चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » चित्रपट समीक्षा » चिंटूजी- अनपेक्षित सुखद धक्का (Rishi Kapoor’s ‘Chintu Ji’ will bring a smile on your face)
चित्रपट समीक्षा
Feedback Print Bookmark and Share
 
फारशा अपेक्षा ठेवल्या नसल्या की अनपेक्षितरित्या काही छान घडले की त्याचा आनंद काही वेगळाच असतो. 'चिंटूजी' या ताज्या चित्रपटाबाबतीत असेच म्हणता येईल. यात ऋषी कपूर मुख्य भूमिकेत आहे. ऋषीच्या अभिनयक्षमतेबाबत प्रश्नच नाही, पण 'लव्हर बॉय'च्याच इमेजमध्ये अडकलेल्या ऋषीला इतर कुठल्या भूमिकांत 'ट्राय' करण्याचे धाडस फारसे कुणी दाखवलेच नाही. त्यामुळे बिचारा नेहमीच भर उन्हाळ्यातही पुलओव्हर घालून (वयाच्या पन्नाशीतही) नायिकेच्या मागे बागडत बसला. पण आता मात्र त्याच्या अभिनयाचे रंगही दिसू लागले आहेत. 'चिंटूजी' हा त्याचा ताजा मासला आहे.

चिंटूजी ही उपहासात्मक कथा आहे. व्यवस्थेला काढलेला चिमटा आहे, त्यामुळे दुखतेही आणि बरेही वाटते. हडबहेडी नावाच्या एका गावात निवडणूक जाहीर होते नि कुणाला या निवडणुकीला उभे करावे हा प्रश्न पडतो. 'सुपरस्टार' असलेला चिंटूजी हा गावकर्‍यांसमोरचा पर्याय आहे. कारण चिंटूजी प्रसिद्ध आहे, त्यांच्या प्रसिद्धीचा फायदा होऊन या ओबडधोबड नावाचे गाव भारतात फेमस होईल ही गावकर्‍यांची अपेक्षा आहे. हे गावकरीही अतिशय साधेभोळे, स्वच्छ नि मोकळ्या मनाचे आहेत. गावकरी मागे लागतात म्हणून चिंटूजीही बर्‍याच गमतीदार अटी घालून निवडणूक लढविण्यास होकार देतो. त्याचवेळी त्याच्या लोकप्रियतेला पाहून विरोधी गावाचे लोकही चिंटूजीला आपल्या कळपात ओढू इच्छितात. त्यासाठी ते त्याला पैशांचे अमीषही दाखवतात. चिंटूजीही या अमीषाला भाळतो. पण तो पुढे काय करतो हे पडद्यावरच पहाण्याची मजा आहे.

चिंटूजी हा आपल्या आजूबाजू वावरणार्‍या राजकारण्यांचाच प्रतिनिधी आहे. त्यांचेच चित्र तो पडद्यावर मांडतो. पण हे सगळे विनोदी पद्धतीने असल्याने चेहर्‍यावर आपोआपच लकेर उमटते. रणजीत कपूरचे दिग्दर्शन छान आहे. पटकथा बांधीव असल्याने त्याचे सादरीकरणही चांगले झाले आहे. संवादही चुरचुरीत आहेत. शेवटचा 'ड्रामा' काहीसा उबग आणणारा असला तरी चांगल्या सिनेमाला लागलेली तीट समजून दुर्लक्ष करावे.

एकुणात चिंटूजी पाहिल्याशिवाय राहू नये.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: चिंटूजी ऋषी कपूर