शाहरूख खानच्या 'बिल्लू बार्बर'मध्ये काम करण्यास एकही हिरॉईन तयार नाहीये. नाही? शाहरूखबरोबर काम करण्याची त्यांची तयारी नाही असे नाही? पण प्राथमिक बोलणी झाल्यावर त्यांना सांगण्यात येते की तुम्हाला इरफान खानच्या पत्नीची भूमिका करावी लागेल? हे ऐकताक्षणी नायिका पळ काढत आहेत.
आमीषा पटेलने सुरवातीला हो म्हटले होते. पण नंतर तिने नकार दिला. त्यानंतर दिग्दर्शक प्रियदर्शन तब्बूकडे गेला. तिने पहिल्याछूट नकार दिला.
बॉलीवूडच्या आणखी दोन तीन हिरॉईन्सशी चर्चा करण्यात आली. पण सगळ्यांनीच ऑफरकडे पाठ फिरवली. अखेर वैतागलेला प्रियदर्शन लारा दत्ताकडे गेला. लाराचाही नकार ऐकावा लागेल, अशी मानसिक स्थिती करून घेतलेल्या प्रियदर्शनला लाराने मात्र होकार देऊन आश्चर्याचा धक्का दिला.
इरफानची नायिका झाल्यास आपल्या मार्केट व्हॅल्यूवर परिणाम होईल, अशी त्यांना भीती वाटतेय. बॉलीवूडचे बडे स्टार आपल्याबरोबर काम करणार नाहीत, असे त्यांना वाटतेय. लारा आता इरफानच्या बायकोची भूमिका करेल. कृष्ण आणि सुदाम्याच्या मैत्रीवर हा चित्रपट आधारीत आहे.
|