मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान कोणत्याही चित्रपटात स्वत:ला झोकून देऊन काम करतो. 'गजनी' या आगामी चित्रपटासाठी त्याने पर्सनॅलिटीत मोठा बदल घडवून आणला आहे. आता चित्रपटाचा शेवट बदलविण्याचा प्रस्ताव त्याने निर्मात्यासमोर मांडला आहे. 'गजनी'च्या क्लायमॅक्सला हिरो खलनायकाशी मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन मारामारी करतो. या लढाईत बराच वेळ मारहाण चालते. 'तारे जमी पर' या चित्रपटानंतर आपल्या चाहत्यांच्या संख्येत बरीच भर पडली आहे त्यात मुलांचाही समावेश आहे, हे आमीरला माहिती आहे. म्हणूनच 'गजनी' ती या क्लायमॅक्सचा मुलांवर दुष्परिणाम होऊ शकतो, हे त्याच्या लक्षात आले. म्हणूनच त्याने त्यातील हिंसाचार कमी करून थोडा वेगळा क्लायमॅक्स करायचा प्रस्ताव निर्मात्यापुढे ठेवला आहे.
|