चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » चित्रपट समीक्षा » 'मिराबाई... ' नॉट आऊट
चित्रपट समीक्षा
Feedback Print Bookmark and Share
 
IFM
निर्माता - रंगिता नंदी, प्रीतिश नंदी
दिग्दर्शक - चंद्रकांत कुलकर्णी
संगीत - संदेश शांडिल्य
कलाकार - मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, अनुपम खेर, एजाज खान, चारू शर्मा, अनिल कुंबले (विशेष भूमिका)

भारतामध्ये इतर खेळापेक्षा क्रिकेटपला अधिक पसंत आहे. हीच बाब लक्षात घेऊन दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी 'मीराबाई नॉट आउट' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. क्रिकेट हा धागा पकडून अने‍क चित्रपटांची निर्मिती झाली असली तरी हा चित्रपट जरा हटके आहे. आपल्या लग्नाच्या दिवशीही क्रिकेट सामाना पहायला जाणा-या मीरा या क्रिकेटप्रेमी युवतीची ही कथा आहे.

IFM
चंद्रकांत कुलकर्णी यांनी दर्जेदार मराठी चित्रपट केले आहेत. हिंदी चित्रपट करताना त्यांनी वेगळा आशय निवडून प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित केले आहे. 'मीराबाई नॉट आउट' ही एक लव्हस्टोरी आहे पण, याची पृष्ठभूमि क्रिकेट आहे.


मीरा (मंदिरा बेदी) विश्वप्रेम विद्यालयात मुलांना गणिताचा विषय शिकवते. तीचे क्रिकेटवर आणि क्रिकेटपटू अनिल कुंबलेवर प्रेम आहे, म्हणून ती अविवाहीत रहाते. मुंबईच्या गोंगाटात मीराबाई एका छोट्याशा घरात राहत असते. क्रिकेट सामन्यांवेळी भारतीय क्रिकेट संघ जिंकण्यासाठी ती नेहमीच प्रार्थना करत असते. तिच्या या क्रिकेटवेडामुळे घरचे लोक चांगलेच त्रस्त झालेले असतात.

मीराचा भाऊ मनोजही क्रिकेटवेडा आहे. रंणजी सामने खेळणारा मनोज जेव्हा वानखेडे स्टेडियमवर सामना असेल तेव्हा आपल्या बहिणीसह सामाना बघायला जाण्याचा प्लॅन त्याला करावला लागत असतो. तेव्हा ती शाळा सोडून सामाना बघायला जाते.

मीराच्या घरातील लोकांना आता तिच्या लग्नाची काळजी लागून राहिली आहे. एकदिवस डॉ. अर्जुन सचदेव (एजाज खान) यांच्याशी तिची भेट होते. सातत्याच्या भेटीनंतर त्याचे प्रेमात रूपांतर होते. जीवनामध्ये क्रिकेटव्यतिरीक्त भरपूर काही आहे, याची जाणीव मीराला होऊ लागते.


आपले लग्न क्रिकेटशी झाले असल्याचे मीराबाई अर्जुनला सांगते. आपल्या क्रिकेटप्रेमाबाबत अर्जुनला सर्वकाही सांगून टाकते. मीराच्या अश बोलण्यावर अर्जुनचे वडिल खुश नसतात. यानंतर काही नाट्यमय घडामोडी घडतात.


पटकथेमध्ये तेवढी ताकद नसली तरी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपल्या कौशल्याने ही उणीव भरून काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. महेश मांजरेकर आणि एजाज खान यांच्यात खेळवला गेलेला सामना, क्विज शोमध्ये अनुपम खेर यांचा सहभाग असताना मंदिराच सगळ्या प्रश्‍नांची बरोबर उत्तरे देते, असे प्रसंग सादरीकरणात भर घालणारे आहेत.

संगीतासाठी चित्रपटात खास स्कोपच नाही. अभिनयाच्या बाबतीत बोलायचे झाले तर मध्यवर्ती भूमिकेत मंदीराने उत्तम अभिनय केला आहे. एज़ाज यांनीही प्रभावित केले आहे. महेश मांजरेकर यांनीही छोटीशी भूमिका उत्तम साकारली. अनिल कुंबलेचा प्रयत्न ठीकच म्हणावा लागेल.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: मिराबाई नॉट आऊट