मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > आगामी चित्रपट
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
शेखर सुमनचा 'वन फाईन मंडे'
IFM
निर्माता :जस्मिन सरूपिय
दिग्दर्शक :मनू चौबे
संगीत :सिद्धार्थ श्रीवास्तव
कलाकार :शेखर सुमन, तनाज करीम, गौरी कर्णिक, राज जुत्शी, राजेश विवेक.

'वन फाईन मंडे' या चित्रपटातून शेखर सुमन पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर नायकाच्या रूपात दिसणार आहे. या चित्रपटाची कथा श्यामराव सावंत (शेखर सुमन) नावाच्या व्यक्तीभोवती फिरत राहते.

श्यामराव शहरातील एक कुप्रसिध्द गुंड आहे. त्याच्या नावाने लोकांचा थरकाप होतो. श्यामरावाचे वडील आजारी असतात आणि शेवटच्या घटकेची वाट पाहत असतात. सर्व वाईट कामे सोडून चांगला व्यक्ती बनून जीवन जगण्याचे वचन श्यामराव वडिलांना देतो.

IFM
चांगला व्यक्ती बनण्यासाठी श्यामराव सोमवारची निवड करतो. सोमवार उजाडल्यापासून संपेस्तोवर त्याला वेगवेगळी माणसे भेटतात. यात त्याची गर्भवती असल्याचे भासविणारी बहीण (गौरी कर्णिक), गुंड प्रवृत्तीचा अकाउंटंट (राज जुत्शी), सतत आदळआपट करणारी पत्नी आणि एक बहीण (तृप्ती पराशर) यांचा समावेश असतो.

यांना भेटल्यावर चांगली व्यक्ती बनून जगणे आपण समजतो तितके सोपे नाही हे त्याच्या लक्षात येते. ही कथा विनोदाची झालर देऊन सादर केली आहे.

IFM
दिग्दर्शकाबद्दल थोडे:
मनू चौबे यांनी बालाजी टेलिफिल्मस निर्मित अनेक मालिकांचे लेखन केले आहे. चित्रपट जग हे टिव्हीपेक्षा मोठे असल्याने ते इकडे वळले. आठवड्यातील प्रत्येक दिवसावर आधारीत चित्रपट बनविणे त्यांचे ध्येय आहे. सोमवारपासून त्यांनी सुरुवात केलीच आहे. आता मंगळवार, बुधवार करत ते रविवारपर्यंत जाऊ इच्छितात. 'वन फाईन मंडे' ची मांडणी विनोदी स्वरूपाची आहे. आपल्या पुढील चित्रपटात ऍक्शन, रोमांस, रहस्य हे सारे असेल, असे ते सांगतात.
आणखी
राकेश रोशनचा ह्रतिकविना ‘क्रेझी ४’
जोधा अकबर - सोळाव्या शतकातील प्रेमकथा
'सुपरस्टार' चा रहस्यमय प्रवास
'संडे' इतर चित्रपटांपेक्षा वेगळा- रोहित शेट्टी
'बॉम्बे टू बँकॉक'
अभिनेता अजय देवगण बनला दिग्दर्शक