त्यांचे शिकवणे आवडत असते. ईशानकडे लक्ष दिल्यानंतर तो दु:खी असल्याचे रामशंकरच्या लक्षात येते. त्याच्या दु:खाचे कारण जाणून घेण्यासाठी रामशंकर त्याच्या विश्वात प्रवेश करून ईशानला त्याच्या दु:खापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. हा चित्रपट 21 डिसेंबरला चित्रपटगृहात झळकेल.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा....
आणखी
'तारे जमीन पर' ची कथा वेगळी : आमीर खान
हल्लाबोल : सुपरस्टारच्या मनोव्यापाराचे चित्रण
कलेचा वारसा जपण्यासाठीचा संघर्ष : 'आजा नच ले'
दहा कथानकांची गुंफण ‘दस कहानियाँ’
'दन दना दन गोल' मुळे फुटबॉलची लोकप्रियता वाढेल
अजय बनणार ‘अशोका: द ग्रेट’