मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > आगामी चित्रपट
सुझाव/प्रतिक्रिया मित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
तारें जमीं पर- लहानग्यांच्या विश्वाचा धांडोळा

निर्माता-दिग्दर्शक- अमीर खान
गीते- प्रसून जोशी
संगीत- शंकर-एहसान-लॉय
कलावंत- अमीर खान, दर्शील सफारी, तानिया छेडा, सचेत इंजिनियर, टिस्का चोप्रा, विपीन शर्मा

tare
IFMIFM
लहान मुले आणि त्यांचे भावविश्व हा अतिशय संवदेनशील विषय आहे. हिंदी चित्रपटात हा विषय आला नाही असे नाही. पण केवळ मुले डोळ्यासमोर ठेवून केवळ बालचित्रपट तयार केले गेले. मुलांना केंद्रस्थानी ठेवून मोठ्यांच्या नजरेतून त्यांच्याकडे पहायला शिकवणारे चित्रपट मात्र आले नाहीत. अमीर खानने तारे जमीं पर च्या माध्यमातून नेमकी हीच उणीव दूर करायचे ठरवले आहे. अमीर निर्माता या माध्यमातून या चित्रपटाशी निगडीत आहेच, पण तो या चित्रपटाचा दिग्दर्शकही आहे. दिग्दर्शक म्हणून त्याचाही हा पहिलाच चित्रपट. तोही अगदी वेगळ्या आणि अस्पर्शित विषयावर. वास्तविक पहिला चित्रपट बनवितानाही आमिरने व्यावसायिक विचार न करता भावणारा विषय घेऊन त्यालाच प्राधान्य दिले. यातून त्यातील विचारी कलावंत जाणवतो.

या चित्रपटाची कथा अर्थातच एका लहान मुलाभोवती फिरते. त्याचे नाव आहे इशान अवस्थी (दर्शील सफारी) असे त्याचे नाव. आठ वर्षाच्या इशानच्या खांद्यावर आई- वडिलांच्या अपेक्षांचे ओझे इतके आहे की ते त्याला पेलवत नाही. त्यांना वाटते की त्याने गृहपाठ छान करावा. चांगले मार्क मिळवावेत. पहिला नंबर पटकवावा. नेहमी स्वच्छ, टापटीप रहावे. ईशान त्यासाठी प्रयत्नही करतो. पण या सर्व अपेक्षा तो काही पूर्ण करू शकत नाही.

इशानच्या भावविश्व निसर्गाशी जोडलेले आहे. म्हणूनच ते रंगिबिरंगीही आहे. त्याच्या या विश्वात पतंग, रंग आणि झुळझुळते मासे यांना मोठे स्थान आहे. म्हणूनच तो या विश्वात खूपच आनंदी रहात असतो. पण त्याचे हे वेड त्याच्या आई-वडिलांना समजत नाही. त्यांना वाटते ईशान वेळ वाया घालवतोय. त्याला खूप समजावूनही तो ऐकत नाही. शेवटी त्यांच्या अपेक्षाही तो पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे बिघडलेल्या इशानला ताळ्यावर आणण्यासाठी, त्याला शिस्त लावण्यासाठी बोर्डींगमध्ये ठेवण्यात येते.

इशान नव्या शाळेत जातो खरा, पण त्याला आधीच्या शाळेपेक्षा काही वेगळा बदल वाटत नाही. त्याला सतत घरची आठवण येते. आणि एके दिवशी त्याच्या शाळेत एक नवीन कलाशिक्षक येतात. रामशंकर निकुंभ (आमीर खान) हे त्यांचे नाव. हे शिक्षक इतरांपेक्षा वेगळेच असतात. त्यांची शिकवण्याची पद्धतही वेगळी असते. मुलांच्या कल्पना, त्यांची स्वप्न, त्यांचे विचार जाणून घेऊन त्यानुसार ते शिकवत असतात.

