मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > आगामी चित्रपट
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
क्रेझी 4 : मुर्खांची दुनिया?

निर्माता : राकेश रोशन
crazy
PR
दिग्दर्शक : जयदीप सेन
संगीत : राजेश रोशन
कलाकार : अरशद वारसी, इरफान खान, राजपाल यादव, सुरेश मेनन, जूही चावला, दिया मिर्जा, रजत कपूर, झाकिर
हुसेन

जग हा वेड्यांचा पसारा असे कुणीतरी म्हटले आहेच. कोणी पैशांसाठी तर कोणी प्रेमासाठी, कोणी कामासाठी तर काहीही काम नको म्हणून वेडे होतात.

'क्रेझी 4' याचे कथानक चार पात्रांच्या अवतीभोवतीच फिरते. राजा, डॉ. मुखर्जी, गंगाधर आणि डब्बू यांना जग 'क्रेझी' म्हणते कारण हे सर्वजण सामान्य माणसांपासून काहीसे वेगळे असतात. त्यांच्या विचित्र वागण्यामुळेच त्यांना 'क्रेझी 4' हे नाव दिले आहे.

त्या चारही जणांवर डॉ. सोनाली उपचार करीत असते. काही काळांनंतर या सर्वांमध्ये सुधारणा होईल, अशी खात्री असते. पण तिच्या उपचाराचा योग्य परिणाम होतो का? जग त्यांना स्वीकारते का? त्यांना 'क्रेझी 4' म्हणणे योग्य आहे का? हे जाणण्यासाठी 'क्रेझी 4 पाहावा लागेल.

arshad varsi
PR
पात्र परिचय :
राजा (अरशद वारसी) : राजा शीघ्रकोपी आहे. तो नेहमी मारामारी करण्याच्या तयारीतच असतो. त्याला थोडेही छेडले तरीही तो संतापतो. टी.व्ही. रिपोर्टर शिखाचे राजावर अतोनात प्रेम असते.

irfan
PR
इरफान खान (डॉ. मुखर्जी) : मुखर्जी साहेबांना वाटते की ते 'क्रेझी 4' टीमचे कॅप्टन आहेत. स्वच्छतेचे पुजारी असणार्‍या डॉ. मुखर्जींना प्रत्येक काम व्यवस्थितरीत्या करायला आवडते. त्यांनी स्वत:चे संतुलन गमावले आहे.

rajpal yadav
PR
राजपाल यादव (गंगाधर) :
हे महाशय पूर्वीच जिंकलेली स्वतंत्रतेची लढाई अद्यापही लढत आहेत. भूतकाळातच जगणारे गंगाधर अजूनही स्वातंत्र्याच्या लढाईत भाग घेत आहेत. गांधी, नेहरू, टिळक आणि पटेल यांच्याशी ते चर्चा करीत असतात.

suresh menan
PR
सुरेश मेनन (डब्बू) :
डब्बू फारच प्रेमळ आणि सगळ्यांचा लाडका आहे. सर्वगण त्याची काळजी घेत असतात. डब्बू बर्‍याच वर्षांपासून एकही शब्द बोलला नाही. का? याचे कारण कोणालाच माहिती नसते.

दिग्दर्शनाबद्दल थोडे :
चित्रपटाचे दिग्दर्शन जयदीप सेन यांनी केले आहे. जयदीप यांना बालपणापासूनच चित्रपटांचे आकर्षण होते. हैरी बावेजा यांच्या सहाय्यकाच्या रूपात करिअरला सुरुवात करणार्‍या जयदीप यांनी राजकंवर यांचे सहा चित्रपट तसेच सनी देओलच्या 'दिल्लगी' या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले आहे.

'कोई मिल गया' आणि 'कृष' या चित्रपटात त्यांनी राकेश रोशनला सहकार्य केले होते. त्यांच्यातील प्रतिभा आणि कामाप्रती समर्पण पाहून राकेश प्रभावित झाले होऊन 'क्रेझी 4' मध्ये जयदीपला स्वतंत्र दिग्दर्शनाचा भार सोपविला.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा....
व्हिडिओ पाहा
आणखी
यू, मी और हम :पिया आणि अजयची प्रेमकथा  
शेखर सुमनचा 'वन फाईन मंडे'
राकेश रोशनचा ह्रतिकविना ‘क्रेझी ४’
जोधा अकबर - सोळाव्या शतकातील प्रेमकथा
'सुपरस्टार' चा रहस्यमय प्रवास
'संडे' इतर चित्रपटांपेक्षा वेगळा- रोहित शेट्टी