सुरवातीला महेंद्रसिंह धोनीच्या अदांवर फिदा झालेली दीपिका पदुकोणने नंतर त्याला सोडून युवराजसिंगला गटवले होते. युवराजबरोबर तिचा रोमान्स खूप दिवस चालला होता. नंतर तिने युवराजला सोडून रणबीर कपूर समवेत इश्काचे रंग उधळायला सुरवात केली होती. पण आता मात्र, तिला आपल्या खर्या प्रेमाची उपरती झाली असून धोनी हाच आपला प्रियकर असल्याचे जाहीर केले आहे.
इतरांबरोबरची जी झाली ती प्रकरणे होती. पण धोनीच्या विषयी जे वाटते ते प्रेम होते आणि तेच अद्याप कायम असल्याचे तिने आज एक पत्रकार परिषद घेऊन सांगितले. वास्तविक एवढ्या प्रकरणानंतर थेट धोनीकडे हे सांगण्याचे धैर्य नसल्याने तिने मीडीयाच्या माध्यमातून आपले प्रेम जाहीर केले आहे. आता धोनी या सगळ्या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (स्त्रोत-एप्रिल फूल वृत्तसंस्था)
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
|