मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > चित्रपट समीक्षा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
थोडेसेच प्यार बरीचशी मॅजिक  Search similar articles
photo
PRPR
निर्माता : आदित्य चोपड़ा-कुणाल कोहली
दिग्दर्शक : कुणाल कोहली
गीतकार : प्रसून जोश
संगीत : शंकर-अहसान-लॉय
कलाकार : सैफ अली खान, रानी मुखर्जी, ऋषी कपूर, अमीषा पटेल (पाहुणी कलावंत), श्रिया शर्मा, आयुषी बर्मन, रचित सिदाना, अक्षत चोपड़

परिकथा खूप रोचक असतात विशेषतः लहान मुलांना त्या जास्त आवडतात. या कथांमध्ये कुणातरी दुःखी व्यक्तीचे दुःख दूर करण्यासाठी एखादी परी येते. आणि नंतर मग सगळं कसं आलबेल होत. ‘थोड़ा प्यार थोड़ा मॅजिक’ ही सुद्धा अशीच परिकथा आहे. या चित्रपटात परी प्रेमात पडते ही नवी थीम घेऊन फॅंटसीच्या अंगाने चित्रपटात नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्‍न दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी केला आहे.

photo
PRPR
रणवीर (सैफ अली खान) याच्या हातून एक अपघात घडतो. ज्यात चार मुले अनाथ होतात. या चार मुलांची जबाबदारी न्यायालयाकडून रणवीरकडे सोपविली जाते. मात्र त्याला तीन महिन्यात या मुलांची चांगली देखभाल करून दाखवावी लागणार असते, अन्यथा 20 वर्षांचा तुरूंगवास. रणवीरने आपल्याला मारहाण करावी आणि त्याला शिक्षा व्हावी म्हणून मुले त्याला खूप त्रास देतात. रणवीरला त्रास देण्याच्या या दृश्यातून दिग्दर्शकाने हसविण्याचा प्रयत्न केला आहे मात्र तो फारसा यशस्वी झालेला नाही.

या सर्व प्रकरणामुळे रणवीरही आणि मुलेही वैतागतात. शेवटी ईश्वराची आराधना केली जाते. सुटाबुटातला आधुनिक देव (ऋषी कपूर) त्यांची प्रार्थना ऐकतो आणि गीता (रानी मुखर्जी) नावाच्या परीला ही अडचण सोडविण्यासाठी पाठवितो. आपल्या जादूने गीता या सर्वांमध्ये जवळीक निर्माण करण्यात यशस्वी होते. मात्र हे करताना स्वतःच प्रेमात पडते.

चित्रपटाची सुरुवात थोडी बोअरिंग वाटते मात्र रानी मुखर्जी आल्यानंतर दर्शकमनाची काही अंशी पकड घेण्यात यशस्वी होते. रानी एक-एक करत सर्व मुलांच्या मनात सैफबददल सहानुभूती निर्माण करते. मात्र ही दृश्ये फारशी प्रभावी ठरलेली नाहीत. सर्वकाही अगदी सरळ व कृत्रिम झाल्यासारखे वाटते. कुणाल कोहलीच्या यापूर्वीच्या ‘हम तुम’ची कथा लहान होती मात्र त्यातील चांगल्या दृश्यांमुळे दर्शकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली होती.

लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून जर कुणालने हा चित्रपट बनविला आहे तर त्यात ‘लेझी लम्हें’ सारखं हॉट गीत कोणत्या कारणासाठी टाकलं कळत नाही.

photo
PRPR
रानीतल्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून घेण्यात दिग्दर्शक अयशस्वी ठरला आहे. तिचा अभिनय चांगला आहे मात्र परिच्या भूमिकेत ती तितकीशी रिलॅक्स वाटत नाही. तर सैफला श्रीमंत व्यक्तीची भूमिका वठविणे फारसे कठीण गेलेले नाही. अमीषा पटेलबद़दल सर्वांनाच घृणा का वाटते कुणास ठाऊक? या सर्व अनुभवी कलाकारांसमोर मुलांचा अभिनय चांगला झाला आहे. विशेषतः इकबाल या शीख मुलाने दर्शकांना खूप हसविले आहे. ऋषी कपूर तर कुणालच्या चित्रपटाचा अविभाज्य भागच आहे.

शंकर-अहसान-लॉय यांच्याकडून दर्शकांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. चित्रपटाचे संगीत फारसे प्रभावी ठरलेले नाही. गाण्यांसाठी सिच्युएशनही व्यवस्थित वाटत नाही. जुन्या इंग्रजी चित्रपटांच्या आधारावर संदीप चौटा यांनी हास्य दृश्यांना दिलेले पार्श्वसंगीत प्रभावी वाटते. स्पेशल इफेक्ट्स चांगलेच प्रभावी आहेत. ‘थोड़ा प्यार थोड़ा मॅजिक’ अगदीच वाईट नाही. लहान मुलांसह चित्रपट पाहता येईल.
आणखी
'हाल ए दिल': हालच हाल
'सरकार राज' आपटला
मेरे बाप पहले आपः डोक्याला नस्ता ताप
धुमधडाका? हा तर फुसका बार
आवडला तर 'जन्नत' नाही तर 'जहन्नूम'  
एक डाव भूतनाथचा!