मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
संपदा करणार कॉमेडी शोचे अँकरींग
PRPR
कॉमेडी शो म्हटलं की एक देखणी आणि 'चिकणी' अ‍ॅंकर आणि कॉमेडीयन असे समीकरण असते. त्यामुळे हे शो छान छान विनोद ऐकण्याबरोबरच पहाण्यासारखेही असतात! तशी सवय लाफ्टर चॅलेंज या शोने लावली. आता कॉमेडी शोमधील 'रूपाने देखणी अंगाने चिकणी' अशा सूत्रसंचालकांचे महत्त्व सगळ्याच चॅनेल्सला कळले आहे. म्हणूनच लवकरच सुरू होणार्‍या एका कॉमेडी शोमध्ये आपली मराठमोळी संपदा वझे अ‍ॅंकरींग करणार आहे. 'कॉमेडी का किंग कौन' असे या शोचे नाव असून यात भारताबरोबर पाकिस्तानातील कॉमेडीयनही सहभागी होणार आहेत. संपदा एकटीच्या जीवावर या शोचे सूत्रसंचालन करणार आहे.

सध्या झी नेक्स्टवरील हम तुम या शोमध्ये सध्या संपदा आहे. मात्र हा शो आता संपत असून त्याचवेळी तिला ही मोठी संधी मिळाली आहे.

यासंदर्भात बोलताना संपदा म्हणाली, की एक मालिका संपून दुसरी सुरू होईपर्यंत मला थोडी उसंत मिळेल, असे सध्या तरी वाटत नाहीये. कारण नवा कॉमेडी शो एक मोठे आव्हान असून यात मी प्रथमच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असेन. हा शोही मनोरंजक असल्याने मलाही त्याचे अ‍ॅंकरींग करताना मजा येईल.

अ‍ॅंकरींगमध्ये मला नेहमीच रस होता. पण सूत्रसंचालकाला उत्स्फूर्तता आणि हजरजबाबीपणा लागतो. म्हणूनच हे सोपे काम नाही. त्यामुळे मी थोडीशी नर्व्हस असली तरीही सकारात्मकरित्या या शोकडे पहाते, आहे, असेही तिने नमूद केले.

हा शो येत्या १४ एप्रिलपासून सोमवार ते गुरूवार या काळात रात्री साडेआठ वाजता दाखविला जाणार आहे.
आणखी
खजुराच्या झाडावर अटकलेला 'मिमोह'
श्रीराम लागू आणि अमिरला मंगेशकर पुरस्कार
काजोलच्या वडिलांचे निधन
दीपिकाचे 'हॉट' फोटोसेशन
शेर्लिन चोप्रा यशराज फिल्म्सच्या चित्रपटात
आपल्या संघासाठी शाहरूख गाणार