मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > आगामी चित्रपट
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मार्चमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट
मार्चमध्ये उन्हाळ्यासोबतच परीक्षाही सुरू होतात. सर्व विद्यार्थी अभ्यासात व्यस्त असल्यामुळे क्वचितच चित्रपटगृहाकडे वळतात. मुलांच्या परीक्षेमुळे आई-वडीलही फारसे चित्रपट पाहण्यास जात नाहीत.

चित्रपट बघणार्‍यांमध्ये विद्यार्थी संख्या मोठी असते. त्यामुळे निर्मातेदेखील आपला चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित करण्यास धजत नाहीत. या मार्चमध्येही बघण्यालायक फारच कमी चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

IFM
सात मार्चला सुभाष घईंचा 'ब्लॅक एंड व्हाईट' प्रदर्शित होणार आहे. काही वर्षापूर्वी घईंचा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही महिन्यांआधीच चित्रपटाचे नाव, त्यासंबंधीत काही गोष्टी प्रेक्षकांच्या तोंडी असायचे. पण घईंनी फ्लॉप चित्रपटांची मालिका देऊन आधीची सगळी कीर्ती घालवली. त्यामुळे या चित्रपटाबद्दल लोकांना फारशी माहितीच नाही.

या चित्रपटात अनुराग सिन्हा नावाचा नवीन अभिनेता आहे. सध्या घई त्याचे खूपच कौतुक करत आहेत. अनिल कपूर देखील चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट दहशतवादावर आधारीत आहे.

या चित्रपटाव्यतिरिक्त कहानी गुडीया की, इशारा : ए डेंजर्स मिशन, हैसियत की जंग (डब), आज का चॅलेंज (डब), द ग्रेट गॅम्बलर (डब) आणि 10000 बी. सी. (डब) सारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

चौदा मार्चला 'भ्रम' आणि 'रानी एनाकोंडा' हे यासारखे कमी बजेटचे चित्रपट प्रदर्शित होतील.

IFM
एकवीस मार्चला 'रेस' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास-मस्तान यांनी केले आहे. बिपाशा बसू, समीरा रेड्डी आणि कैतरीना कैफसारख्या हॉट नायिकांसमवेत सैफ अली खान, अक्षय खन्ना, अनिल कपूर हे कलाकार दिसतील.

या चित्रपटाविषयी तरुणांमध्ये उत्सुकता आहे. लोकेशन, हॉट सीन आणि थ्रिल ही या चित्रपटाची वैशिष्ट्ये आहे. या चित्रपटाला चांगली 'ओपनिंग' मिळेल अशी अपेक्षा केली जात आहे.

PR
त्याचदिवशी 'वन, टू थ्री' हा विनोदी चित्रपट प्रदर्शित होत आहे. तुषार कपूर, सुनील शेट्टी, परेश रावल, ईशा देओल, समीरा रेड्डी आणि तनीषा हे कलाकार आहेत. या चित्रपटात एकसारखीच नावे असल्यावर काय धमाल उडते ते दाखविण्यात आले आहे.

आधी हा चित्रपट 28 मार्चला प्रदर्शित होणार होता. मात्र चित्रपट निर्मात्याने चित्रपट एका आठवड्यानंतर प्रदर्शित करण्याचा निश्चय केला. आता या चित्रपटाचा सामना 'रेस' शी होणार आहे.

अठ्ठावीस मार्चला 'जिंदगी तेरे नाम', 'डी-वार' (डब) आणि 'टेरर इन डीप' (डब) चित्रपट प्रदर्शित होतील.
आणखी
क्रेझी 4 : मुर्खांची दुनिया?
यू, मी और हम :पिया आणि अजयची प्रेमकथा
शेखर सुमनचा 'वन फाईन मंडे'
राकेश रोशनचा ह्रतिकविना ‘क्रेझी ४’
जोधा अकबर - सोळाव्या शतकातील प्रेमकथा
'सुपरस्टार' चा रहस्यमय प्रवास