मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
काजोलच्या वडिलांचे निधन

काजोलचे वडील आणि तनुजाचे पती सोमू मुखर्जी यांचे आज सकाळी निधन झाले. अजय देवगण आणि काजोल यांचा 'यू, मी और हम' हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होत असतानाच काजोलला वडिलांच्या मृत्यूचा धक्का बसला आहे.

सोमू यांचे वडील शशधर मुखर्जी यांनी बरेच चित्रपट तयार केले. त्यांनीच फिल्मिस्तान स्टुडिओची स्थापना केली होती. सोमूचे भाऊ जॉय मुखर्जी आणि देव मुखर्जी हे अभिनेते बनले आणि सोमू निर्माता दिग्दर्शक झाले.

निर्माता म्हणून सोमू यांनी एक बार मुस्करा दो (1972), नन्हा शिकारी (1973), छैला बाबू (1977), फिफ्टी-फिफ्टी (1981), लव्हर बॉंय (1985), पत्थर के इंसान (19991) आणि संगदिल सनम (1994) हे चित्रपट आणले. काही चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले.
आणखी
दीपिकाचे 'हॉट' फोटोसेशन
शेर्लिन चोप्रा यशराज फिल्म्सच्या चित्रपटात
आपल्या संघासाठी शाहरूख गाणार
राकेश रोशनने केली जिंगलची चोरी
ह्रतिक रोशन मुंबई इंडियन्सकडे
अमिताभ बोलला मराठीत