'जोधा अकबर' ने रिलीज झाल्यानंतर फक्त एका महिन्यात 120 करोड कमवून हिट चित्रपटांच्या यादीत समावेश केला आहे. हा चित्रपट जवळपास पंचवीस देशांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. त्या व्यतिरिक्त तमिळ आणि तेलगू भाषेतही चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. राजस्थान, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये विरोधाचा सामना करावा लागलेल्या या चित्रपटाला काही काळ बंदीलाही सामोरे जावे लागले. असे असतानाही चित्रपटाने 120 करोड रूपयांचा बिझनेस करणे ही मोठी बाब आहे. चित्रपट हिट झाल्यामुळे हृतिक आणि ऐशची जोडी देखील यशस्वी मानली जात आहे. बरेच निर्माते त्या दोघांना आपल्या चित्रपटात घेण्यासाठी सरसावले आहेत.
|