मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > चित्रपट समीक्षा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
ब्लॅक एंड व्हाईट :थोडा ब्लॅक, थोडा व्हाईट
IFM
निर्माता-दिग्दर्शक :सुभाष घई
गीत :इब्राहिम अश्क
संगीत :सुखविंदर सिंह
कलाकार :अनुराग सिन्हा, अनिल कपूर, शेफाली छाया, अदिती शर्मा, मिलिंद गुणाजी, अरुण बक्षी

काही वर्षांपूर्वी यशाच्या शिखरावर असलेल्या सुभाष घई यांनी एक वादग्रस्त मत मांडले होते. व्यावसायिक चित्रपटापेक्षा कलात्मक चित्रपट बनविणे सोपे असल्याचे सांगून त्यांनी अनेकांचा राग ओढवून घेतला होता. आता 'ब्लॅक एंड व्हाईट' या चित्रपटाद्वारे त्यांनी कलात्मक चित्रपट आणला आहे. वास्तववादी चित्रपट बनविणे सोपे काम नाही हे कदाचित त्यांच्या लक्षात आले असेल.

या चित्रपटात त्यांनी एका दहशतवाद्याच्या मनाच्या घालमेलीचे चित्रण केले आहे. मानवी बॉम्ब बनलेल्या एका अतिरेक्याचे काही सह्रदय लोकांमध्ये राहिल्यानंतर त्याचे ह्रदयपरिवर्तन होते. या विषयावर 'दिल से', 'द टेररिस्ट', 'धोका' हे चित्रपट येऊन गेले आहेत. तरीही घई यांनी या विषयावर चित्रपट काढण्याचे धाडस केले आहे.

'नुमैर काजी (अनुराग सिन्हा) एक दहशतवादी असून 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात बॉम्बस्फोट करण्यासाठी दिल्लीत आलेला आहे. त्याच्या बालपणापासूनच त्याच्या मनात नफरतीचे बीज पेरणार्‍या कट्टरपंथी दलाचा सदस्य आहे.

आपण गुजरात दंगलीचा शिकार असल्याचे सांगून दिल्लीच्या चॉंदनी चौकात राहणार्‍या प्रोफेसर राजन माथुर (अनिल कपूर) आणि त्याची पत्नी रोमा (शेफाली छाया) यांची सहानुभूती मिळवतो. त्यांच्याच घरात राहायला लागतो.

IFM
नुमैरला 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात प्रवेशासाठी पास हवा असतो. रोमा, राजन त्याच्यासाठी पास मिळवितात. त्या दरम्यान त्याला पंधरा दिवस चॉंदनी चौकात राहावे लागते. आपलीच विचारसरणी योग्य आहे, असे मानणार्‍या नुमैरला चॉंदनी चौकातील लोकांमध्ये राहून, आपलाच मार्ग तर चुकीचा नाही अशी जाणीव होते. मनाच्या या घालमेलीतून तो बाहेर कसा पडतो, हे पुढे दाखविले आहे.

चित्रपटाचे कथानक चांगले आहे मात्र पटकथा कमकुवत वाटते. पटकथा लेखक सचिन भौमिक, सुभाष घई आणि आकाश खुराना यांचा थोडासा गोंधळ उडाल्याचे वाटते.

वास्तववादी चित्रपट करताना त्यात व्यावसायिकताही दिसून येते. त्यामुळे घटनाक्रम फिल्मी वाटतात. चित्रपट हवा तेवढा प्रभाव टाकू शकत नाही. नुमैरचा प्रोफेसर आणि त्याच्या पत्नीचा विश्वास जिंकणारे दृश्य नकली वाटते. रोमाच्या हत्येने नुमैरचे हृदय परिवर्तन होते, हे पटत नाही.
सुभाष घईंच्या दिग्दर्शनात परिपक्वता आणि अनुभव मात्र दिसून येतो. पटकथेत त्रुटी असतानाही चित्रपट खिळवून ठेवतो.

IFM
घईंनी आधीही बॅलिवूडला नवीन कलाकार दिले आहेत. या चित्रपटात त्यांनी अनुराग सिन्हा नावाचा अभिनेता पेश केला आहे. अनुराग लंबी रेस का घोडा ठरू शकतो. त्याचा आवाजही प्रभावी आहे. अनिल कपूर कोणत्याच अँगलने प्रोफेसर वाटत नाही. पत्नीच्या रूपात शेफाली छाया त्याच्या वरचढ ठरली आहे. अदिती शर्माला जास्त स्कोप नाही.

सुखविंदर सिंहच्या संगीतात 'मै चला' आणि 'जोगी आया' ऐकायला चांगले वाटते. इब्राहिम अश्क यांनी लिहिलेली गीते अर्थपूर्ण आहेत. घईंचा हा चित्रपट मागच्या किसना, यादेपेक्षा चांगला आहे.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा...
आणखी
जोधा अकबरची संथ सुरुवात
जोधा-अकबर- पावणेचार तासाचा 'हॅंगओव्हर'
सर्व काही 'मित्थ्या' नाही
'रामा-रामा' पती-पत्नीचा फुटकळ 'ड्रामा'
'संडे' धमाल मनोरंजन
बॉम्बे टू बॅंकॉक : कंटाळवाणा प्रवास