मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > आगामी चित्रपट
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
शोबिझ- पत्रकारितेची काळी बाजू

निर्माता- मुकेश भट
दिग्दर्शक- राजू खान
संगीत- ललीत पंडि
कलाकार- तुषार जलोटा, मृणालिनी शर्मा, गुलशन ग्रोव्हर

महेश भट कंपातला नवा चित्रपट शोबिझ येतो आहे, पण त्याची फारशी प्रसिद्धी केली जात नाहीये. महेश भट यांच्या मते, सांवरीयाचा दणकून प्रचार करूनही तितक्याच दणकून तो आपटला. याचा अर्थ खूप प्रसिद्धी करूनही चित्रपट चालतोच असे नाही.

shobiz
IFMIFM
शोबिझचा विषय आजची पीत पत्रकारिता आणि चित्रपटसृष्टीतील अंतर्गत संबंध असा आहे. काही पत्रकार व फोटोग्राफर दिवसभर सेलिब्रेटीजभोवती रूंजी घालत असतात. एखादी चटपटीत, चुरचुरीत बातमी वा फोटो मिळावा यासाठी ते धडपडत असतात. म्हणूनच पेज थ्री पार्ट्यांचे चित्र मीडीयातून मोठ्या प्रमाणात येते. त्यांनी टिपलेला एखादा फोटो किंवा बातमी एखाद्याची करीयर बनवू शकतो, किंवा उध्वस्तही करू शकतो.

रोहन (तुषार जलोटा) उगवता सुपरस्टार आहे. त्याची एक सुंदर प्रेयसीही आहे. आपल्या आयुष्यावर तो समाधानी आहे. त्याला लोकप्रियतेचा स्पर्श होतो, आणि रोहन मीडीयाच्या प्रकाशात वारंवार येऊ लागतो. मीडीयाची मंडळी कायम त्याच्या मागे लागलेली असतात. त्यांच्या सततच्या मागे असण्याने रोहन वैतागतो. त्यांच्याशी त्याचे भांडणही होते. पण तीच त्याची मोठी चुक ठरते. ते रोहनसंदर्भातील प्रत्येक बातमी मसाला लावून छापतात.

rohan
PRPR
रोहनला तारा नावाच्या एका वेश्येचा शोध घ्यायचा असतो. एक दिवस तारा त्याला भेटते. मीडीया येथेही त्याचा पाठलाग करतो. मीडीयापासून दूर जाण्यासाठी रोहन व तारा पळून जातात. पण त्यांच्या कारला अपघात होतो आणि तारा कोमात जाते. पण बातमी प्रसिद्ध अशी होते, की रोहनचे तारा नावाच्या वेश्येशी संबंध आहेत.

पण खरे काय आहे? रोहनचे ताराशी नेमके नाते काय आहे? रोहन मीडीयावाल्यांना धडा शिकवतो का? रोहनची बाजू मान्य होते का? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी शोबिझ बघणे भाग आहे.
आणखी
वेलकम- एका लग्नाची गोष्ट!
दोन अनोळखींची कथा : स्ट्रेंजर्स
तारें जमीं पर- लहानग्यांच्या विश्वाचा धांडोळा
लहान मुलाचे भावविश्वः तारे जमीं पर
'तारे जमीन पर' ची कथा वेगळी : आमीर खान
हल्लाबोल : सुपरस्टारच्या मनोव्यापाराचे चित्रण