मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > चित्रपट समीक्षा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
शिळ्या कढीला उत ‘मेहबूबा’  Search similar articles
ajay-manisha
IFM
निर्माता-दिग्दर्शक : अफज़ल खान
संगीत : इस्माइल दरबार
कलाकार : संजय दत्त, मनीषा कोईराला, अजय देवगण

‘मेहबूबा’ हा 15 वर्षांपूर्वीच्या ट्रेंडमधला चित्रपट आहे. त्याकाळी असे चित्रपट बनायचे आणि चालायचेही. मोठ-मोठे सेट्स, डोळ्यांची पारणे फेडणारे लोकेशन्स त्यात असायची. अशा भव्य चित्रपटांच्या निर्मितीवर तेव्हा खूप पैसा खर्च केला जात असे. अडचण अशी की 'मेहबुबा'अशा काळात आला जेव्हा असा ट्रेंड कालबाहय झाला आहे.

‘साजन’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘हम आपके है कौन’ या चित्रपटांची आठवण ‘मेहबूबा’ पाहताना आल्याशिवाय राहणार नाही. या सर्व चित्रपटांसह अनेकांची भेसळ म्हणजे ‘मेहबूबा’. या चित्रपटातील कलाकारांकडे पाहूनच हा जुनाट चित्रपट असल्याची खात्री पटते. इतका जुना की त्यातली कलाकारांचे कपडे, हेअरस्टाईल सर्वच आता शिळं वाटतं.

पाच भावनाप्रधान दृश्य, थोडीशी कॉमेडी, 6 गाणी, एक आयटम साँग आणि काहीशी चमकधमक हा चित्रपटाचा सेलिंग पॉईंट आहे. ज्यांना हे आवडते, त्यांनी हा चित्रपट पहायला हरकत नाही.

mahebooba
IFM
कुठलेही नावीन्य नसलेली चित्रपटाची कथा आहे. बॉलीवूडमध्ये आतापर्यंत शेकडो वेळा एक नायिका दोन नायक किंवा दोन नायिका एक नायक कन्सेप्टवर चित्रपट येऊन गेले आहेत.

दिग्दर्शक अफज़ल खान यांनी ही जुनी रेकॉर्ड नव्या वेष्टनात प्रेक्षकांसमोर आणली आहे. त्यातील काही दृश्ये खरोखरच चांगली आहेत. उदा. संजय आणि मनीषा यांच्यातील भांडणाचे दृश्य आणि चित्रपटाचा शेवट. मात्र, लांबीवर नियंत्रण घालता आलेले नाही.

इस्माइल दरबार यांच्या संगीतावर ‘हम दिल दे चुके सनम’ ची छाप आहे. काही गीते चांगली जमली आहेत. अशोक मेहता यांचे छायाचित्रण चांगले तर नितीन देसाई यांचे सेट्सही उत्तम आहेत.

sanjay-kashmira
IFM
संजय दत्त आणि अजय देवगण यांनी अशा पद्धतीच्या भूमिका अनेकदा केल्या आहेत. त्यामुळे त्यांना फारसे काही करण्याची गरज भासलेली नाही. मनीषा सुंदर दिसली. कादर खान यांनीही अशा प्रकारच्या भूमिका केल्या आहेत.

चुकीच्या वेळी प्रदर्शित झालेला ‘मेहबूबा’ जर 15 वर्षांपूर्वी आला असता तर नक्कीच चालला असता.
आणखी
नात्यांची नव्याने उकल करणारा 'जाने तू...'
थोडेसेच प्यार बरीचशी मॅजिक
'हाल ए दिल': हालच हाल
'सरकार राज' आपटला
मेरे बाप पहले आपः डोक्याला नस्ता ताप
धुमधडाका? हा तर फुसका बार