मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अभिषेकशी वाजल्याने ऐश्वर्या माहेरी
वेबदुनिया
जगतसुंदरी ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन या नवदाम्पत्याच्या लग्नाला वर्ष होत नाही तोवर त्यांच्यात खटके उडायला सुरवात झाली आहे.

पण आज सकाळी झालेल्या खटक्यानंतर ऐश्वर्याने बॅग भरून माहेरची वाट धरल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. बाराबंकी येथील जमिन हे या खटक्यांचे प्राथमिक कारण असले तरी अंतर्गत बाब वेगळीच असल्याचे समजते.

ऐश्वर्या ही आपल्या मुलीप्रमाणे असल्याचे काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी स्पष्ट केले होते, त्यानंतर बाराबंकी येथील जमिनीवर ऐश्वर्याच्या नावावर शाळा बांधण्याचे अमिताभ यांनी जाहीर केले.

त्याचे भूमीपूजनही झाले. पण मुलगा असूनही आपल्या नावावर काही नाही आणि कधी नव्हे ते सामाजिक कार्य करायल घेतलं तर त्याला ऐश्वर्याचे नाव दिले गेले, हे अभिषेकला अजिबात पटले नाही. त्यातच गेल्या काही दिवसांत ऐश्वर्याचा जोधा अकबर हीट झाला. मात्र तेवढे यश अभिषेकला मिळालेले नाही. म्हणून तो आतल्या आत नाराजही होता असे कळते.

दुसरीकडे, कानामागून तिखट झालेल्या ऐश्वर्याला दिले गेलेले महत्त्व सासू जया बच्चन यांनाही मान्य नाही. पण अमिताभ घरातही महानायक असल्याने इतर कुणाचे काही चालत नाही. पण यातूनच गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या भांडणाने कळस गाठला आणि त्याचे रूपांतर आज सकाळी ऐश्वर्या माहेरी जाण्यात झाले.

दरम्यान, ऐश्वर्याच्या बाबतीतील ही 'ब्रेकींग न्यूज' कळाल्यानंतर सलमानच्या घरी 'जलसा' झाल्याचे कळते. तिकडे अभिषेक मात्र बायको कधी परत येईल याची 'प्रतीक्षा' करत बसला आहे. (स्त्रोत - एप्रिल फूल वृत्तसेवा)

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
आणखी
दीपिका पुन्हा एकदा धोनीसमवेत
विवेकची 'सेकंड इनिंग'
दीपिका अक्षयची नवी जोडी
क्रेझीतून राखी बाहेर
'रेस'च्या यशाचे श्रेय करिनाला
संवेदनशील आमीर खान