अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात गाणी म्हटली आहेत. त्याशिवाय अदनान सामीबरोबर त्याने अल्बमसुद्धा केला आहे. एबी बेबी नावाच्या या अल्बमने बरीच लोकप्रियता मिळवली होती. आता अमिताभ हनुमान चालिसा म्हणणार आहे. संगीतकार आदेश श्रीवास्तव या अल्बमला संगीत देणार आहे. अल्बमची रेकॉर्डिंग झाली असून बर्याच लोकांना हा अल्बम आवडल्याचे सांगितले जात आहे. अल्बमला युवा पिढीचा आणि घरातल्या मोठ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.
|