मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
खजुराच्या झाडावर अटकलेला 'मिमोह'


हिंदीमध्ये एक सुरेख म्हण आहे, 'आसमान से गीरे खजूर मे अटके' अशीच अवस्था सध्या मिथून चक्रवर्तीचा मुलगा मिमोहची झाली आहे.

mimoh
PR
बिचार्‍याला बापापेक्षा जास्त स्ट्रगल करावा लागतोय. स्टारपुत्र असल्याने ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून हिणवले जात नाही ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. पण तो सध्या वेगळ्याच चिंतेत आहे. अनेक दिवसांपासून त्याची प्रमुख भूमिका असलेला 'जीमी' (कदाचित चित्रपटाचे नाव मिथुननेच सुचवले असावे.) येत्या 18 तारखेला प्रदर्शित होत आहे. अनेक दिवसांपासून पेटार्‍यात बंद पडलेल्या या चित्रपटावरची धुळ नेमकी कोणी बाजूला सारली याची माहिती अजून बाहेर आली नसली तरी, मिथुनाने हे काम केल्याची चर्चा आहे. तर मिमोहचा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून प्रदर्शित होण्याची वाट पाहत होता. आता तो प्रदर्शित होत आहे, पण मिमोहचे नशीब खराब म्हणावे की काय, पण तो चुकीच्यावेळी प्रदर्शित करण्याचा निर्णय जीमीच्या निर्मात्यांनी घेतला आहे.

चित्रपटाची फारशी प्रसिद्धी करण्यासाठी मिथूनकडे वेळ नाही आणि आता निर्मात्यांच्याही पाणी डोक्यावरून गेल्याने चित्रपट नेमका किती दिवस चालेल याचीच शंका आहे. साधारणत: पोराच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी बॉलीवूडचे कलावंत दिवस रात्र एक करून मेहनत घेतात. पण मिथूनदांचा कारभार निराळा आहे. ते म्हणतात मिमोहची लढाई त्याने स्वतः: लढावी.आता बापच असं म्हणत असेल तर पोरगा काय? तोही निवांत आहे. पण त्यांच्या या निवांतपणाने चित्रपटातील निर्माते आणि दिग्दर्शकांना घाम फुटलाय. त्यात आता क्रेझी 4, टसन, आणि यू मी और हम सारखे चित्रपट प्रदर्शित होत असल्याने या स्टारर्सच्या गराड्यात बिचारा जीमी किती चालेल याची काहीही शाश्वती नाही. मिमोहचा पुरू राजकुमार नाही झाला म्हणजे मिळवले.
आणखी
श्रीराम लागू आणि अमिरला मंगेशकर पुरस्कार
काजोलच्या वडिलांचे निधन
दीपिकाचे 'हॉट' फोटोसेशन
शेर्लिन चोप्रा यशराज फिल्म्सच्या चित्रपटात
आपल्या संघासाठी शाहरूख गाणार
राकेश रोशनने केली जिंगलची चोरी