‘गोलमाल’ च्या यशानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी, त्याच धर्तीवरचा ‘गोलमाल रिटर्न’ घेऊन येत आहेत. पहिल्या चित्रपटात प्रेक्षकांना पोट धरून हसवायला लावल्यानंतर दुसरा चित्रपटही तेवढाच कॉमेडी ठरेल, असा त्यांना विश्वास आहे.
गोलमाल ही गोपाळ (अजय देवगन) ची कहाणी आहे. पत्नी एकता (करीना कपूर), बहिण ईशा (अमृता अरोरा) आणि लकी (तुषार कपूर) या मुक्या शालकाबरोबर तो राहत असतो. सर्वसामान्य महिलांप्रमाणेच एकतालाही टीव्हीवरील सासू-सुनेच्या मालिकांमध्ये रस असतो. ती दिवसरात्र टीव्हीसमोर बसून असते.
एकेरात्री ऑफिसवरून परतत असताना गोपाळला दिसते की, मीरा या सुंदर युवती (सेलिना जेटली)ची काही गुंड महिला छेड काढत आहेत. तो मिराला गुंडांपासून वाचवतो पण, या भानगडीत त्याला तिच्याबरोबर पूर्ण रात्र एका नावेत काढावी लागते.
सकाळी गोपाळ घरी जातो तेव्हा एकता समोर येते. मालिका पाहून शंकेखोर बनलेल्या एकताला वाटते की, गोपाळ पूर्ण रात्र ऑफिसमधील मुलीबरोबर राहून घरी परतला आहे. त्याचे काहीच ऐकून न घेता ती भांडण करते. अॅंथनी गोन्साल्वीस या आपल्या मित्राकडे रात्र काढल्याची तो थाप मारतो. त्याचा खोटा पत्ताही तो देतो. एकताला त्याचे सांगणे पटत नाही आणि ती थनीला पत्र पाठवून बोलावते.
IFM
IFM
गोपाळला ही बाब समजते तेव्हा तो आपला मित्र लक्ष्मण (श्रेयस तळपदे) ला अॅंथनी म्हणून तिच्यासमोर उभे करतो. पण, खरा अॅंथनी गोन्साल्वीस एकतासमोर प्रगट होतो तेव्हा एकच गोंधळ सुरू होतो. खरेतर त्याच पत्यावर अॅंथनी गोन्साल्वीस रहात असतो.
मीराला वाचविण्यासाठी गोपाळने ज्याठिकाणी गुंडांना मारलेले असते तेथेच पोलिसांना एक प्रेत सापडते. पोलिस अधिका-यांचा तपास सुरू होतो आणि गोपाळ आणखीनच गोत्यात येतो. या प्रकरणातून गोपाळ सुटतो का? सुटला तर कसा? हे जाणून घ्यायचंय, तर पहा 'गोलमाल रिटर्न'.