राकेश रोशनचा क्रेझी -४ हा चित्रपट संगीत चोरीच्या वादातून बाहेर पडतो न पडतो तोच एका नव्या वादात अडकला आहे. या चित्रपटातील एक गाणे एका जाहिरातीच्या जिंगलवरून उचललल्याचा दावा जाहिरात करणार्याने केला होता. त्यावरून प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर मग राकेश रोशनने न्यायालयाबाहेर तडजोड करून हा वाद मिटवला आणि क्रेझी -४ प्रदर्शित होण्यातला मोठा अडथळा दूर केला.
पण आता नवा वाद उद्भवला आहे. या चित्रपटातील एक पात्र असलेल्या गंगाधरला ( राजपाल यादव) स्कीझोफ्रेनिया हा मानसिक रोग असल्याचे दाखविले आहे. हा गंगाधर वर्तमानात वावरत नाही. तो भूतकाळातच आहे. स्वातंत्र्य मिळालेय याचा त्याला पत्ताच नाहीये.
वास्तविक स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर रोग आहे. त्याच्याविषयी काहीही बाष्कळपणा दाखविणे म्हणजे या रोगाने ग्रस्त असलेल्यांची थट्टा करण्यासारखे आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या रोगाचे असे सादरीकरण करण्याने याविषयी गैरसमजही पसरू शकतात. त्यामुळे डॉक्टरांनी या पात्राविषयी आक्षेप नोंदवला आहे. आता बघू राकेश रोशन या नव्या वादाला कसे तोंड देतात ते?
|