मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मल्लिकाचे नखरे
IFMIFM
अभिनयाचं काडीचंही 'अंग' नसतानाही नुसत्या 'अंगप्रदर्शनाच्या' जोरावर बॉलीवूडमध्ये 'वेगळे' स्थान मिळवलेल्या मल्लिकाबाई शेरावत सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. चित्रपट चालत नसले तरी प्रसिद्धी तिच्या मागे येते आहे. म्हणूनच की काय या प्रसिद्धीची हवा बाईंच्या चांगलीच डोक्यात गेलेली दिसते. कारण दिग्दर्शक कुंदन शहाला तिने सध्या बराच त्रास दिल्याचे किस्से ऐकू येत आहेत.

स्टुडीओ १८ च्या एका चित्रपटाचे दिग्दर्शन कुंदन शहा करणार होता. या चित्रपटासाठी मल्लिकाला साईन करण्यात आले होते. त्यासाठी तिला ९५ लाख रूपये मिळणार होते. त्यातील २५ टक्के आगाऊ रक्कमही दिली होती.

पण शूटींग सुरू होण्यापूर्वीच मल्लिकाने नखरे दाखवायला सुरवात केली. ज्यातलं आपल्याला कळत नाही, अशा बाबतीतही ती डोकं घालायला लागली. मग तिने थेट कुंदन शहा हा दिग्दर्शक म्हणून आवडत नसल्याने त्याला बदलावे असे सांगितले. नंतर पाळी कॅमेरामनची होती. त्यालाही बदलावे अशी मागणी तिने केली. तिचे असे एकेक नखरे वाढत गेल्याने निर्मात्या कंपनीच्या डोक्याला चांगलाच 'हेडॅक' झाला.

ही बया आत्ताच एवढे नखरे करतेय. मग शूटींग सुरू झाल्यावर काय करेल, असा विचार कंपनीने केला आणि चित्रपटाचे शूटींगच बंद करून टाकले. मग मल्लिकाने आगाऊ रक्कम देऊन टाकावी अशी मागणीही केली. पण नखरेल मल्लिकाने पैसे परत देण्यास नकार दिला.

आता कंपनी 'इम्पा' या संघटनेच्या दारात गेली आहे. इम्पाने त्यावर उपाय काढावा अशी मागणी आहे. मल्लिकाच्या नखर्‍यांचा त्रास इतर अनेक निर्मात्यांनाही झाला आहे. त्यामुळे उद्या सगळ्यांनी मिळून मल्लिकावर बहिष्कार घातल्यास आश्चर्य वाटायला नको.
आणखी
ईशाच्या ओठांची बॉलीवूडमध्ये चर्चा
क्रेझी-४ नव्या वादात
सैफ शाहरूखला मागे टाकण्याच्या तयारीत
अमिताभ म्हणतोय हनुमान चालिसा
अखेर 'बिल्लू बार्बर'ला नायिका मिळाली
संपदा करणार कॉमेडी शोचे अँकरींग