मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > आगामी चित्रपट
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अभिनेता अजय देवगण बनला दिग्दर्शक
- दीपक जाधव

you
PRPR
सध्या अनेक अभिनेत्यांना दिग्दर्शक व्हावेसे वाटू लागले आहे. नाना पाटेकर, सतीष कौशिक, टिनू आनंद, आमीर खान या नामावळीत आता अजय देवगण हे नाव सामील होते आहे. नुकताच आमीर खानने दिग्दर्शित केलेला ‘तारे जमीं पर' हा चित्रपट प्रदर्शित होऊन लोकमान्यता मिळवतोय. राजकुमार संतोषींच्या ‘हल्ला बोल' या चित्रपटामुळे चर्चेत असलेला अजय देवगण आता इरॉस इंटरनॅशनल प्रस्तुत ‘यू मी और हम' या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात उतरतोय. या चित्रपटाची निर्मितीही त्यानेच केली आहे. निर्माता आणि वितरक म्हणून याअगोदर अजय देवगण ‘राजू चाचा' या चित्रपटाद्वारे आपल्यासमोर आला आहे.

‘यू मी और हम' या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे यात काजोल नायिकेच्या भूमिकेत दिसणार असून तिचा नायक स्वतः अजय देवगण असेल. अनेक वर्षांनंतर काजोल - अजय देवगण ही जोडी या चित्रपटात दिसणार असून दिव्या दत्ता, सुमीत राघवन, करण खन्ना आणि इशा द्योरवानी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन रॉबीन भट्ट, शंतनू गुप्ता व आकाष खुराणा यांनी केले असून संवाद अश्विनी धीर यांचे आहेत. गीते मुन्ना धिमान यांची असून संगीत विशाल भारद्वाज यांनी दिले आहे. हा चित्रपट नुकताच पूर्ण झाला असून एप्रिलच्या ११ तारखेला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
आणखी
राजकुमार संतोषी यांचा 'हल्ला बोल'
डॉन मुथूस्वामी : डॉनचा सज्जन बनण्याचा प्रवास
2008 मधील प्रमुख चित्रपट
शोबिझ- पत्रकारितेची काळी बाजू
वेलकम- एका लग्नाची गोष्ट!
दोन अनोळखींची कथा : स्ट्रेंजर्स