दिग्दर्शक : समर खान संगीत : अदनान सामी कलाकार : राहुल बोस, मिनिषा लांबा, के. के. मेनन, दीपक डोब्रियाल, जावेद जाफरी, सीमा बिस्वास, रोजा केटेलानो, अमृता राव (विशेष भूमिकेत)
'शौर्य' ची कथा आहे जावेद खान याची. जावेदवर देशाविरुद्ध बंड केल्याचा आणि आपल्या सोबत्याची हत्या केल्याचा आरोप आहे. पण जावेद त्याबद्दल काहीही सांगण्यास तयार होत नाही.
कोर्ट मार्शलमध्येही तो काही सांगत नाही. स्वत:चा बचावच तो करत नाही. कारण काही गुपिते त्याच्या मनातच असतात. काही बोललो तर देशहिताविरूद्ध होईल, म्हणून तो काहीही बोलणे टाळतो.
जावेदने धारण केलेल्या मौनामुळे बाकीचे मात्र चक्रावतात. त्याच्या मनात दडलेल्या गुपितांचा शोध घेण्याची जबाबदारी सिद्धांत आणि आकाश यांच्यावर सोपविली जाते. पेशाने वकिल असलेल्या या जोडीचा जीवनाबद्दलचा दृष्टिकोन वेगळा आहे. जावेदच्या प्रकरणामुळे दोघांचेही संपूर्ण जीवनच बदलते.
काव्या आणि ब्रिगेडियर ही पात्रेही लक्षवेधक आहेत. खरे बोलणे कठीण का असते हेच मुळी काव्याला समजत नाही. ब्रिगेडियर प्रताप मात्र माणुसकीच्या विरोधात जावे लागले तरी नियमांवर चालणारी व्यक्ती आहे.
जावेदच्या मौनामागील गुपित काय असते? त्या रात्री असे काय घडले, की त्याला आपल्या सोबत्याची हत्या करावी लागली? गुपित उघड झाल्यावर काय घडेल? हे जाणण्याकरिता 'शौर्य' पहावा लागेल.
|