मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
विवेकची 'सेकंड इनिंग'

IFM
'कंपनी' सारख्या चित्रपटातून शानदार सुरुवात करणार्‍या विवेक ओबेरॉयचे करियर नंतर मात्र डगमगले. त्यामुळे तो त्याच्या समकालीन अभिनेत्यांपेक्षा बराच मागे पडला आहे. आता मात्र तो एकदा नव्याने सुरुवात करीत आहे.

तो सध्या डेल भगवागर मीडियाशी जुळला आहे. हा ग्रुप विवेकची इमेज नव्याने प्रस्थापित करण्यासाठी त्याची मदत करीत असून आणि मीडियासंबंधी सर्व कामे सांभाळणार आहे.

'विवेक सध्या आपल्या करियरच्या महत्त्वाच्या वळणावर असून आता त्याला काही चांगल्या भूमिका मिळत आहेत. आमचे काम विवेकच्या स्टारडमला नवीन उंची मिळवून देणे आहे असे डेल सांगतो.

त्याला नुकताच करण जोहरचा एक चित्रपट मिळाला असून चित्रपटाचे दिग्दर्शन रेनसिल डिसिल्वा करीत आहेत. त्यात विवेक सोबत सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. त्याव्यतिरिक्त तो पॉपकॉर्न मोशन पिक्चर्स आणि बालाजी टेलिफिल्म्सचा 'मिशन इस्तंबूल' करीत आहे. अपूर्व लखिया दिग्दर्शित या चित्रपटात सुनील शेट्टी, झायेद खान आणि श्रेया सरन आहे.
आणखी
दीपिका अक्षयची नवी जोडी
क्रेझीतून राखी बाहेर
'रेस'च्या यशाचे श्रेय करिनाला
संवेदनशील आमीर खान
नशीब बदलायच्या प्रयत्नात इशा
अक्षय कुमार तात्या टोपेंच्या भूमिकेत?