सहाजिकच निकुंभ सरांच्या येण्याने वातावरणच बदलते. मुले जाम खुश होतात. आनंदी आनंद गडेचे वातावरण निर्माण होते. पण या वातावरणातही इशान एकटाच असतो. त्याच्या मनातले दुःख त्याला या आनंदाचा आस्वादच घेऊ देत नाही. ही बाब निकुंभ सरांच्या लक्षात येते. ते त्याचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यातील संवेदनशीलता त्यांना भावते. ते त्याच्यासोबत रहातात आणि इशानला समजून घेतात. त्यांच्या साथीने इशान स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो आणि तो त्यात यशस्वी ठरतो.

पात्र परिचय

ishan
IFMIFM
इशान नंदकिशोर अवस्थी- माझे ना इशान आहे. मी आठ वर्षांचा आहे. मला कुत्रा, मसाले, चमकत्या वस्तू, रंग आणि पतंग फार आवडतात. मी अतिशय बिनधास्त मुलगा आहे. चित्र काढायला मला आवडते. बोर्डिंग स्कूलमध्ये जाणे मला आवडत नाही. मी नक्की सांगतो, खरोखरच मी चांगला अभ्यास करेन.

nandkishor
IFMIFM
नंदकिशोर अवस्थी- हे माझे वडिल आहेत. ते रोज ऑफिसात जातात. खूप कष्ट करतात. कधी कधी माझ्यासाठी गिफ्टही आणतात. पण माझ्या शिक्षकांकडे ते माझ्याविषयी तक्रार करतात तेव्हा वाईट वाटते. त्यांना वाटते की मला बोर्डिंगमध्ये घातल्याने शिस्त येईल.

maya
IFMIFM
माया अवस्थी- माझी आई. माझ्यावर तिचे खूप प्रेम आहे. मलाही ती खूप आवडते. माझ्यासाठी ती प्रेमाने कितीतरी पदार्थ बनवते. मला दुखलं खुपलं तर तिच्या डोळ्यात पाणी येतं. मला बोर्डिंगमध्ये ठेवण्याचा निर्णय खरं तर तिला रूचलेला नाही. पण माझ्या भावी आयुष्यासाठी कदाचित तो योग्य असेल म्हणून तिने त्याला होकार दिला आहे.

aamir
IFMIFM
योहान अवस्थी- हा माझा भाऊ. त्याला मी दादा म्हणतो. तो खूप हुशार आहे. त्याला खूप बक्षिसंही मिळाली आहेत. मला त्याचा खूप अभिमान वाटतो. तो माझ्याकडे खूप काळजीपूर्वक लक्ष देतो. मला तो फार आवडतो.

माझे शिक्षक- माझ्याशी चांगलं वागायचं नाही हे यांनी ठरवून घेतलं आहे. माझ्या कुठल्याही वहीत यांच्या लाल शाईचे इशारे दिसतात.

रामशंकर निकुंभ- निकुंभ सर खूप छान आहेत. ते इतर शिक्षकांसारखे ओरडत बसत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर कायम हास्य असते. त्यांनाही माझ्यासारखे रंग, मासे, आणि चित्र हे विषय आवडतात. त्यांनी मला खूप काही गोष्टी सांगितल्या. मला त्या फार आवडल्या. मला मोठं झाल्यावर त्यांच्यासारखं बनायचं आहे.

राजन दामोदरन- राजन माझा सगळ्यात चांगला दोस्त आहे. तो अतिशय बुद्धिमान आहे. शिक्षकांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्याला येतात. तो नेहमीच मला मदत करतो.

लहान मुलाचे भावविश्वः तारे जमीं पर
'तारे जमीन पर' ची कथा वेगळी : आमीर खान
आणखी
लहान मुलाचे भावविश्वः तारे जमीं पर
'तारे जमीन पर' ची कथा वेगळी : आमीर खान
हल्लाबोल : सुपरस्टारच्या मनोव्यापाराचे चित्रण
कलेचा वारसा जपण्यासाठीचा संघर्ष : 'आजा नच ले'
दहा कथानकांची गुंफण ‘दस कहानियाँ’
'दन दना दन गोल' मुळे फुटबॉलची लोकप्रियता वाढेल