मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > आगामी चित्रपट
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
स्त्रीच्या हतबलतेची कहाणी 'गुडीया'

निर्माता : लेमन एन यलो प्रोडक्शन
दिग्दर्शक : प्रभाकर शुक्ला
संगीत : विवेक प्रकाश
कलाकार : दिव्या दत्ता, आरिफ ज़कारिया, सीमा बिश्वास, अखिलेंद्र मिश्रा.

gudia
IFM
‘कहानी गुडि़या की’ या चित्रपटाचे कथानक प्रमुख पात्र असलेल्या गुडीयाभोवतीच रेंगाळले आहे. काही वर्षांपूर्वी घडलेल्या सत्य घटनेवर आधारीत चित्रपट आहे. (दिव्या दत्ता) ही या चित्रपटात गुडीया आहे. तिचे लग्न आरिफशी होते. आरिफ एक सैनिक आहे. आणि नेहमीप्रमाणे लग्नानंतर त्याला सीमेवर युद्धासाठी जावे लागते, (बॉर्डरमध्ये सुनील शेट्टीही गेला होता.) अचानक तो गायब होतो, त्याचा काहीच पत्ता लागत नाही, आणि मग..(प्रेक्षकांना इथे जरा इमोशनल व्हावं लागेल, तशी तरतूद लेखकाने केली आहे)

gudia
IFM
पाहता पाहता चारवर्ष उलटून जातात. मग गुडीयाचा संयम सुटतो, तौफीक तिला आवडू लागतो, आणि दोघांचे लग्न लागते. यातही दोन वर्षे उलटून जातात. ती एक्सपेक्टींग असते. तिला मूल होणार असते. पण अचानक (इथे दिग्दर्शकाचा कस, संगीतकाराच्या साहाय्याने विचित्र आवाज, उदा: ढीश, ढाश वगैरे वगैरे) आरिफचा शोध लागतो त्याला पाक सैन्याने पकडले असते. मग देशात त्याला हिरो म्हणून ओळखले जाते. तो परत येणार याचे गुडीयाला टेन्शन, आरिफला घडलेल्या सर्व घटनांची माहिती होते पण, तो गुडीयाला सोडायला तयार नसतो, त्याला गुडीया परत हवी असते. शरीयातच्या नियमांनुसार गुडीयाला आरिफकडे परत जावे लागते. नियमांच्या जाळ्यात अडकलेल्या गुडीयाचा अखेरीस रुग्णालयात मृत्यू होतो.
आणखी
‘जिमी’ : मिथूनपुत्राचा पहिला चित्रपट
खुदा के लिए
हायजॅक
शौर्य : न्याय, विश्वास आणि सन्मानाची कथा
सिर्फ : लाइफ लुक्स ग्रीनर ऑन द अदर साइड
रेस : कोण जिंकणार?