मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > चित्रपट समीक्षा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
धुमधडाका? हा तर फुसका बार  Search similar articles
निर्माता- दिग्दर्शक- शशी रंज
संगीत- रूपकुमार राठो
कलाकार- अनुपम खेर, सतीश शाह, रंधावा, समीर दत्तानी, आरती छाब्रिया, शमा सिकदर, सतीश कौशिक, दीपशिखा, गुलशन ग्रोव्हर, जॅकी श्रॉफ.

IFMIFM
'धुमधडाका' सारखे चित्रपट तयारच का केले जातात हा खरा प्रश्न आहे? या चित्रपटात खिळवून ठेवायला काहीही नाही. मनोरंजंन कोणत्याही प्रकारे होऊ नये याची पूर्ण काळजी घेतलेली आहे. फक्त एक गोष्ट मात्र शिकायला मिळते. ती म्हणजे कोणते चित्रपट पाहू नये ही.

निर्माता- दिग्दर्शक शशी रंजन यांनी आपली 'चित्रपटांची' खाज भागवायला हा चित्रपट काढला असावा हे हा पूर्ण चित्रपट पाहिल्यावर (की भोगल्यावर?) कळते. सांगताना हा विनोदी चित्रपट आहे, अशीच त्याची प्रसिद्धी केली गेली आहे. पण तो 'इनोदी' आहे, हे पहायला गेल्यानंतर कळते.

फालतू विनोदाची भरमार चित्रपट आहे. या विनोदाला सुबुद्ध प्रेक्षक तर हसणार नाहीच, पण पिटातला प्रेक्षकही त्याकडे पाठ फिरवेल. चुकून चित्रपटाला गेलात तर १४ रिळांनंतरच तुमची सुटका हे लक्षात ठेवा. अतिरंजित, अतिशयोक्ती अशा सगळ्या अती गोष्टींची यात गर्दी आहे.

IFMIFM
मुंगीलाल (अनुपम खेर) एक डॉन आहे. त्याला ऑल एशियन भाई मीटमध्ये (एएबीएम) आपला एक वारस आहे, हे सांगण्याची वेळ येते. वास्तविक त्याचे लग्नही झालेले नसते. अनेक वर्षांपूर्वी त्याने आपल्या बहिणीला घरातून बाहेर काढलं आहे. त्यानंतर त्याला कळतं की त्या बहिणीला कमल नावाचा मुलगा आहे. मग तो त्याला शोधायची मोहिम काढतो. पण त्याला कमल नावाची अनेक मुले मुली भेटतात. पण त्यातला खरा भाचा कोण हे ओळखणं त्याला अवघड जातं.

कथेत हास्यस्फोटक प्रसंगांना चांगली संधी होती. पण पटकथा इतकी बकवास आहे, की बस. लांबच्या लांब दृश्ये आहेत. चित्रपट पाहून पडणारे प्रश्न नंतर डोकं खातात. त्यांची उत्तरेच मिळत नाहीत.

सगळी पात्र 'इनोदी' आहेत. त्यांचा अभिनय हा ओव्हरएक्टिंगचा उत्तम नमुना आहे. अनुपम खेर, सतीश शाह यांनी यात का काम केले तेच कळत नाही. बाकीचे कलाकारही तसेच.

थोडक्यात बा कसला 'धुमधडाका' हा तर फुसका बार.
आणखी
आवडला तर 'जन्नत' नाही तर 'जहन्नूम'  
एक डाव भूतनाथचा!
'टशन'? डोक्याला 'टेन्शन'
क्रेझी- ४- वेड्यांचा बाजार
'यू, मी और हम'- सहनशक्तीची परीक्षा
'वन टू थ्री' : टाईमपाससाठी ठीक