मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > आगामी चित्रपट
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
राकेश रोशनचा ह्रतिकविना ‘क्रेझी ४’
PR
‘कहो ना प्यार है', ‘कोई मिल गया' व `क्रिश' या सुपरहिट चित्रपटानंतर निर्माता राकेश रोशन यांचा ‘क्रेझी ४' हा चित्रपट येतोय. प्रत्येक चित्रपटात आपला मुलगा ह्रतिक रोशन नायक म्हणून लकी ठरलेल्या राकेश रोशनच्या या चित्रपटात मात्र ह्रतिक पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे ह्रतिकविना हा चित्रपट राकेश रोशनला कितपत ‘लकी’ ठरतोय याबाबत प्रश्न आहे. ‘क' हे अक्षर लकी ठरल्यामुळे राकेश रोशनने या चित्रपटाचे नाव ‘क्रेझी ४' ठेवले आहे.
‘क्रेझी ४' ही कथा चार वेडयांची आहे. या चारही जणांना वेगवेगळया वेडानं झपाटलेले आहे. या चार वेडयांच्या भूमिकेत अर्शद वारसी, इरफान खान, राजपाल यादव व सुरेश मेनन हे आहेत. तसेच जूही चावला व दिया मिर्झा या दोन नायिका आहेत. फिल्मक्राफ्ट प्रॉडक्शन इंडिया प्रा. लि. च्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची खासियत म्हणजे या त्याचे दिग्दर्शन जयदीप सेन करत आहेत. जयदीप सेनने याआधी ‘कोई मिल गया' व ‘क्रिष' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या कामावर खूष होऊन राकेश रोशननी त्यांना हा चित्रपट दिग्दर्शित करण्याची संधी दिली. विशेष म्हणजे या चित्रपटातील सर्वच कलाकार राकेश रोशनच्या चित्रपटात प्रथमच काम करीत असून यात शाहरूख खानचे आयटम सॉंग असणार आहे. या चित्रपटाचे संगीत राजेश रोशन यांचेच असून गीते जावेद अख्तर यांनी लिहिली आहेत, तर पटकथा व संवाद अश्विनी धीर यांचे आहेत. पाहूया हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत क्रेझ निर्माण करतो ते.
आणखी
जोधा अकबर - सोळाव्या शतकातील प्रेमकथा
'सुपरस्टार' चा रहस्यमय प्रवास
'संडे' इतर चित्रपटांपेक्षा वेगळा- रोहित शेट्टी
'बॉम्बे टू बँकॉक'
अभिनेता अजय देवगण बनला दिग्दर्शक
राजकुमार संतोषी यांचा 'हल्ला बोल'