अक्षयकुमार कोणत्या ना कोणत्या नायिकेसोबत जोडी बनविण्यात चांगलाच पटाईत आहे. चित्रपटाच्या यशात प्रेक्षकांना आवडणार्या जोडीचे खास महत्त्व असते असे तो सांगतो.
रविना टंडन, शिल्पा शेट्टी आणि प्रियंका चोप्रा समवेत त्याची जोडी गाजली. सध्या अक्षय आणि कैतरीना या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 'वेलकम', 'नमस्ते लंडन', आणि 'हमको दीवाना कर गई' या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.
आता मात्र अक्षयचे संपूर्ण लक्ष दीपिका पदुकोणवर आहे. अद्याप एकाच चित्रपटात झळकलेल्या दीपिकासमवेत काम करण्यास प्रत्येक नायक उत्सुक आहे. अक्षयदेखील त्याला अपवाद नाही. निखिल अडवाणी यांच्या दिग्दर्शनात 'चांदणी चौक टू चायना' या चित्रपटात ते काम करीत आहेत.
|