निर्माता : शक्ती सामंता दिग्दर्शक : आसीम सामंत संगीतकार : अन्नू मलिक कलाकार : मिथून चक्रवर्ती, हृषिता भट, रोहित रॉय, शक्ती कपूर
डॉन मुथूस्वामी (मिथून चक्रवर्ती) मुंबईचा डॉन आहे. सर्वजण त्याला घाबरतात. मुथूचे वडिल आजारी असतात. त्या आजारातून वाचण्याची शक्यता नसल्याचे त्याला कळते. तो वडिलांना भेटायला जातो. पण मुथू वडिलांना नमस्कार करण्यासाठी वाकतो, त्याचवेळी त्याचे वडिल त्याला जोरात थप्पड मारतात. मुथूला सुरूवातीला काहीच लक्षात येत नाही. त्याचे वडील त्याला सांगतात की त्याच्या वागण्याने त्यांच्या कुटुंबाला अपमानास्पद पद्धतीने जगावे लागत आहे. यामुळे ते दु:खी मनाने या जगाचा निरोप घेत आहेत.
मुथू त्याच्या वडिलांना शेवटच्या क्षणी आनंदात बघू इच्छितो. तो कशाने आनंदीत होतील असे तो त्यांना विचारतो? वाईट मार्ग सोडला तर मला आनंद होईल, असे त्याचे वडिल सांगतात. मुथू त्यांना हा मार्ग सोडण्याचे वचन देतो. मु्थू आता यापुढे चांगले काम करायचे असे त्याच्या माणसांना सांगतो. त्याला डॉन मुथूऐवजी सर मुथू बनायचे असते. आपली भाषा सुधारण्यासाठी तो जयकिशनकड़ून (मोहित रैना) हिंदी व उर्दू शिकतो.
पण, डॉनगिरी सोडून चांगली व्यक्ती बनणे हे सोपे नसते. पोलिस व विरोधी टोळी त्याच्या इराद्यांना मोडता घालण्याचे काम करतात. या सोबतच त्याला मुलगी संजनाच्या (हृषिता भट) लग्नाची काळजी वाटत असते.
त्याचा जीवलग मित्र वर्धन याचा मुलगा प्रधानशी संजनाचे लग्न करण्याची त्याची इच्छा असते. पण, प्रधान संजनाला आवडत नाही. यामुळे हे लग्न टाळण्यासाठी ती आई बनणार असल्याचे सांगते. मुथूचा मॅनेजर प्रीतम (रोहित रॉय) संजनावर प्रेम करतो व तिच्यासोबत लग्नाचे स्वप्न बघत असतो. प्रीतम नेहमी मुथूच्या हिशोबातून अफरातफरी करून पैसे वेगळे काढत असतो. त्याचवेळी मुथूचा शिक्षक जयकिशन व संजना एकमेकांवर प्रेम करू लागतात. अशा या कथानकात पुढे काय घडेल? मुथू चांगला व्यक्ती बनेल काय ? प्रीतमची चोरी मुथू पकडतो का? संजना खरंच गर्भवती असते का? तिच्या होणार्या मुलाचे वडील कोण? या सार्या प्रश्नांचे उत्तरे मिळतील 'डॉन मुथूस्वामी' मध्ये.
|