चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » आगामी चित्रपट » थ्री इडियट्स
आगामी चित्रपट
Feedback Print Bookmark and Share
 
बॅनर : विधु विनोद चोपड़ा प्रोडक्शन्स
निर्माता : विधु विनोद चोपड़ा
दिग्दर्शक : राजकुमार हीरानी
लेखक : विधु विनोद चोपड़ा, राजकुमार हीरानी, अभिजीत जोशी
गीत : स्वानंद किरकिरे
संगीत :शांतनु मोइत्रा
कलाकार : आमिर खान, करीना कपूर, आर. माधवन, शरमन जोशी, बोमन ईरानी, मोना सिंह, परीक्षित साहनी, जावेद जाफर

आमिर खानसारखा परफेक्शनिस्ट आणि राजकुमार हिराणीसारखा बुद्धिमान दिग्दर्शक एकत्र आल्यास नक्कीच खुर्चीत सावरून बसण्यासारखे काहीतरी पहायला मिळणार ही अपेक्षा वृथा नाही. म्हणूनच थ्री इडियट्स या आगामी चित्रपटाबद्दल अपेक्षा दाटून आल्या आहेत. विधू विनोद चोप्राने या दोन दिग्गजांना एकत्र आणले आ हे. २५ डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होईल.

थ्री इडियट्स ही कथा आहे, माधवन आणि शर्मन जोशी या दोन मित्रांनी घेतलेल्या आपल्या तिसर्‍या मित्राच्या - रांचो (आमिर खान) शोधाची. या शोधप्रवासात आठवणींच्या कप्प्यात दडलेले क्षण समोर येतात नि गेलेले दिवस पुन्हा हिरवे होतात. रांचोने या मित्रांच्या ह्रदयावर कसे गारूड केले होते त्या सगळ्या गोष्टी त्यांना आठवू लागतात. हॉस्टेलचे दिवस याद येतात. याच दिवसांत रांचो आणि पिया (करीना कपूर) या दोघांत लुटूपुटूची भांडणेही होतात. एक कठोर प्राध्यापक वीरू शास्त्रबुद्धेंसोबत त्यांचा संघर्षही रंगतो. अचानक रांचो कुणाला काहीही न सांगता गायब होतो. तो कुठे जातो? मुळात तो कुठून आला होता? या विषयी काहीही माहिती नसते. या रांचोने त्याच्या मित्रांना वेगळे जीवन जगायला शिकवलेले असते. लोक त्यांना म्हणूनच इडियट म्हणून संबोधायलाही कमी करत नाहीत. या सगळ्यांचा मुर्खशिरोमणी रांचो असतो. पण तोच कुठे असतो ते कळत नाही. त्याच्या शोधाचा हा प्रवास या चित्रपटात मांडला आहे.

हा चित्रपट कॉमेडी तर आहेच. पण अंतर्मुख करणाराही.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: थ्री इडियट्स आमिर खान, करीना कपूर, आर माधवन, शरमन जोशी