मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > आगामी चित्रपट
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
यू, मी और हम :पिया आणि अजयची प्रेमकथा
PR
निर्माता : देवगण फिल्म्स
दिग्दर्शक : अजय देवगण
गीतकार : मुन्ना धीमान
संगीतकार : विशाल भारद्वाज
कलाकार : अजय देवगण, काजोल, दिव्या दत्ता, सुमीत राघवन, ईशा श्रावणी, करण खन्ना

अजय देवगण आणि काजोल यांनी आतापर्यंत हलचल(1995), गुंडाराज(1995), इश्क(1997), प्यार तो होना ही था (1998), दिल क्या करे(1999) आणि राजू चाचा(2000) या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. एकत्र भूमिका केलेला त्यांचा सातवा चित्रपट 'यू, मी और हम' 11 एप्रिलला प्रदर्शित होत आहे.

गेल्या आठ वर्षांमध्ये काजोलचा नायिकेच्या रूपात फना हा एकमेव चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पण आजही तिची लोकप्रियता कमी झालेली नाही हे विशेष. काजोलचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

PR
अजय देवगणचे दिग्दर्शन चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. अजयचा दिग्दर्शकाच्या रूपात हा पहिलाच चित्रपट असून त्याच्या दिग्दर्शनाविषयी उत्सुकता आहे. आमिर खानने दिग्दर्शकाच्या रूपात बाजी मारलीच आहे, आता अजयचा नंबर आहे.

'यू, मी और हम' ची कथा साधीच आहे. पियाला (काजोल) पाहताक्षणीत अजय (अजय देवगण) तिच्या प्रेमात पडतो. पिया अजयला ड्रिंक देते त्यावेळी तो तिला पहिल्यांदाच बघतो. मात्र दारूपेक्षाही अजयला पियाचीच नशा चढते.

तो मानसोपचार तज्ज्ञ असतो. पियाला प्रभावित करण्यासाठी तो बरेच प्रयत्न करतो. पण पियाला प्रभावित करणे इतके सोपे नसते. अजय तिला आवडतो मात्र तिला निर्णय घेण्यासाठी काही वेळ हवा असतो. नंतर दोघेही प्रेमाच्या बंधनात बांधले जातात.

समुद्रकिनारी दोघांमधील प्रेमाला सुरूवात होते. पण मध्ये असे काही घडते की त्यांच्या प्रेमालाच आव्हान निर्माण होते. मग दोघेही त्यातून मार्ग काढतात आणि अखेर सच्चे प्रेमच विजयी ठरते, अशी ही प्रेमकथा आहे.
व्हिडिओ पाहा
आणखी
शेखर सुमनचा 'वन फाईन मंडे'
राकेश रोशनचा ह्रतिकविना ‘क्रेझी ४’
जोधा अकबर - सोळाव्या शतकातील प्रेमकथा
'सुपरस्टार' चा रहस्यमय प्रवास
'संडे' इतर चित्रपटांपेक्षा वेगळा- रोहित शेट्टी
'बॉम्बे टू बँकॉक'