यशात सातत्य मिळविणार्या कैतरीनाने बॉलीवूडमधील बड्या नायिकांची झोप उडविली आहे. तिच्या चाहत्यांच्या संख्येतही बरीच वाढ होत आहे. 21 मार्चला प्रदर्शित झालेला 'रेस' चित्रपटात कैतरीना फारच सुंदर दिसली आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांच्या संख्येत अजूनच भर पडली आहे. 'रेस' मधील तीनही नायिकांमध्ये कैतरीना हॉट दिसते. त्यातच रेस हिट झाल्यातच जमा असल्याने कैतरीनाला त्याचा फायदा होणे स्वाभाविक आहे.
नुकत्याच एका मोबाईल कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात इतर नायिकांपेक्षा कैतरीनाचे फोटो सर्वाधिक डाउनलोड केले जात असल्याचे निदर्शनास आले. याचा अर्थ कैतरीनाने ऐश्वर्यालाही मागे टाकून दिले आहे.
सलमानचे कुटुंबीय तर तिच्यावर प्रचंड खूश आहेत. त्यांनी खास कैतरीनासाठी 'रेस' चित्रपटाचा स्पेशल शो पाहिला. सध्या सलमान शूटिंगच्या निमित्ताने भारताबाहेर असल्याने या शोला उपस्थित राहू शकला नाही. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी कैतरीनाच्या अभिनयाची बरीच प्रशंसा केली.
|