मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > आगामी चित्रपट
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
'बॉम्बे टू बँकॉक'

निर्माता : मुक्ता सर्चलाइट फिल्म्स
दिग्दर्शक : नागेश कुकुनर
संगीत : सलीम सुलेमान, रोनी शिरीष, सुखविंदर सिंग, प्रीतम चक्रवर्ती
कलाकार : श्रेयस तळपदे, लेना, विक्रम इनामदार, यतिन कार्येकर, नसीरूद्दीन शहा

bombay to goa
PRPR
'डोर' आणि 'इकबाल' सारखी चित्रपट बनविणारा नागेश कुकुनर 'बॉम्बे टू बँकॉक' चित्रपट घेऊन येत आहे. गंभीर चित्रपट बनविणार्‍या नागेशने यावेळी विनोदी कथा निवडली आहे. या चित्रपटातून थायलंडची अभिनेत्री लेना बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. तिने टीव्ही व एका अल्बममध्ये काम केले आहे.

शंकर नावाच्या एका स्वयंपाक्याची कथा आहे. मुंबईत राहणार्‍या शंकरला पैशांची अत्यंत आवश्यकता असते. बराच प्रयत्न करूनही पैसे मिळत नाही तेव्हा तो एका डॉनचे पैसे चोरतो. त्यानंतर डॉनची माणसे त्याच्यामागे लागतात. त्यांच्यापासून स्वतः:ला वाचविताना तो मदत कार्यासाठी थायलंडला जाणार्‍या डॉक्टरांच्या पथकात सामील होतो. तिथे पोहोचल्यावर त्याची पैशांनी भरलेली बॅग हरवते.

bombay to goa
PRPR
बँकॉकमध्ये पैसे शोधताना त्याची जस्मिनशी ओळख होते. जस्मिनला पाहिल्याबरोबर तो तिच्याकडे आकर्षित होतो. जस्मिन थाई भाषा बोलते. शंकरला तिची भाषा अजिबात समजत नाही. दोघांना विचारांचे आदान-प्रदान करणे अशक्य होते. शंकर पैशांच्या शोधा‍त मित्र रचविंदर आणि जस्मिनलाही सामील करून घेतो. या दरम्यान डॉनचा मुलगा जॅम शंकर व पैसे यांच्या शोधात बँकॉकला येतो. त्यामुळे शंकरच्या समस्या अजून वाढतात.

यातून मजेदार किस्से घडत जातात. त्यातून हास्याची कारंजी उत्पन्न होतात. शंकर, डॉन आणि त्याचा मुलगा यांच्यातून आपली सुटका करून घेईल? जस्मिनचे प्रेम मिळविण्यात यशस्वी होईल? पैशांचा शोध लागेल? या प्रश्नांच्या उत्तरासाठी 'बॉम्बे टू बँकॉक' हा चित्रपट पाहायला हवा.
आणखी
अभिनेता अजय देवगण बनला दिग्दर्शक
राजकुमार संतोषी यांचा 'हल्ला बोल'
डॉन मुथूस्वामी : डॉनचा सज्जन बनण्याचा प्रवास
2008 मधील प्रमुख चित्रपट
शोबिझ- पत्रकारितेची काळी बाजू
वेलकम- एका लग्नाची गोष्ट!