मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सलमान आणि अजय पुन्हा एकत्र

IFMIFM
'लंडन ड्रिम्स' हा चित्रपट आधी राजकुमार संतोषी बनविणार होते. पण सलग फ्लॉप चित्रपटांची मालिका दिल्याने संतोषींची गच्छंती झाली आणि त्यांच्या जागी विपुल शहा यांना आणण्यात आले.

या चित्रपटात सलमान खान आणि अजय देवगण हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या आधी दोघांनी 'हम दिल दे चुके सनम' मध्ये एकत्र भूमिका केलेली आहे.

अजय देवगणच्या जागी अर्जुन रामपालला घेतले गेले अशीही चर्चा सुरू होती. नायिकांमध्ये कैतरीना कैफ, प्रियंका चोप्रा आणि करीना कपूर यांचीही नावे समोर आली आहेत. त्यामुळे चित्रपटात नक्की कोण आहे हेच कळायला मार्ग नाही.

पण अखेरीस हे रहस्य उलगडत अजय आणि सलमान यांचीच जोडी असेल, असे विपुल शहाने स्पष्ट केले आहे. मात्र, चित्रपटासाठी नायिकेचा शोध सुरू असल्याचेही त्याने सांग‍ितले. या चित्रपटात नवोदित नायिकेला संधी देण्यात येणार आहे.

शूटिंग जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. या वर्षी विपुलचा अजून एक चित्रपट 'सिंह इज किंग' प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे.
आणखी
कैतरीनाने ऐश्वर्याला मागे टाकले
जोधा अकबर हिट चित्रपटाच्या श्रेणीत
आमीर खानचा नवा लुक
मिनिषाने पन्नास लाख रुपये लाथाडले
शाहरुखचा नवा चित्रपट 'बिल्लू बार्बर'
सैफ-करीना यांचा चित्रपट