आमीर खान आपले काम मन लावून करतो. 'तारे जमी पर'च्या यशानंतर आता त्याचे संपूर्ण लक्ष 'गझनी' या आगामी चित्रपटावर आहे. हा एक ऍक्शन चित्रपट असून बर्याच वर्षांनी आमीर ऍक्शन चित्रपटात दिसणार आहे.
या चित्रपटातील भूमिकेनुसार आमीरने स्वत:त काही बदल केले आहेत. चित्रपटाच्या मध्यंतरानंतर आमीर एका टक्कल असलेल्या व्यक्तीच्या रूपात दिसणार आहे. त्यासाठी आमीरने त्याचे संपूर्ण केस कापले असून तो नवीन लुकमध्ये दिसत आहे. काही दिवसांपूर्वी 'रेस' चित्रपटाच्या प्रिमीअर शोमध्ये आमिर नवीन रूपात दिसला. तो फारच सुंदर दिसत होता असे लोकांचे म्हणणे आहे.
|