मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > आगामी चित्रपट
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
'सुपरस्टार' चा रहस्यमय प्रवास


निर्माता :श्री अष्टविनायक सिने व्हिजन लिमिटेड
दिग्दर्शक : रोहित जुगराज
संगीत : शमीर टंडन
कलाकार : कुणाल खेमू, ट्युलिप जोशी, औशिमा साहनी, रिमा, शरद सक्सेना, दर्शन जरीवाला, अमन वर्मा.

super star
PRPR
सध्या बॉलीवूडवर आधारीत चित्रपट बरेच येत आहेत. 'ओम शांती ओम', 'खोया खोया चांद', 'शोबिज', 'हल्ला बोल' या चित्रपटांनंतर 'सुपरस्टार'ही या यादीत येतो आहे.

'सुपरस्टार' या चित्रपटातून ऍक्शन आणि ड्रामाच्या माध्यमातून चित्रपट उद्योगातील कारभार लोकांसमोर मांडला आहे. कुणाल खेमूने या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारली आहे.

कुणाल (कुणाल) आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करतो. स्वप्न सत्यात उतरण्यावर त्याचा पूर्ण विश्वास आहे. बॉलीवूडमध्ये स्टार होणे हे त्याचे स्वप्न आहे. त्यासाठी स्ट्रगलर म्हणून तो सुरवात करतो. स्ट्रगलर ही ओळख पुसण्यासाठी तो प्रयत्न करतो.
या प्रवासात कुणालला मौसम भेटते तो तिच्यावर जीवापाड प्रेम करतो.

पण नियती वेगळाच डाव खेळते. करोडपती तरुण करण (कुणाल खेमू) अचानक बॅलिवूडमध्ये प्रवेश करतो आणि लोकप्रियही होतो. करणच्या येण्याने कुणालचा स्वप्नभंग होते. कारण करण हुबेहूब कुणालसारखाच दिसतो.

super star
PRPR
कुणालला नाइलाजाने करणचा डुप्लिकेट म्हणून काम करावे लागते. यातूनच दोघांमध्ये स्पर्धा सुरू होते. अचानक स्ट्रगलर कुणालचे नशीब पालटते आणि तो सुपरस्टार बनतो. सगळीकडे त्याच्या नावाची चर्चा सुरू होते. पण या दरम्यान मौसम त्याच्यापासून दुरावते. काही कालावधीनंतर पत्रकार बनलेली मौसम तिचा मित्र प्रशांतच्या सहाय्याने कुणालचे सुपरस्टार बनण्याचे गुपित लोकांसमोर आणू बघतेय. हे कुणालला समजते. आता त्याच्यासमोर एकच मार्ग आहे, सत्य स्वीकारणे किंवा ते समोर येऊ नये म्हणून दुसरा डाव खेळणे.

कुणाल सत्य स्वीकारेल की नाही? काय आहे सत्य? कुणाल सुपरस्टार कसा बनला? या प्रश्नांच्या उत्तरासाठी 'सुपरस्टार' पाहणे गरजेचे आहे.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा...
आणखी
'संडे' इतर चित्रपटांपेक्षा वेगळा- रोहित शेट्टी
'बॉम्बे टू बँकॉक'
अभिनेता अजय देवगण बनला दिग्दर्शक
राजकुमार संतोषी यांचा 'हल्ला बोल'
डॉन मुथूस्वामी : डॉनचा सज्जन बनण्याचा प्रवास
2008 मधील प्रमुख चित्रपट