मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अक्षय कुमार तात्या टोपेंच्या भूमिकेत?

IFM
माहिती आणि प्रसारण मंत्रालय निर्माता फिरोज नाडियादवालाच्या सहकार्याने १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामावर आधारीत चित्रपट तयार कराणार आहे. हे युद्ध कशाप्रकारे लढले गेले आणि किती महत्त्वपूर्ण होते? हे या चित्रपटात दाखविले जाणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विनय शुल्का असून त्यांनी 'गॉडमदर' हा समीक्षकांनी कौतुक केलेला चित्रपट यापूर्वी बनविला होता.

स्वातंत्र्यसंग्रामासारखा मोठा विषय असूनही चित्रपटाचे बजेट कमी आहे. फिरोज व्यावसायिक निर्माता असून त्याचे बॉलीवूडच्या कलाकारांशी फारच चांगले संबंध आहेत. त्यामुळे तो विषयाचे महत्त्व बॉलीवूडच्या कलाकारांना पटवून देऊन कमी पैशात त्याने काम करण्यासाठी तयार करेल, असे वाटते.

या चित्रपटात तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई आणि नानासाहेब पेशवे यांच्या भूमिकांना विशेष महत्त्व आहे. तात्या टोपेंच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारची निवड होण्याची शक्यता आहे. मात्र त्याबद्दल अजून त्याच्याशी चर्चा केली गेलेली नाही.
आणखी
भाऊ असावा तर असा
बिझी करीना
एकाच गाण्यात दोन सुपरस्टार
सलमान आणि अजय पुन्हा एकत्र
कैतरीनाने ऐश्वर्याला मागे टाकले
जोधा अकबर हिट चित्रपटाच्या श्रेणीत