निर्माता- आदित्य चोप्रा दिग्दर्शक- विजय कृष्णा आचार्य संगीत- विशाल-शेखर कलाकार- अक्षय कुमार, करीना कपूर, सैफ अली खान, अनिल कपूर, संजय मिश्रा, मनोज पाहवा, यशपाल शर्मा
यशराज फिल्म्सचे यंदा पाच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यात येत्या २५ एप्रिलला प्रदर्शित होणार्या 'टशन'विषयी मोठी उत्सुकता आहे. सध्या या चित्रपटाचे प्रोमोज दाखविण्यात येत आहेत. त्यावरून ही स्टायलिश फिल्म असल्याचे वाटते. सैफ अली खान व करीना कपूरची 'हॉट' जोडी हे चित्रपटाचे आकर्षण आहेच, पण अक्षय कुमार बर्याच दिवासांनी एक्शनपटात दिसणार आहे. शिवाय अनिल कपूरची वेगळी भूमिका एक आकर्षण आहे.
परस्परांचा द्वेष करणार्या व्यक्ती एकत्र आल्या तर काय होऊ शकेल? टशनचे कथानकही या थीमवरच आधारीत आहे. अतिशय थंड डोक्याचा कॉल सेंटर एक्झुक्युटिव्ह जिमी क्लिफ (सैफ अली खान), गॅंगस्टर बच्चन पांडे (अक्षय कुमार) व जिच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे धोका अशी ओळख असलेली सुंदर युवती (करीना कपूर). हे तिघेही एकत्र येतात आणि त्यांना एका विशिष्ठ लक्ष्यासाठी एकत्र प्रवास करावा लागतो.
या प्रवासात त्यांना एकत्र रहाणे भागच पडते. कारण जिवंत रहायचे तर ते करायलाच पाहिजे. त्यामुळे परस्परांवर विश्वासही ठेवायलाच पाहिजे. पण भैय्याजींवर (अनिल कपूर) कसा काय विश्वास ठेवणार? कारण हत्या करणे ही त्याची 'दुसरी' आवड आहे. आणि पहिली आवड आहे, 'इंग्रजी बोलणे' ही.
पात्र परिचय- बच्चन पांडे (अक्षय कुमार) वय- पोलिसांच्या रेकॉर्डनुसार ३०. काकूनुसार २५ आणि ओमप्रकाशच्या मते २६. माझ्या मते २८. वैवाहिक स्थिती- प्रश्नच समजला नाही. पात्रता- वीजसुद्धा चोरू शकतो आणि शरीरातील सर्व हाडे मोडण्याची 'फूल' गॅरंटी. अनुभव- बराच. उपलब्धी- गाईपासून बंगल्यापर्यंत सगळ्यांची वसुली केलीय. लक्ष्य - 'चांगला' मारेकरी बनणे.
भैय्याजी (अनिल कपूर) पूर्ण नाव- लखन सिंह ऊर्फ भय्याजी वय- लक्षात नाही. पण ' अभी तो मैं जवान हूँ' वैवाहिक स्थिती- लहानपणापासूनच एकटा आहे. पण लवकरच लग्न करीन म्हणतो. शैक्षणिक पात्रता- किंगकॉंग युनिव्हर्सिटीतून एमएमएस, बिंग बांग युनिव्हर्सिटीतून बॉटनीत जेकेएल, शिवाय कुठल्या तरी विद्यापीठातून बीएएमएस झालोय. सध्या इंग्रजीत ऑनर्स करतोय. शिवाय दोन चार डिग्र्या तयार होताहेत. अनुभव - स्वतःच्या पायावर उभा आहे. पूर्वी रिक्षा चालवत होतो. आता देश चालवतोय. उपलब्धी- चोरी, दरोडा, हत्या आवड- परदेशी कपडे व २४ तास इंग्रजी बोलणे. लक्ष्य - जॉर्ज बुश प्रमाणे इंग्रजी बोलणे.
जिमी (सैफ अली खान) नाव- जिम क्लिफ (जितेंदर कुमार मखवाना, कृपया हे नाव कुणाला सांगू नका.) वय- मुलींनुसार वय बदलते. वैवाहिक स्थिती- लग्नाबिग्नात इंटरेस्ट नाही. पोरींसाठी मात्र नेहमी तयार. पात्रता- कोणत्याही मुलीला पैज लावून पटवू शकतो. तसा मी ग्रॅज्युएट आहे. अनुभव- गेल्या दोन वर्षांत कॉल सेंटरमध्ये काम करतोय. इंग्रजी शिकवतो. उपलब्धी- सर्वांत जास्त गर्लफ्रेंड (पाचवीतल्यापासून ग्रॅज्युएटवाल्यांपर्यंत) आवड- एवढ्यावरून तुम्हाला कळायला पाहिजे राव! लक्ष्य- जिवंत रहाणे, बास!
पूजा (करीना कपूर) पूर्ण नाव- पूजा सिंह वय- तुम्हाला काय त्याचे? वैवाहिक स्थिती- हॉट अँड सिंगल पात्रता- ३४-२२-३४ अनुभव- तुम्ही विचार कराल त्याहून क्कीच जास्त. उपलब्धी- अजून बरेच काही मिळवायचेय. लक्ष्य- सगळ्यांना 'येड्यात' काढणे.
|