मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
बिझी करीना

IFMIFM
फारसे हिट चित्रपट न देता सुद्धा काम कसे मिळवावे हे करीनाकडून शिकावे. चांगल्या चित्रपटांची उणीव तिला कधी भासलीच नाही.

'जब वुई मेट' चित्रपटाचे सारे श्रेय तिने न बोलता तिच्याकडे गेले. सध्या ती बर्‍याच नामवंत कलाकार आणि बड्या बॅनर्स समवेत काम करतेय. त्यामुळे पुढील दोन वर्षे तिच्याकडे बिलकूल वेळ नाही. चित्रपटांव्यतिरिक्त जाहिरातींतही ती झळकते आहे. ती मागेल तितकी रक्कम जाहिरात कंपन्या तिला देतात.

सध्या ती अक्षय कुमार, सैफ अली खान, आमीर खान, सलमान खान, अजय देवगन आणि जॉन अब्राहम या बड्या कलाकारांसमवेत काम करतेय. शूटिंग, जाहिरात आणि योगा यात बिझी असतानाही तिला सैफसाठी वेळ काढावा लागतो. म्हणूनच की काय सध्या लग्न करण्यासाठीही वेळ नसल्याचे ती सांगते.

करीनाचे नवीन घर तयार आहे. पण बिझी असल्यामुळे ती घरात रहायला गेलेली नाही. तिची आई बबिताने अखेरीस तिच्या बहिणीवर म्हणजे करीश्मावर ही जबाबदारी सोपवली आहे. ती मदतीसाठी तयारही आहे. मात्र काही गोष्टींसाठी करीनाची संमती असणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे ही गोष्ट सध्यातरी गाडे तिच्यामुळेच अडले आहे.
आणखी
एकाच गाण्यात दोन सुपरस्टार
सलमान आणि अजय पुन्हा एकत्र
कैतरीनाने ऐश्वर्याला मागे टाकले
जोधा अकबर हिट चित्रपटाच्या श्रेणीत
आमीर खानचा नवा लुक
मिनिषाने पन्नास लाख रुपये लाथाडले