मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > चित्रपट समीक्षा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
महत्त्वाकांक्षेची ‘रेस’

IFM
निर्माता : कुमार एस. तौरानी-रमेश एस. तौरानी
दिग्दर्शक : अब्बास-मस्तान
गीतकार : समीर
संगीत : प्रीतम
कलाकार : सैफ अली खान, बिपाशा बसू, कैतरीना कैफ, अक्षय खन्ना, समीरा रेड्डी, अनिल कपूर

अब्बास मस्तान ही जोडी थ्रिलर, रहस्यमय चित्रपटांसाठी ओळखली जाते. त्यांच्या 'रेस' या नव्या चित्रपटात जबरदस्त ऍक्शन आहे. चमकणार्‍या कार, उंचच उंच बिल्डिंग, फॅशनेबल कपडे, स्टाईल, नेत्रसुखद लोकेशन, तीन हॉट नायिका असे सगळे घटक आहेत. फक्त उत्सुकता निर्माण करेल आणि ती टिकवून ठेवेल, अशी पटकथा फक्त नाहीये. त्यामुळे कोट्यवधी रूपये खर्च करूनही 'रेस' मध्ये रसिकांचा रस फार काळ रहात नाही.

'रेस'ची कथा दोन सावत्र भाऊ रणवीर (सैफ अली खान) आणि राजीव (अक्षय खन्ना) यांच्या शह काटशहाची आहे. रणवीर व्यापार सांभाळतो तर राजीव आळशी आणि व्यसनी आहे. त्यांचा दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे घोड्यांचा तबेला आहे.

IFM
सोनिया (बिपाशा बसू) एक सुंदर मॉडेल आहे. रणबीरचे तिच्यावर प्रेम आहे. राजीवचेही सोनियावर प्रेम असते. पण तिच्यासाठी तो व्यसन सोडायलाही तयार आहे असे कळल्यावर रणवीर सोनियाचे लग्न राजीवशी लावून देतो.

लग्नानंतरही राजीव दारू पिणे सोडत नाही. त्यामुळे रणबीर आणि सोनिया काळजीत असतात. अचानक एक हत्या होते. हत्येचा शोध आर. डी. (अनिल कपूर) सुरू करतो. शोध पुढे सरकतो तसतशा नवनवीन गोष्टी समोर येत जातात.

शिराद अहमद यांनी लिहिलेल्या पटकथेत प्रत्येक पंधरा मिनिटांनी प्रेक्षकांना धक्का बसतो. रहस्यमय चित्रपटात असा धक्का हवाच. पण तो कथानकाच्या मर्यादेत हवा. प्रेक्षकांना अंदाज लावता आला पाहिजे, पण त्यांच्या अंदाजापेक्षाही भलतेच काही समोर आले तर प्रेक्षकांना ते पचवणे जड जाते. 'रेस'चे तेच झाले आहे. थोडक्यात कथेचा तोल गेल्यामुळे ती मर्यादेत न राहता, भरकटत गेली आहे.

सैफविरुद्ध कारस्थान रचत अक्षय आणि कैतरीना मॅरेज कोर्टात जातात. अक्षय, सैफचे नाव घेऊन कैतरीनाशी लग्न करतो. मात्र सैफची हत्या केल्यानंतर पोलिस तपासासाठी येथेच येतील ही साधी गोष्टही त्याला कळत नाही? एवढे मोठे षडयंत्र रचणारा असा मुर्खपणा कसा करू शकतो?

चित्रपटात कार रेसच्या बहाण्याने अक्षय आणि सैफ यांच्यातील जगण्याची लढाई दाखवली आहे. मात्र या रेस साठी कोणताही नियम लागू होत नाही. ही रेस कुठे, कधी संपेल याबद्दल सांगितले जात नाही.

चित्रपटातील प्रत्येक पात्र महत्त्वाकांक्षी आहे. प्रत्येकावरच सोप्या आणि सहज मार्गाने पैसे कमावण्याची धुंदी आहे. त्यामुळे कोणत्याही पात्रावर विश्वास ठेवणे कठीण जाते.

दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांनी चित्रपटाला स्टायलिश बनविले आहे. पण पटकथेतील त्रुटींकडेही थोडे लक्ष द्यायला हवे होते.

IFM
सैफचे काम छान आहे. पण अक्षय खन्नाला जास्त वाव आहे. तो एक चांगला अभिनेता असल्याचे यातून पुन्हा एकदा दिसून आले. बिपाशा, कैतरिना, समीरा छान वावरतात, एवढाच त्यांचा उपयोग.

प्रीतमचे संगीत नावाप्रमाणे वेगवान गतीने पळते. 'अल्लाह दुहाई है', 'पहली नजर मैं', आणि 'टच मी' काळानुरूप आहे. एकत्रितपणे रेस मनोरंजन करतो पण प्रेक्षक ज्या अपेक्षा घेऊन जातो त्या पूर्ण करण्यात असमर्थ ठरतो.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा....
आणखी
26 जुलै अ‍ॅट बरिस्ता- त्यापेक्षा घरी बसून छान कॉफी प्या!
ब्लॅक एंड व्हाईट :थोडा ब्लॅक, थोडा व्हाईट
जोधा अकबरची संथ सुरुवात
जोधा-अकबर- पावणेचार तासाचा 'हॅंगओव्हर'
सर्व काही 'मित्थ्या' नाही
'रामा-रामा' पती-पत्नीचा फुटकळ 'ड्रामा'