शीर्षक वाचून गोंधळात पडला असाल. 'रेस' चित्रपटात एका सेकंदाचीही भूमिका नसणार्या करीनाला चित्रपटाच्या यशाचे श्रेय कसे काय दिले गेले? असे तुम्हाला वाटले असेल. पण या चित्रपटाच्या यशाचे श्रेय करीनाचे आहे, हे आमचे मत नाहीये. छोटे नबाब सैफ अली खान यांना तसे वाटतेय.
सैफच्या म्हणण्यानुसार करीना त्याच्या जीवनात आल्यामुळे त्याचे नशीब फळफळले असून करीयरची गाडी सुसाट सुटली आहे. 'रेस' बनवला अब्बास-मस्तान या जोडीने. पण श्रेय करीनाला देऊन आपण या जोडीचे यश नाकारतोय, असे सैफला अजिबात वाटलेले नाही.
'रेस'ला मिळालेल्या यशाने अत्यानंदात असणार्या सैफने करीनाला एक शानदार पार्टी दिली. त्यात फक्त त्याच्या जवळच्या काही मित्रांचा समावेश होता. 'रेस' मध्ये इतर कलाकार असतानाही यशाचे श्रेय सैफला एकट्यालाच दिले जात आहे.
|